आजच प्रश्न
स्वामी समर्थानी त्रंबकेश्वर ला कुणा कुणाल दीक्षा दिली
आधी तुम्ही उत्तर सांगा मी उद्या सांगेन
कालच्या प्रश्नच उत्तर
गोकर्ण ह्या क्षेत्रा च महात्म्य काय?
मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूतमुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता.एकदा तो शिकारीस गेला असता अनवधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला.राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आले त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला.राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलविले.राजाला धडा शिकविण्याहेतू आचारीरुपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले.अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले.त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला.राजा ही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरुंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला.पण राणीने त्याला अडविले.तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतः च्या पायावर ओतले.त्याक्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले.त्यामुळे त्याचे नाव कल्माषपाद पडले.वसिष्ठांना आपली चूक समजली त्यांनी राजास उःशाप दिला की बारावर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरु लागला.भुकेलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले.खाण्यासाठी त्याला पकडले त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली.पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले.ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होउन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीसंग करताच त्याचे प्राण निघून जातील.राजाला अतिशय वाईट वाटले तो विमनस्क झाला.त्याच्या पत्निच्या लक्षात ही गोष्ट आली.तिने राजाला विचारले .राजाने घडलेला प्रसंग सांगितला.तिला ही अतिशय वाईट वाटले.त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली.वंशवृद्धी ची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती.शापित राजाला हिंडता हिंडता गौतमऋषी भेटले .राजाने आपली सगळी हकीकत गौतमऋषिंना सांगितली.ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वर चे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळविलेले शिवलिंग राक्षस लोकांत जाऊ नये म्हणून गणेशा द्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथेच स्थिर झाले. गौतमऋषिंनी राजाला अजुन एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली.ती अत्यंत कुरुप होती.तीचा पूर्व वृतांत असा की ती ब्राह्मण कन्या होती .तिचे नाव सुमित्रा असे होते.तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले.पण दुर्भाग्य वश तिला वैधव्य आले.पण शारीरिक भूकेसाठी ती वाममार्गाला लागली .पित्याने खूप समजावले पण तीने काही ऐकून घेतले नाही. ती एक शूद्राबरोबर राहू लागली.मद्यपान करू लागली त्यानशेतच बोकड समजून तिने वासरू कापले.लक्षात येताच ती शिव शिव करुन ओरडली .पुढील जन्मात ती चांडाळीण झाली पण जन्मांध होती.एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्तांच्या मागून निघाली.भूकेने व्याकूळ झाली.एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले .हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले.ते बेलपत्र वार्याने उडून शिवलिंगावर पडले.अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला.गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले.त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करुन शेवटी तो शिवलोकास निघून गेला.राजाला सरूपता मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वर चा महिमा
( तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईका ना ही प्रश्न मंजू शे साठी ग्रुप मध्ये सामील करून घेऊ शकतात त्या साठी व्हाट्सअप्प no 8605582623)
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"