Wednesday, May 29, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २२ मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २२ मे  🌸*

*गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी.*

कुस्त्या खेळून, झगडून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; पण तुम्ही त्यांना भिता याला काय करावे ? अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. 

भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. 

तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. 
दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल.

मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्‌गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपल्या सद्‍गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. 

माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवद्‍भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे.

माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे की, तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल; किंवा दुसरे कारण असे की, तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा, एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला, तर ते बरे नाही. तसेच, मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तरे तेही बरे नव्हे. आपल्यामधे हळूहळू परिवर्तन व्हावे, आणि ते विवेकाने घडवून आणावे.

*१४३.  भजन, पूजन, नामस्मरण इत्यादि आपण जे करतो. ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २३ मे 🙏

🌹II श्री राम जय राम जय जय राम II🌹
आपल्या महाराजांचे आजचे प्रवचन - २३ मे
"
देवाकरिता स्वतःला विसरावे.
"

तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.
व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमे श्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे, विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही,

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २८ मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ मे  🌸*

*प्रपंच भगवंताचा मानून करावा.*

अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. 
संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता, परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.' 

देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. 

पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. 

आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. 

प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा. 

नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. 
तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. 

सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे.

प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. 
परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे, आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे, म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे, म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ? 

देवापाशी 'मला तू आपला म्हण. हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो.' असे मागावे. 
नाही तर, जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. 

भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. 
त्याचप्रमाणे, मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. 

'तू जे देशील ते मला आवडेल,' असे आपण भगवंताला सांगावे, आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?

*१४९.  ज्याच्या प्रपंचामधे पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तोच परमार्थ होतो; ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २९ मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ मे  🌸*

*भगवंताची तळमळ लागायला पाहिजे .*

ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीच गरज नसते. 

भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार, असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर, मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? 

निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. 

साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात; मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे.

सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! 
मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. 

आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे 'मी रामाला विसरलो' हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. 

कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो; पण भगवंत चोहोकडे पाहतो आहे अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप घडणार नाही. 

कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. 
स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला, तर त्या संध्येचा काय उपयोग ? 

मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे, व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुनः विषयाचा आनंद झाला, तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. 

माझा प्रयत्‍न व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडू देऊ नको, असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. 
प्रत्येक कृतीत, 'मी भगवंताचा आहे' ही जाणीव ठेवावी. 

पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भिती नाही वाटत. 

पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटे सोसावी लागली ! 
संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत, 
याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा, आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले, तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. 
खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. 

संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांनादेखील समाधान हे नसतेच; 
म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. 

असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे, आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे.

*१५०.  ज्याचे  समाधान  भगवंतावर  अवलंबून  आहे,  त्याचे  समाधान  कोणत्याही  परिस्थितीमध्ये  टिकेल .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, May 27, 2019

पाऊस योग्य पडत नसेल तिथे ऋष्यशृंगाच्या नावाचा जप

!!श्रीराम !!

आपण वाचा ! इतरांना सांगा !! आणि सर्वांनी मिळून सहकार्य करा !!!

     वाल्मिकी रामायणात रोमपाद राजाची गोष्ट सांगितली आहे.. त्याच्या राज्यात पाण्याची खूपच कमतरता भासत होती.. त्यावेळी राजाला असे सांगितले गेले की विभांडक ऋषींचा मुलगा 'ऋष्यशृंग' याला आपल्या राज्यात येण्यासाठी विनंती करा..

    त्याप्रमाणे लोमपाद राजाने विनंती केली आणि तो आला.. त्याचा प्रवेश झाल्याबरोबर त्या राज्यात भरपूर पर्जन्यवृष्टी झाली..

    तेव्हापासून ज्या भागात पाऊस योग्य पडत नसेल तिथे ऋष्यशृंगाच्या नावाचा जप करण्याची रूढी सुरू झाली..

     आत्ता सुध्दा तशीच परिस्थिती दरवर्षी निर्माण होते.. म्हणून आपल्याला त्याची स्तुती असलेला श्लोक पाठवत आहे..

ऋष्यशृंगाय मुनये विभाण्डकसुताय च।
नमः शांताधिपतये सद्यः सद्वृष्टिहेतवे।।

     या श्लोकाचा रोज (24 तासात केव्हाही) किमान 11 वेळा तरी जप करावा..

    आज रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करत आहे.१० ऑक्टोबर २०१९ पर्यंत (सूर्य हस्त नक्षत्रात असेल.हस्त नक्षत्र हे पावसाचे शेवटचे नक्षत्र)वरील मंत्राचा जप करावा.

    काहीजण कदाचित म्हणतील की आमच्या भागात पाऊस अगदी व्यवस्थित पडतो.. कृपया असा विचार न करता विश्वशांतीच्या कार्याला सहकार्य करावे ही विनंती...

    वरील रामायणातील माहिती डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी दिली आहे.. त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो.. पुढे असंच सहकार्य आपल्या सर्वांना करावे अशी मी त्यांना विनंती करतो...

     श्रीराम धन्यवाद...

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ मे 🙏


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ मे  🌸*

 *निरभिमानी  परोपकार  ही  भगवंताची  सेवाच .*

प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. 

ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते.
इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्या व्यक्तीने ठेवावी. 

ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. 

मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय ? 
तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे. 

परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. 

भगवंताची सेवा या भावनेने दुसर्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. 

परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, "ते मी केले, मी असा चांगला आहे," अशा तर्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. 

सबब, ज्या ज्या वेळी दुसर्याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे." 
ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. 

परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्याचे काम केले'ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. 

नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.

*१४८.  जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, May 26, 2019

बहारिन मध्ये भगवद्गीता !

बहारिन मध्ये भगवद्गीता !
लेखक - राजेन्द्र खेर
थोड्या दडपणाखालीच पांडुरंग शास्त्री बहारिनच्या शेखकडे निघाले होते. 
आपली मते आणि विचार शेखला निश्चित पटतील असे त्यांना वाटत होते. 
परंतु तरीही शेखसाहेब आपल्याला प्रवचन करण्यास परवानगी देतील का नाही याविषयी त्यांचे मन साशंक होते. काही दिवसांपूर्वीच स्वामी चिन्मयनंदांना मध्य आशियातील काही ठिकाणांहून अक्षरशः गेल्या पावली परतावे लागले होते. 
आधी ठरल्याप्रमाणे पांडुरंग शास्त्री बहारिनला येऊन पोहचले होते.
 तिथे गेल्याबरोबर ते तेथील पोलीस कमिशनरला जाऊन भेटले.  कमिशनरने विचारले,
" आपल्याला खाजगी कार्यक्रम करायचेत की सार्वजनिक ?"
" सार्वजनिक "
" सॉरी, मी आपल्याला परवानगी देऊ शकत नाही."
" मला कारण समजू 
शकेल ?"
"अहो, तुम्ही हिंदू धर्म सार्वजनिक ठिकाणी सांगणार मग परवानगी कशी देणार ? "
"मी हिंदू धर्म सांगणार नाही, तर गीता सांगणार."
" गीता म्हणजे हिंदू 
स्क्रिप्टच ना ?"
" नाही ! गीता ही केवळ हिंदूंची नाही."
" हे बघा मी तुम्हाला परवानगी दिली तर शेखसाहेब माझी इथून उचलबांगडी करतील."
" पण मी कोणत्याही वाईट कामासाठी परवानगी मागत नाही."
" हे बघा ते तुम्हाला त्यांच्याकडे जाऊनच पटवून द्यावे लागेल."
मग पोलीस कमिशनरने फोनवरून शेख साहेबांशी संपर्क साधून सारा प्रकार त्यांच्या कानावर घातला होता.
मध्य आशियातील बव्हंशी सत्ता शेखांच्या हातात होती. त्यामुळे कोणत्याही बाबतीत अंतिम निर्णय करण्याचा अधिकार त्यांचाच असे. 
स्वतः शेख कायदा- सुव्यवस्थेच्या बाबतीत लक्ष घालून झटपट निर्णय घेत.
पांडुरंग शास्त्रींना फक्त १५ मिनिटे भेटीची परवानगी शेखसाहेबांनी दिली.
शास्त्रीजींचे आतापर्यंतच्या आयुष्यातील ठळक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठी व्यक्ती समोर असली तरी ते आपल्या तत्त्वांपासून कधी ढळत नसत आणि आपली तत्त्वे छातीठोकपणे सांगत असत.
यापूर्वीही शास्त्रीजींनी वेळोवेळी आपल्या तेजस्वीततेचे दर्शन घडवले होते.
शेखसाहेबांच्या आलिशान महालात त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. थोड्याच वेळात भारदस्त शरीर यष्टीचे रुबाबदार शेखसाहेब आले. 
दोघांनी हस्तांदोलन केले.
" आपण काही कार्यक्रम करू इच्छिता ?" शेखसाहेबांनी इंग्रजीत विचारले.
" मी गीतेवर स्पीच देणार आहे."
" ओह, ते तर हिंदू स्क्रिप्ट !"
" It is not a Hindu script, its a human script."
हिंदूंनी फक्त गीतेला सांभाळली.
भगवान कृष्णाने गीता सांगितली. श्रीकृष्णा सारखा राजनीतिज्ञ आजपर्यंत झालाच नाही. 
आध्यात्मिक जीवनात मार्गदर्शन करणाऱ्यांतही कृष्णाचे स्थान बरच उंचावर आहे. गीतेत कोणत्याही ठिकाणी कोणताच आग्रह नाही किंवा ती कोणा एका संप्रदाया पुरती मर्यादित नाही.
हेच गीतेचे वैशिष्ट्य आहे.
मग गीता हिंदूंची की मुसलमानांची, ख्रिस्ती लोकांची की पारशांची ? 
ती कोणाही एकाची नाही."
शेखसाहेब मोठ्या उत्सुकतेने शास्त्रीजींचे बोलणे ऐकत होते.
" गीता ही कोणाचीच मक्तेदारी नाही. 
ती प्रत्येक मानव मात्रासाठी आहे. तिच्यावर सर्वांचाच सारखा अधिकार आहे.
जो स्वतःला भगवंताचा पुत्र मानतो, त्याच्यासाठी ती आहे.
पाच हजार वर्षांनंतर ही उपयोगी पडेल असे, तत्त्वज्ञान पाच हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.
आता मला सांगा, पाच हजार वर्षांपूर्वी आपला धर्म होता
 का ?"
" अं, नाही."
" दुसरे कोणतेच धर्म नव्हते त्यावेळी. त्यावेळी सांगितलेले तत्त्वज्ञान हे अखिल मानव जातीसाठी होते. 
म्हणजे तुमच्या पूर्वजां साठी ही होते.मग ते तत्त्वज्ञान तुम्ही वाचले, ऐकले किंवा आचरणात आणले तर बिघडले कुठे ?"
शेखसाहेब आदरयुक्त आश्चर्याने शास्त्रीजींचे बोलणे ऐकत होते.
पंधरा मिनिटे कधीच उलटून गेली होती.
" मी धर्मावर बिलकुल बोलणार नाही. हिंदू धर्म हा तुम्ही समजता तसा नाही, तर हिंदू धर्म हा एक जीवन प्रणाली आहे."
" पण तुम्ही मूर्तिपूजा मानता आम्ही आकाशस्थ विश्वनिर्मात्याला मानतो."
" आम्ही त्यालाच परब्रह्म म्हणतो. आम्ही सुद्धा त्या परब्रह्मालाच मानतो."
तुम्ही मूर्तिपूजा मानत नाही किंवा कोणतेच रूप मानत नाही.
मग विना रूपाचे ध्यान कसे होईल ?  तुम्ही आकाशाचं ध्यान कसे करणार ? आकाशाला आकार नाही व गुणही नाही.
ज्याला आकार म्हणजे form नाही व गुण म्हणजे quality नाही त्याचे ध्यान कसे 
करणार ?
म्हणून ध्यान करावयाचे असेल तर सगुणोपासना हवी.
खुदाने जर विविध रूपे निर्माण केली आहेत, तर तो स्वतः  मानवी रूप घेऊ शकणार नाही का ? 
खुदाचे मानवी रूपच आपल्याला जवळचे वाटेल.
चित्त एकाग्र करून केलेल्या मूर्तिपूजेत मन मूर्तीचा आकार घेते. मूर्तिपूजा हे एक संपूर्ण शास्त्र आहे, त्यात चित्ताग्रता न तुटता ती अधिक वाढते. त्यातूनच पूर्णतेची अनुभूती मिळते."
हे सांगून शास्त्रीजींनी स्वाध्याय चळवळी विषयी थोडक्यात सांगितले. 
" आमचे हे प्रॅक्टिकल अध्यात्म आहे. जात-पात, देश-धर्म, असले भेद आम्ही मानत नाही. 
आम्ही कुणाचा धर्म बदलत नाही.
आपापल्या धर्मात राहून जगातला कुणीही माणूस स्वाध्याय करू शकतो. 
मूर्ति पूजा आवश्यक असल्याने आम्ही योगेश्वर भगवान मानतो. 
त्या योगेश्वरात विविध धर्मियांचे लोक आपापला देव पाहतात."
" मला समजले नाही..."
" श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या गुणविशेषांतून योगेश्वर उभा राहिला आहे. आमच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात त्याचे मंदिर आहे.
मला तुमच्या मशिदींची स्वच्छता भावते, चर्च ची भव्यता मानवते आणि आमची मूर्तिपूजा योग्य वाटते. या तिन्ही धर्मस्थळांमधील चांगली वैशिष्ट्ये घेऊन हे मंदिर उभे आहे."
" अच्छा, म्हणजे तुम्ही मोहम्मदाला मानता तर ? "
" अर्थात, कोट्यवधींना मॉरल ऑर्डर्स देणारा माणूस अवतारच होता असे मी मानतो.श्रीकृष्ण, महंमद, येशू ख्रिस्त, मोझेस या विभूतींनी खरोखरच अफाट कार्य केलेले आहे. केवळ धर्माच्या बॅरिअर्स निर्माण करून त्यांना कमी लेखू नये.
जवळ- जवळ दोन तास चर्चा चालली. शेखसाहेबांनी अनेक प्रश्न, शंका उपस्थित केल्या.शास्त्रीजींच्या  प्रभावी विवेचनाने त्यांचे समाधान झालेले दिसले.
" कृपया, तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत प्रवचन दिले तर चालेल."
शास्त्रीजी म्हणाले," माझा स्वाध्याय - विचार तुमच्यापर्यंत पोचला म्हणजे झाले, भाषा कोणती का असेना !"
" तुमची कार्यक्रमाची वेळ कोणती ठरवलीत ?"
" संध्याकाळची "
" शास्त्रीजी, तेव्हा तर आमची सामुदायिक प्रार्थना असते. लाऊड-स्पीकर वरून म्हटली जाते.
अर्धा - पाऊण तास तो कार्यक्रम चालतो.
" मग त्यात काय झालं. आम्हांला कोणी परके नाहीत. प्रार्थना सुरू झाली म्हणजे आम्ही आमचा कार्यक्रम थांबवू. शांत बसून राहू."
दुसऱ्याच दिवशी पांडुरंग शास्त्रीनी बहारिन मध्ये गीता सांगायला प्रारंभ केला.
लाऊड स्पीकर वरून प्रार्थने ची बांग सुरू झाली की प्रवचन थांबवायचं, हे त्यांनी निश्चित केलंच होतं.
ठरल्या प्रमाणे शास्त्रीजींचे प्रवचन सुरू झाले आणि काही वेळातच लाऊड स्पीकर वरून चोहीबाजूंनी बांग ऐकू येऊ लागलो. 
बांगेच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला.
शास्त्रीजीं नी प्रवचन थांबवले.
आपल्या जागेवरच ते शांतपणे नेत्र मिटून बसून राहिले.
पुढे अर्धा- पाऊण तास त्यांना त्याच अवस्थेत बसावे लागणार होते. 
पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच !
एरवी अर्धा - पाऊण तास चालणारी बांग त्या दिवशी अवघ्या तीन मिनिटांत 
संपली !
शास्त्रीजींना आश्चर्य वाटले.
त्यांनी आपले प्रवचन पुढे सुरू केले.
प्रवचन संपल्यावर त्यांना या गोष्टीचा उलगडा झाला.
एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे आजची प्रार्थना लवकर उरकायची आहे, अशी सूचना अगोदरच लाऊड स्पीकरवरून देण्यात आली होती !
ते ऐकून शास्त्रीजी भारावून गेले.
मुस्लिम धर्मियांनी त्यांना दिलेलं प्रेम बघून त्यांना गलबलून आले.
अखिल विश्वातील मानव जर अंतःकरणा पासून एकत्र आले यर जगातील सर्व समस्या सुटतील असं त्यांना वाटत राहिले.
मध्य आशियात आणखी काही प्रवचने केल्यावर निघताना शेख साहेबांनी त्यांचा स्टेट अवॉर्ड व सुवर्ण पदक देऊन सन्मान व गौरव केला. 
दोन धर्मांमधील मैत्रीचा पूल बांधण्यात शास्त्रीजी सफल
झाले होते.
साभार - सादर : विलास पोतदार
( ' देह झाला चंदनाचा ' या राजेन्द्र खेर लिखित आदरणीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या चरित्रावर आधारित पुस्तकातून परिचयार्थ वेचलेला भाग - साभार.
हे वाचनीय पुस्तक विहंग प्रकाशन, पुणे यांनी प्रथम १९९९ साली प्रकाशित केले व सध्या ३० वी आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे.)

संघर्ष* डॉ. अब्दुल कलाम

*संघर्ष* 
डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते.. 
त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !.. 

त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..

ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.

डॉ.  कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..

रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !..

तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ  नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !..

डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..

ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !..

दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..

विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"..

पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..

 "जीवनात अयशस्वी जरी झालोत 
          तरी निराश होऊ नये 
                 कारण,
         F.A.I.L. चा अर्थ 
    First Attempt In Learning
          असाच आहे..!!

          प्रयत्नांना कधीही 
             शेवट नसतो 
                कारण,
           E.N.D. चा अर्थ
      Efforts Never Die
          असाच घेऊयात..!!

     आयुष्यात कोणाकडूनही 
         नकार आला तरी
          खचून जाऊ नये 
               कारण,
          N.O. म्हणजे 
     Next Opportunity
 म्हणून नेहमी आशावादी राहुयात 
              आणि 
जीवनात पुढेच चालत राहुयात; 
         👍👍👍👋👋👋
संदर्भ: अग्निपंख

आयुष्य शिकवणारे मास्तर कुणाच्या रूपात कुठं भेटतील हे सांगता येत नाही.

सिनसिनाटी एअरपोर्ट पासून माझं हॉटेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. रस्त्यात एक अपघात झाला होता. त्यामुळे मला जवळपास एक तास लागला. उबर टॅक्सी केली होती. डोनाल्ड नाव होतं ड्रायव्हरचं. साधारण पंचावन्न वगैरे वय असावं.

डोनाल्ड गप्पा मारत होता. तो ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होता त्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. जगातल्या घडामोडीबद्दल त्याला ज्ञान होतं. भारताबद्दल त्याला माहिती होती. मी डोनाल्डला विचारलं "उबर टॅक्सी चा बिझिनेस करण्याआधी, तू काय करत होता?".

त्याने जे उत्तर दिलं, ते ऐकून मी सर्द झालो. तो म्हणाला "आयएनजी मध्ये मी फायनान्स चा व्हाईस प्रेसिडेंट होतो. आणि त्यानंतर अकसा मध्ये." मी आपल्या मराठी मानसिकतेला जागून त्याला विचारलं "इतक्या चांगल्या पगाराची नोकरी तू का सोडली?".

डोनाल्ड म्हणाला "भविष्यात मला जितके पैसे लागतील ते माझे जमा झाले होते. मला फक्त आजचा खर्च भागवायची गरज होती. माझ्या फायनान्स जॉब मध्ये टेन्शन होतं आणि तितक्या पैशाची गरज नव्हती. उबर बिझिनेस हा परफेक्ट ऑप्शन होता. मला पैसे मिळतात, अनेक ठिकाणी फिरायला मिळतं आणि तुझ्यासारख्या लोकांना भेटता येतं. मला नातू आहेत. फॅमिली साठी मला वेळ देता येतो."

मला हेवा वाटला त्याचा. एखाद्याचं सरळ कौतुक करायचं नाही हा माझा बाणा. त्याला जागत मी म्हणालो "आजकालच्या जगात उबर, एअर बीएनबी सारख्या खूप संधी मिळतात. त्यामुळे असे निर्णय घेता येतात......."

मला मध्ये थांबवत डोनाल्ड म्हणाला "अशा संधी आज असतात असं नाही. माझे वडील एमआयटी चे सिव्हिल इंजिनियर होते. स्वतःचा बिझिनेस होता त्यांचा. पण १९८५ साली त्यांनी सिव्हिल बिझिनेस बंद केला अन कारण हेच. त्यांच्या भविष्यासाठी लागतील तितके पैसे जमा झाले होते. पुढचे पंचवीस वर्षे त्यांनी फूड ट्रक चालवला. आज ते ८७ वर्षाचे आहेत. आणि लाईफ एन्जॉय करत आहेत."

मी विचारलं "तुझ्या मुलांसाठी काही एक्स्ट्रा पैसे कमवावे असं तुला वाटत नाही का?"

तर तो पटकन म्हणाला "नाही! मला त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्यांच्या साठी पैसे कमवून मला त्यांच्या पंखातील बळ कमी करायचं नाही. I strongly believe that giving money more than children deserve  is biggest de-motivator for them."

गप्पा मारताना हॉटेल आलं.

आयुष्य शिकवणारे मास्तर कुणाच्या रूपात कुठं भेटतील हे सांगता येत नाही.

*सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल*

*सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल*

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील :

*१) ब्राम्हमुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे.
 सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच काहीही न करता शांत बसा. 'जो सुखाला, दु:खाला, जीवनाला, मृत्यूला जाणणारा आत्मदेव आहे, मी त्या सत-चित-आनंद्स्व
रुपाच्या माधुर्यात शांत होत आहे. हे मायाविशिष्ट शरीर माझे नाही परंतु माय आणि मायेचे खेळ मज चैतन्यामुळे प्रकाशित होतात. ते चैतन्य मी आहे. सोsहम, या ब्रम्हभावात एक-दोन मिनिटे बसून रहा. भगवान श्रीकृष्णसुद्धा झोपेतून उठल्यावर काही वेळ शांत बसत असत. मीसुद्धा शांत बसतो. खूप लाभ होतो.
दिवसभर काम केल्याने जे मिळेल ते नश्वर मिळेल, सुटणारे, दु:ख देणारे मिळेल किंवा थोडेसे, मिटणारे, तुच्छ, किरकोळ सुख मिळेल; परंतु झोपेतून उठल्यानंतर काही न केल्याने सुख आणि दु:खाला थिटे करून परमात्म्याची भेट घालून देणारे पद (परमात्म-पद) मिळेल.
दिवसा केलेल्या पूजा-आरतीने लाभ होतो पण याचा लाभ अनेक पटीने अधिक होतो. काशी आणि मक्केला जाणे सर्वांच्या हातची गोष्ट नाही. सकाळी झोपेतून उठताच काही वेळ शांत व्हा, मग हजारदा काशी वा मक्केला गेल्यानंतरही जो मिळेल कि नाही सांगता येत नाही त्या परमात्म्याला तुम्ही भेटू शकता.

*२) प्रार्थना.
 रोज प्रार्थना करा की 'हे परमेश्वरा ! हे गुरुदेवा ! हे इष्टदेवा ! माझे ह्र्दय पवित्र होवो; पवित्र भाव आणि पवित्र ज्ञानाचा विकास होवो. सर्वामध्ये जी एक सत्ता वसलेली आहे, टी साक्षी, चैतन्य. सतस्वरूप आहे.
आदि सचु जुगादि सचु || है भी सचु नानक होसी भी सचु ||
त्या स्त्स्वरुपात माझी स्थिती व्हावी. असत शरीरात, असत सुख-दु:खात स्थिती झाल्याने माझा कित्येकदा जन्म-मृत्यू झाला. आता मी सतमध्ये स्थित व्हावे.' ना साबणाने ह्र्दय पवित्र होईल ना पाण्याने.
प्रार्थनेनेच ह्र्दय पवित्र होईल.

*३) प्रणवचा दीर्घ जप.
सकाळी गुरुमुर्तीला, इष्टमूर्तीला न्याहाळीत प्रणवचा दीर्घ जप करावा. ॐ कार सिद्धी, जीव आणि ईश्वरामधील एक सुंदर सेतू आहे. प्रणवचा दीर्घ जप एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे. एकाग्रता शक्तीचा संचय करते. 'ॐ' बीजमंत्र भोग, मोक्ष, आरोग्य, आयुष्य आणि साफल्य देणारा आहे. त्याचबरोबर हा शांती, आत्मबळ आणि बुद्धीचाही विकास करतो. आजपासून याचा जप सुरु करा. आजच दिवसभरात तुम्हाला याच्या सुंदरतेचा, याच्या महानतेचा थोडासा अनुभव होईल, उद्या आणखी जास्त होईल. दहा-वीस दिवसांनी तर तुमच्या शरीरातील पेशीमध्ये व मनात बरेच परिवर्तन होईल.

*४) ध्यान.
 सकाळी ध्यानात वेळ व्यतीत केला पाहिजे. ध्यानासमान कोणतेही तीर्थ नाही, कोणताही यज्ञ नाही, कोणतेही तप नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही स्नान नाही. कर्म करताना अधूनमधून एक-दोन मिनिटे ध्यान केल्याने तुमच्या कर्माची आणखी शोभा वाढेल आणि तुमच्या चित्तातही कर्म करण्याचा आनंद येईल.

*५) प्राणायम.
 दररोज प्राणायाम केले पाहिजेत. प्राणायाम केल्याने पापनाशिनी शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, अनुमान शक्ती, क्षमाशक्ती व शौर्यशक्ती विकसित होते तसेच स्मरणशक्तीसुद्धा वाढते. जे प्राणायामपरायण आहेत. अशा निष्पाप साधकांच्या ह्रदयात आत्मप्रकाश होतो.
श्वास घेवून रोखून ठेवून भगवन्नाम-जप केल्यास त्याचा शतपटीने प्रभाव होतो. भगवान्नामासह केलेले प्राणायाम थोड्याच दिवसांत तुम्हाला प्रसन्नचित्त, मधुमय, मधुर स्वभावी आणि सदभावनेने संपन्न करू शकतात.

*६) मौन.
 मौन राहण्याचा अभ्यास (सराव) करा. मौनामुळे आंतरिक शक्तीचा विकास होतो, मनोबल व बुद्धीबळ वाढते. बोलल्याने शरीरातील मज्जा, ओज आणि जीवनशक्ती हे तिन्ही खर्च होतात. म्हणून सारगर्भित बोला, दहा शब्दांऐवजी सहातच काम निपटवा. रोज कमीतकमी तीन तास मौन राहण्याचा अभ्यास करा.

*७) आपले दोष दूर करण्याचा दृढ संकल्प करा.
 साधन केल्याने सदभाव तसेच बऱ्याच सिद्धी येतात. परंतु आपल्यात काही ना काही दोष असतात म्हणून परम सिद्धी- ब्रम्हज्ञान होत नाही. आपले दोष दूर करण्यासाठी सकाळी दृढ संकल्प करा आणि त्यातच संलग्न रहा. यासाठी जीवनात काही व्रत-नियम असले पाहिजे, दृढता असली पाहिजे.
आपले जीवन उन्नत करण्यासाठी वरील सात महत्त्वाची कार्ये अवश्य केली पाहिजेत. साधकाने या सात गोष्टी आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर थोड्याच दिवसांत त्याच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन होईल.

॥श्री गुरुदेव दत्त॥

 *गुरुकृपा !*

१. साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवावी,  त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.

२. अध्यात्मात वाटचाल करणे करीता गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.

३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.

४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणा-या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.

 ५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.

६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.

७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.

८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.

९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.

१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.

११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.

१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.

१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.

१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.

१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.

१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल..........

तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.

१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.

१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.

२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.

२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.

२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.

२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.

२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.

२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.

२६. गुरुमंत्राचा जप करणा-याचीच आध्यात्मिक उन्नती होते.

२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.

२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु !

२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.

३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.

३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.

एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. 

गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात..

*पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?*

*पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ?*
( गल्ली बोळातील नाही)

*अध्यात्म आणि विज्ञान*

         !! श्री !!

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. 

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते. 
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. 
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..🙏
*मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो विज्ञानावर आधारित आहे*

तेरी भक्ति की खुशबू से तेरे भक्त महकते रहतें हैं

1 दिन एक राजा ने अपने 3 मन्त्रियो को दरबार में  बुलाया, और  तीनो  को  आदेश  दिया  के  एक  एक  थैला  ले  कर  बगीचे  में  जाएं ..,
और 
वहां  से  अच्छे  अच्छे  फल  (fruits ) जमा  करें .  
वो  तीनो  अलग  अलग  बाग़  में प्रविष्ट  हो  गए ,
पहले  मन्त्री  ने  कोशिश  की  के  राजा  के  लिए  उसकी पसंद  के  अच्छे  अच्छे  और  मज़ेदार  फल  जमा  किए जाएँ , उस ने  काफी  मेहनत  के  बाद  बढ़िया और  ताज़ा  फलों  से  थैला  भर  लिया ,

दूसरे मन्त्री  ने  सोचा  राजा  हर  फल  का परीक्षण  तो करेगा नहीं , इस  लिए  उसने  जल्दी  जल्दी  थैला  भरने  में  ताज़ा , कच्चे , गले  सड़े फल  भी  थैले  में  भर  लिए ,

तीसरे  मन्त्री  ने  सोचा  राजा  की  नज़र  तो  सिर्फ  भरे  हुवे थैले  की  तरफ  होगी  वो  खोल  कर  देखेगा  भी  नहीं  कि  इसमें  क्या  है , उसने  समय बचाने  के  लिए  जल्दी  जल्दी  इसमें  घास , और  पत्ते  भर  लिए  और  वक़्त  बचाया .

दूसरे  दिन  राजा  ने  तीनों मन्त्रियो  को  उनके  थैलों  समेत  दरबार  में  बुलाया  और  उनके  थैले  खोल  कर  भी  नही देखे  और  आदेश दिया  कि , तीनों  को  उनके  थैलों  समेत  दूर  स्थान के एक जेल  में  ३  महीने  क़ैद  कर  दिया  जाए .

अब  जेल  में  उनके  पास  खाने  पीने  को  कुछ  भी  नहीं  था  सिवाए  उन  थैलों  के ,
तो  जिस मन्त्री ने  अच्छे  अच्छे  फल  जमा  किये  वो  तो  मज़े  से  खाता  रहा  और  3 महीने  गुज़र  भी  गए ,

फिर  दूसरा  मन्त्री जिसने  ताज़ा , कच्चे  गले  सड़े  फल  जमा  किये  थे,  वह कुछ  दिन  तो  ताज़ा  फल  खाता  रहा  फिर  उसे  ख़राब  फल  खाने  पड़े , जिस  से  वो  बीमार  होगया  और  बहुत  तकलीफ  उठानी  पड़ी .

और  तीसरा मन्त्री  जिसने  थैले  में  सिर्फ  घास  और  पत्ते  जमा  किये  थे  वो  कुछ  ही  दिनों  में  भूख  से  मर  गया .

**** अब  आप  अपने  आप  से  पूछिये  कि  आप  क्या  जमा  कर  रहे  हो  ??

आप  इस समय जीवन के  बाग़  में  हैं , जहाँ  चाहें  तो  अच्छे कर्म जमा  करें ..
चाहें  तो बुरे कर्म ,
मगर याद रहे जो आप जमा करेंगे वही आपको आखरी समय काम आयेगा  क्योंकि दुनिया क़ा राजा आपको चारों ओर से देख रहा है  ।........

तेरी भक्ति की खुशबू से तेरे भक्त महकते रहतें हैं

​जब जब  होती तेरी रहमतों की बारिश तो बहकते रहतें हैं!!!

सिद्धयोगाचे विश्लेषण

# सिद्धयोगाचे विश्लेषण
शक्तिपात साधना हा भारतीय-साक्षात्कार-दर्शनातील प्रमुख आणि श्रेष्ठ अभ्यास आहे. श्रुतिस्मृतिपुराणोक्त अशी साधना त्यात आहे. शक्तिपात साधनेत बंध, मुद्रा, आसन, प्राणायाम विषयक योग प्रक्रिया, जागृत शक्तीच्या आधाराने सहज, स्वाभाविकपणे घडतात. मंत्रस्वरूप ओंकार साधना, नामस्मरण घडते. लययोग घडतो. शक्तीच्या प्रेरणेने ह्या सर्व योग क्रिया घडत असतात. त्यात चित्तशुद्धी, कर्म संस्काराचा क्षय हा हेतू असतो. त्यामुळे साधकाला प्रयत्नपूर्वक कोणतीच योगसाधना करण्याचे कारण नसते.
परंतु साधनेच्या पूर्वावस्थेत साधकांचा उत्साह, कर्तृत्वभाव असतो. सद्गुरू कृपा दृष्टी असते. कर्मसंस्कार, चित्ताची मलीनता यामुळे काही साधकाची साशंक वृत्ती काही काल टिकून राहते. अशा वेळी स्वप्रेरणेने त्याला काही मंत्रसाधना, जपसाधना करावीशी वाटते. शिवाय साधनेत सातत्य नसते. बैठक नेहमीच होत नसते. अशा वेळी साधनेच्या बैठकी व्यतिरिक्त साधकाला काही करावे वाटते. म्हणून साधनेच्या बैठकीत काय घडते आणि साधनेच्या व्यतिरिक्त काळात काय करावे अशा संभ्रमात तो असतो. साधक जेव्हा असे प्रयत्नपूर्वक काही करू लागतो तेव्हा साधनेच्या काळातील शक्तीच्या आवेगास प्रतिबंध निर्माण होतो.
साधनेच्या वेळी चित्तात होणाऱ्या सर्व क्रिया शक्तीच्या द्वारे होतात हे जेव्हा साधकाच्या लक्षात येते तेव्हा साधकाचा प्रयत्न, त्याची स्वत:ची काही करण्याची धाव थांबते. त्या वेळी साधकाच्या मानसिक इच्छेपेक्षा स्वतंत्र रीतीने क्रियाशक्ती सर्व योग प्रक्रिया घडवीत असते. अशा वेळी सद्गुरू पूर्णकृपा साधकावर हळूहळू होण्यास सुरवात होते. कारण त्या वेळी साधकाची निष्ठा, प्रेम आणि सातत्य यांची जोड मिळत असते.
शक्तिपात योग साधनेत मनाने पाहणे हेच योगसाधन सांगितले आहे. योगसाधनाने मनाला मनाने पाहण्याने त्या साधनेत उन्नती होत असल्याचे प्रत्ययाला येऊ लागते. मनाने मनाला पाहणे म्हणजे मनांत कोणताही विचार आला तरी त्याकडे स्वत:च्या बुद्धीने अवलोकन न करता तो तसाच विरळ होऊ द्यावा. म्हणजे हळूहळू मन लोप पावत जाईल.
योगानेच ज्ञान उत्पन्न होते व ज्ञानानेच योग प्राप्त होतो म्हणून नित्य योगाचा व ज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. योगाभ्यासानेच योग साध्य होतो म्हणून उत्साहपूर्वक योगाभ्यास केला तर चिरकालपर्यंत योगात रममाण होऊ शकतो.
# सामूहिक साधना
सामूहिक साधना ही ठराविक दिवशी ठराविक ठिकाणी दोन किंवा अधिक साधक एकत्र जमून सामूहिकरीत्या एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. या वेळी सर्वांची ऊर्जा एकत्र होऊन त्याठिकाणी शक्तीचा स्त्रोत निर्माण होत असतो. त्याचा फायदा जमलेल्या सामूहिक साधनेतील सर्व साधकांना होतो. त्यामुळे नवीन साधकांना ऊर्जा मिळून त्यांच्या प्रगतीत वाढ होते. साधकांच्या विचारांत देवाण घेवाण होते. त्यामुळे चुकीचे समज दूर होऊ शकतात. आपल्या शरीरात कोपराच्या ठिकाणी बाह्य देहात असलेले �सारिणी� हे अज्ञात चक्र ही ऊर्जा बाह्य देहात अदान प्रदान करीत साठवून ठेवते. त्याचा फायदा साधकाला होत असतो. त्यामुळे इंद्रियांच्या, मनांच्या व बुद्धीच्या शक्तीच्या सीमावाढू लागतात. साधक आपल्याला कोणते अनुभव येतात ह्याविषयी जागरूक राहून, द्रष्टेपणाने त्यांच्याकडे पाहतो. तसे करताना तो अनुभवाशी रममाण झाल्यामुळे त्याला बाह्य जगताचा विसर पडतो.
खरे तर आपली प्रगती आपल्याला ओळखता येणे शक्य आहे. साधकाने एक खासगी दैनंदिनी ठेवावी आणि रोज रात्री आपल्या आंतर जीवनाचा विचार करून त्या दैनंदिनीत साधनेविषयी लिहावे. कधीतरी एकांतात वाचलेली ही दैनंदिनी आपल्या प्रगतीचा आलेख दाखवू शकते. जागरूकपणे जर स्वत:च्या मनोवृत्तीचा शोध घेतला तर आपली श्रद्धा वाढत आहे, सात्त्विक भाव निर्माण होत आहे, व उत्साह वाढत आहे हे आपल्यालाच दिसून येते.
प्रत्येकाची उन्नती त्याच्या कलाप्रमाणे व संस्काराप्रमाणे होत असते. शक्तिपात दीक्षा झाल्यावर त्याची लक्षणे दिसतात. साधक आनंदाने हसतो, प्रसन्न असतो, प्रेमाने खेळतो, आनंदित व सुखी होतो. संसाराला भयपूर्ण मानून त्यापासून विभक्त होतो. संपत्तीला मोहित होत नाही. द्वेषाची भावना त्याला होत नाही. कामविकारांचा कार्यकारण भाव तो जाणतो. वृत्ती समाधानी बनते.
नेहमीच क्रिया घडून शरीर डोलणे वगैरे होतेच असे नाही. त्यावेळी कुंडलिनी शांतपणे क्रियाशील होत असते. प्रत्येकाचे अनुभव भिन्न असतात. त्यामुळे कोणीही असे समजू नये की आपण दीक्षा घेतली पण शक्तिपात झाला नाही. खिन्न न होता नेहमीच साधना जरूर करीत रहावे.
शक्तिपातयोगात साधनेचे एक वैशिष्ट्य असे आहे की, ह्या मार्गाचा स्वीकार करताना नियमांचीही माहिती पूर्ण करून घेणे हे प्रत्येक साधकाचे कर्तव्य आहे. एकदा सद्गुरूंच्या कृपेने शक्तिपात झाला की, शक्ती सर्व दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करते. शरीर शुद्धीनंतर शक्ती क्रियमाण होते. काही कारणाने साधकाने साधना सोडून दिली किंवा पूर्व संस्कारामुळे एखाद्या साधकाची साधना अपुरी राहिली तरी त्याचे निराकरण पुढील जन्मांमध्ये होते. 

*जय गजानन

*जय गजानन *
💐🔥आनंद🔥*💐

*पिता और पुत्र साथ-साथ टहलने निकले,वे दूर खेतों की तरफ निकल आये, तभी पुत्र ने देखा कि रास्ते में, पुराने हो चुके एक जोड़ी जूते उतरे पड़े हैं, जो ...संभवतः पास के खेत में काम कर रहे गरीब मजदूर के थे,* 
 *पुत्र को मजाक सूझा. उसने पिता से कहा ~ क्यों न आज की शाम को थोड़ी शरारत से यादगार* *बनायें,आखिर ... मस्ती ही तो आनन्द का सही स्रोत है. पिता ने असमंजस से बेटे की ओर देखा,* 
 *पुत्र बोला ~ हम ये जूते कहीं छुपा कर झाड़ियों के पीछे छुप जाएं.जब वो मजदूर इन्हें यहाँ नहीं पाकर घबराएगा तो बड़ा मजा आएगा.उसकी तलब देखने लायक होगी, और इसका आनन्द मैं जीवन भर याद रखूंगा,* 
 *पिता, पुत्र की बात को सुन  गम्भीर हुये और बोले ~ बेटा किसी गरीब और कमजोर के साथ उसकी जरूरत की वस्तु के साथ इस तरह का भद्दा मजाक कभी न करना. जिन चीजों की तुम्हारी नजरों में कोई कीमत नहीं, वो उस गरीब के लिये बेशकीमती हैं. तुम्हें ये शाम यादगार ही बनानी है, तो आओ .. आज हम इन जूतों में कुछ सिक्के डाल दें और छुप कर देखें कि ... इसका मजदूर पर क्या प्रभाव पड़ता है ,पिता ने ऐसा ही किया और दोनों* 
 *पास की ऊँची झाड़ियों में छुप गए,* 
 *मजदूर जल्द ही अपना काम ख़त्म कर जूतों की जगह पर आ गया, उसने जैसे ही एक पैर जूते में डाले उसे किसी कठोर चीज का आभास हुआ, उसने जल्दी से जूते हाथ में लिए और देखा कि ...अन्दर कुछ सिक्के पड़े थे* 
  *उसे बड़ा आश्चर्य हुआ और वो सिक्के हाथ में लेकर बड़े गौर से उन्हें देखने लगा.फिर वह इधर-उधर देखने लगा कि उसका मददगार शख्स कौन है ? दूर-दूर तक कोई नज़र नहीं आया, तो उसने सिक्के अपनी जेब में डाल लिए. अब उसने दूसरा जूता उठाया,उसमें भी सिक्के पड़े थे.* 
 *मजदूर भाव विभोर हो गया* 
  *वो घुटनो के बल जमीन पर बैठ ...आसमान की तरफ देख फूट-फूट कर रोने लगा. वह हाथ जोड़ बोला* ~
 *हे भगवान् ! आज आप ही किसी रूप में यहाँ आये थे, समय पर प्राप्त इस सहायता के लिए आपका और आपके  माध्यम से जिसने भी ये मदद दी,उसका लाख-लाख धन्यवाद,* 
 *आपकी सहायता और दयालुता के कारण आज मेरी बीमार पत्नी को दवा और भूखे बच्चों को रोटी मिल सकेगी, तुम बहुत* *दयालु हो प्रभु ! आपका कोटि-कोटि धन्यवाद* 
 *मजदूर की बातें सुन ... बेटे की आँखें भर आयीं पिता ने पुत्र को सीने से लगाते हुयेे कहा ~क्या तुम्हारी मजाक मजे वाली बात से जो आनन्द तुम्हें जीवन भर याद रहता उसकी तुलना में इस गरीब के आँसू और दिए हुये आशीर्वाद तुम्हें जीवन पर्यंत जो आनन्द देंगे वो उससे कम है, क्या ?* 
     *पिताजी .. आज आपसे मुझे जो सीखने को मिला है, उसके आनंद को मैं अपने अंदर तक अनुभव कर रहा हूँ,* 
    *अंदर में एक अजीब सा सुकून है* 
 *आज के प्राप्त सुख और आनन्द को मैं जीवन भर नहीं भूलूँगा. आज मैं उन शब्दों का मतलब समझ गया,* 
 *जिन्हें मैं पहले कभी नहीं  समझ पाया था.आज तक मैं मजा और मस्ती-मजाक को ही वास्तविक आनन्द समझता था, पर आज मैं समझ गया हूँ कि लेने की अपेक्षा देना कहीं अधिक आनंददायी है.*

सुगंध आणि गुरू

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ न अत्तर घेता आपण नुसते बसलो  तरी आपल्याला फुकटचा वास मिळतो. 
" गुरू हा त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. "  त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी देहातून - मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात, त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं आपल्याही मनात पवित्र विचार येऊ लागतात, त्याचा परिणाम आपली बुद्धी व प्राक्तन यावरही होतो.
    म्हणूनच म्हणतात,
        न लगे मुक्ती, धन, संपदा...
              संत संग देई सदा...
म्हणून चांगल्या लोकांची संगत असेल तर मनुष्य वाईट मार्गाने जाऊनच शकत नाही.
 श्री स्वामी समर्थ 💐💐

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸‌  प्रवचने  ::  २६ मे  🌸*

*भगवंताचे  स्मरण  ही  सद्‍बुद्धी.*

परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? 
ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. 
म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. 

मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते.

बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? 
याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे.
प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. 
तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. 
म्हणून, बुद्धीदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्‍बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. 
भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. 

सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे, हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. 

भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे, ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. 
इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणे, याला अनुसंधान असे म्हणतात. 
भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय, आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट आहे. 
एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. 

भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की, "देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको."

*१४७.  नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे.  तेथे दुसरी एखादे गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा.*

*श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, May 25, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २५ मे 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २५ मे  🌸*

*आनंद  मिळविण्यासाठी  वासना  भगवंताकडे  वळवावी.*

घरामधे कसे हसूनखेळून मजेत असावे. 
आपली वृत्ती अशी असावी की, ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. 
इतर संपत्ति कितीही दिली तरी पुरे पडत नाही. पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. 
जीवन हे मूलतः आनंदमय आहे; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. 

आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. 
आनंद मिळविणे हे सोपे आहे. पण हे समजून, आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. 

सर्व जगाला आनंद हवा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे. पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. 

फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का ? 
कुत्र्याच्या तोंडात हाड असताना, स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. परंतु तो हाडूक काही सोडीत नाही. 
विषयाचा आनंद हा असाच असतो. 

कोणतीही वस्तु अस्तित्वात नसतानाही होणारा आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे.
वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार ? 
खरोखर, वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो. 
त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते; पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. 

वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. 
वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा, हा मनुष्याचा शत्रु असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. 
वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असूनसुद्धा, वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. 

ज्याने वासनेला जिंकले, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. 
वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे.

*१४६.  चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, May 24, 2019

फुकाचा अभिमान

एखाद्या जातीत, घराण्यात, धर्मात जन्माला आल्याचा, किंवा आपण करत असलेल्या कर्मांचा, आपल्या शिक्षणाचा आपणास अहंकार येत असेल, तर समजून घ्या, आपली जात, घराणं, धर्म, आपले शिक्षण आणि अर्थातच आपण सुद्धा विनाशाकडे वाटचाल करीत आहोत. थोडक्यात, ज्या वृक्षाला अहंकाराचे फळ येत असेल, त्या वृक्षाचा विनाशकाल दूर नाही. आणि ज्या फांदीला अहंकाराचे फळ येते त्या फांदीवर परत भगवद्भक्तीरूपी विहंग विश्राम करण्यास एक क्षण देखील येत नाही. म्हणजेच, पुन्हा उद्धार नाही.
मानवाला अप्रिय अशा प्रत्येक भावनेचे कारण हे दुसरे तिसरे काहीही नसून अहंकार आहे, मीपणा आहे. मीपणा सोडून बघा, स्वामी दूर नाहीत.
*॥श्री स्वामी समर्थ॥*

कलयुग आणि संत

पुर्वी ज्याची सावली जरी अंगावर पडली तरीलोकांना भ्रष्टाता वाटत होती त्याच लोकांन ची दार आता वाट पाहत की आपल्या दारी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी कधी येईल आणि आपला उद्धार होईल  ,,,, 
तसेच चोखामेळलाँच ही आहे आयुष्य भर कधी ही मंदिरात कधी प्रवेश मिळाला नाही
त्यांची भाव भक्ती न रचलेले अभंग मोठं मोठया व्यास पीठा वरून उचच वर्णीय चांगल्या गायकां कडून गायली जातात 
संत बाळू मामा शेळ्या मेंढ्या राखत गावो गावी हिंडले लोक उद्धार केला आज ट्रक भरून गड्या भरून लोकांचा लोंढाच्या लोंढा अदमपुरला येतो 
स्वा मी समर्थ साईबाबा नि आयुष्य फाटक्या कपड्यात त घालवल ,, सिधीचा वापर करून कधी ही लोकांना आपलंसं केलं   नाही खऱ्या संतांची त्याच्या चारित्र्य वरून त्याच्या भाव भक्ती आणि लोकोद्धार भावनेने त्याची ओळख पेटते
आज ही खरे संत आहे  आज ही त्यांचे कार्य अविरत चालू आहे अश्या संताना ओळखा  त्याच्या कडून फक्त भक्ती भाव घ्या   सिद्धी च्या जोरावर अनेक जण स्वतःची प्रसिध्दही करणाऱ्यांच्या वाशी जाऊ नका

हे तर योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचेच वचन आहे की प्रत्येक युगात मी आहे.. किंवा कलियुगात जे संत आणि सिद्धपुरुष होतील त्यांना सर्वसामान्य सहजासहजी स्विकारणार तर नाहीतच वरुन त्यांच्याबद्दल अपशब्द वापरतील, त्यांना त्रास देतील, आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ते योग्य संतसंगतीमध्ये अनुभूती मिळवून मला प्राप्त होतील. 🙏🏻

आत्मा का अज्ञान सारे दुखों का मूल है यह बात सच है।


--------------------------------------------------------------
आत्मा का अज्ञान सारे दुखों का मूल है  यह बात सच है।
मै कौन हूँ यह जान लेने के लिये है कि मै देहमन नहीं हूं, मै आत्मा हूं।देहमन के रुप मे मै बहिर्मुखी हो जाता हूँ जिससे सारे दुखकष्ट उत्पन्न होते हैं।आत्मा के रुप मे मै स्व मे स्थित हो जाता हूँ, स्वस्थ हो जाता हूँ जो शांति और आनंद का स्वत:सिद्ध अनुभव है।
भेदभाव किसी के भी साथ नहीं है।आदमी खुद शांत और स्थिर नहीं है इससे भेदभाव लगता है।
रुकना होता है।जाहिर है सिवाय अपने आपमे रुकने के कोई ओर जगह नहीं रुकने की।'दूसरे'मे रुकना,रुकना नहीं।आदमी चाहे किसी भी,कितनी भी सुखद,सुविधाजनक जगह क्यों न गया हो वह जब तक वापस अपने घर नहीं लौटता,सहज,स्वस्थ नहीं हो पाता,भले ही अपना घर एक सामान्य झोंपडी ही क्यों न हो!फिर अपनी अंत:स्थित आत्मा मे वास करना कितना आरामदायक होता होगा यह विचारने की बात है।
यही कारण है आदमी खुद से अलग नहीं किया जाता।वह स्वयं अलग होता है।वृत्तियों का आवेग उसे खुद से दूर ले जाता है।उदाहरण के लिये क्रोध और भय की वृत्तियां,राग तथा द्वेष की वृत्तियां।ये वृत्तियां आवेगात्मक रुप मे उठती हैं।इनके साथ होकर जैसे क्रोध के साथ आवेगयुक्त होकर हम आक्रामक हो जाते हैं,भय के आवेग के साथ हम पलायनवादी हो जाते हैं।
सोचने की बात है जब क्रोध या भय की वृत्ति उठे तब क्या हम अचल,स्थिर रह सकते हैं,अपने आपमे रुके हुए रह सकते हैं?
जानना जरुरी है।हर कोई वृत्ति नहीं उठेगी।जो पूर्व संचित वृत्ति है वही उठेगी।यदि आदमी अनजान है तो क्रोधावेग के साथ वह आगे की ओर बढ जायेगा,भयावेग है तो उसके साथ पीछे चला जायेगा बचावमुद्रा मे एक कठपुतली की तरह जिसे पता ही नहीं कि क्या हो रहा है उसके साथ।
उसे जानना होगा कि जब क्रोध उठे तब रुका रहा जा सकता है,जब भय उठे तब भी रुका रहा जा सकता है।यह रुकना जरुरी है।रुकने के लिये अनेक ध्यान विधियां हैं।त्राटक भी है।त्राटक मे एक दूरी कायम करके चित्त ठहर जाता है।यह ठहराव ही रुकने का अभ्यास है अन्यथा मानसिक दृश्यों की दूरी के अनुभव के साथ जुडा चित्त निरंतर गति मे बना रहता है अर्थात अस्थिर रहता है।
यह घडी के पेंडुलम की तरह है निरंतर गतिशील,निरंतर अस्थिर।रुक जाय तो घडी बंद हो जाय।इसी तरह चित्त रुक जाय तो समय नहीं रहता।
चित्त की अस्थिरता ही संसार है।चित्त की स्थिरता ही ध्यान है,योग है,समय का,संसार का अभाव है।यही स्व मे,सत्य मे स्थिति है।
सत्य के लिये कहा है-
खोजो और खो दो।
मत खोजो और पा लो।
उस सत्य को अपने आपके रुप मे।वह सत्य ही सबके अनुभव के रुप मे है।अपने अनुभव को छोडकर हम सत्य को खोजते हैं तो वह पररुप मे मिलेगा।वह है नहीं।सत्य स्व रुप मे है।इसलिये अपनी तरफ लौटना चाहिए, अपने मे स्थिर होने का प्रयास करना चाहिए।सारा समाधान इसीमे है अन्यथा बडी समस्या है।
हर आदमी अपने आपमे रहना चाहता है शांत, स्वस्थ।
अशांत,अस्वस्थ रहना किसी को प्रिय नहीं।वृत्तियां संचित हैं तो वे तो उठेंगी ही।उनका काम यही है।साधक उनका उठना पसंद नहीं करता।वह जानता है वृत्तियों का आवेग स्व मे नहीं टिकने देगा।और संसारी को तो कुछ भी पता नहीं होता।वह तो हर वृत्ति के आवेग के साथ बह जाता है।उसे पता नहीं होता कि किस प्रकार उसे स्व से तोडकर बाहर की ओर खींचा जा रहा है।यदि उसे पता चल जाय तो वह कभी भी खुद से तोडा जाना और बाहर की ओर खींचा जाना पसंद नहीं करेगा।
उसे अभ्यास और वैराग्य पूर्वक साधना करनी होगी ताकि वह अपने मे ठहर सके,अपने घर मे  रह सके।
गीता ने रागद्वेष के वश मे होने को बाधक बताया है।यदि हम अभ्यास और वैराग्य का समर्थन करेंगे तो हम अपने आपमे रहेंगे,यदि रागद्वेष के वश मे होते हैं तो हम 'दूसरे'मे होंगे।करीब करीब सारा 
जगत 'दूसरों'मे स्थित है,खुद से टूटा हुआ।
और वह खुद से तोडा भी नहीं जाना चाहता।यदि वह अभ्यास और वैराग्य की जगह रागद्वेष का समर्थन करता है त़ो फिर स्थिरता के लिये वह दूसरों की दया पर ही निर्भर है।यही कारण है जो समस्या का स्थायी समाधान नहीं मिलता।यदि वह रागद्वेष को छोडकर अभ्यास तथा वैराग्य द्वारा अपने आपमे रुकने मे कामयाब हो जाता है तो उसमे बडी सामर्थ्य आ जाती है-प्रज्ञापूर्ण सामर्थ्य।सिर्फ ऐसे ही नहीं।वह वैश्विक शक्ति से जुड जाता है।

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा

सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपालबाबा
महाराज सर्वप्रथम १९८० साली विशाखापट्टणम 
रेल्वे स्टेशनवर अवतरित झाले.दिगंबर,कंबरेच्या
खालपर्यंत जटा,हातांच्या नखांच्या भेंडोळ्या, पायांच्या नखा उर्ध्वमुख.जसे शेकडो वर्षांच्या समाधीतुन उठुन आलेत.हे सत्य आहे.पृथ्वी संतुलन व संचलन हे होते हिमालयातील सिद्धाश्रमातुन ज्याला बद्रीक्षेत्र म्हणतात व ते अदृश्य असुन येथील
मुख्य आहेत महावतार बाबाजी जे नेहमी १६ वर्षांच्या युवकासमान दिसतात.बाल श्रीपाद पिठापुरात एकदा मातामह श्री बापन्नाचार्यांच्या मांडीवर बसले असतां श्रीपादांनी आजोबांच्या
भ्रुमध्यावर अंगठा दाबला.आजोबांना त्या समाधीत
हिमालयातील बाबाजींचे दर्शन झाले.श्रीपाद आजोबांना म्हणाले की हा युवक म्हणजे मीच.
महावतार बाबाजींसोबत ज्या साध्वी आहेत त्यांचे 
नाव "तारम्मा",या म्हणजेच श्रीपादांच्या सहोदरी
"श्री वासवी कन्यका परमेश्वरी".जेंव्हा विशिष्ट कार्य असते तेंव्हा बाबाजी त्या ठिकाणी पंचमहाभुतातील एका अथवा सर्व घटकांच्या
आधारे रुप धारण करुन प्रकटतात.कार्य पुर्ण झाले की त्या त्या महाभुतात विघटीत होतात.
सतगुरु श्री गोपालबाबा महाराज हे महावतार बाबा
व हेच श्रीपाद श्रीवल्लभ.श्रीपादांच्या पिठापुर महासंस्थान संकल्पाचे कार्यास्तव पिठापुरात अवतरले.बाबा ब-याचदा स्रियांना "तारम्मा" नावाने
हाक मारायचे.२०१२ साली मी एकदा बाबांच्या हातात महावतार बाबांवरील पुस्तक दिले तेंव्हा बाबांच्या चेह-यावर दिव्य हास्य प्रकटले. पुस्तकाच्या कव्हरपेजवर महावतारबाबांचा फोटो होता,त्याच्या छातीवर गोपालबाबांना "GOPAL"
असे लिहीले.

Satguru Naath Parampita Parmatma 
Shri Gopalbaba Maharaj first time 
appeared on railway station at Vishakhapattanam in 1980.That time
Baba's hairs were grown below his waist.The hand nails were in bundles and the feet Nails pointing upwards,showing that he arrived here after a samadhi of hundreds of year. This is the truth.The earth is balanced and controlled from Sidhhashram,a hidden place in Himalaya in Badri Kshetram.The chief here's Shri 
Mahavatar Babaji who always seems to be youth of 16 years age.Once Child 
Shripad in Pithapur,seating on lap of
Grandfather Bapannacharya,touched
grandpas forehead.In samadhi grandpa saw a youth of 16 in Himalaya.
Shripad said that's me as Mahavatar
Babaji.A lady sage,sister of Babaji
named "Taramma"is always accompanying Babaji.She is Shripad
Swami's Sahodari Shri Vasavi Kanyaka 
Parmeshwari Mata.When some special task is there Babaji appears there with any or all panch mahabhutas.As the task overs again Babaji disintegrate.
Satguru Shri Gopalbaba Maharaj himself is Mahavatar Babaji hence
Shripad Swami.With the at most resolutions of Shripad of Shripad 
Maha Sansthan at Pithapur,Baba appeared.Many times Baba called 
the ladies as "Tarammaa".During 2012
I gave a book on Mahavatar Babaji  in 
Baba's hand,Baba's smile was so Devine.He wrote on the chest in photo of Mahavatar Babaji as "GOPAL".

Digambara Digambara Shripada Vallabha Digambara!

Digambara Digambara Narsinh Yativar Digambara!

Digambara Digambara Shri Gopal Guruvar Digambara!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा नरसिंह यतीवर दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा श्री गोपाल गुरुवर दिगंबरा!

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण

*।। श्री स्वामि समर्थ ।।*

*या जगात अनेक लोक हे खऱ्या मार्गदर्शना पासून वंचित आहेत , संकट ग्रस्त आहेत विविध अडचणींना त्रासलेले आहेत आपापल्या ग्रुप वर नक्की share करा कुणी सांगावे 1000 ला एखादा सेवे स लागेल व अश्या मधील एखाद्याचा आध्यत्मिक प्रवासास सुरुवात होईल आणि स्वामी महाराजांना तुमची ही कृती नक्की आवडेल*

*श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाचे पारायण पद्धती* 
प्रथम दिवस १ ते ६ अध्याय 
दुसरा दिवस ७ ते १२ अध्याय 
तिसरा दिवस १३ ते १८ अध्याय 
चौथा दिवस १९ ते २२  अध्याय 
पाचवा दिवस २३ ते ३४ अध्याय 
सहावा दिवस ३५ ते ४२ अध्याय 
सातवा दिवस ४३ ते ५३ अध्याय

*श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय पठणाचे फल* 
अध्याय १ घरात शांती नांदते सुखाची प्राप्ती 
अध्याय २ मनःक्लेश निवारण 
अध्याय ३ नागदोष निवारण संतानप्रतिबंधक दोष निवारण 
अध्याय ४ मुलींना योग्य वरप्राप्ति गुरुनिंदा दोष निवारण 
अध्याय ५ विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती 
अध्याय ६ पितृ शापापासून निवृत्ती 
अध्याय ७ अज्ञान निवृत्ती विवेक प्राप्ति 
अध्याय ८ संतान प्राप्ति लक्ष्मी कृपा कटाक्ष लाभ अध्याय ९ प्रारब्ध कर्म नाश 
अध्याय १० दौर्भाग्य नाश 
अध्याय ११ दुर्गुण यापासून मुक्ती 
अध्याय १२ शरीर आरोग्यप्राप्ती 
अध्याय १३ व्यवसाय वृद्धि पशु वृद्धि 
अध्याय १४ आपदा निवारण उत्साह वृद्धि 
अध्याय १५ अकारण कलह निवारण पूर्वजन्म कृत दोष निवारण 
अध्याय १६ धनाकर्षणशक्ती वृद्धी 
अध्याय १७ सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद 
अध्याय १८ पापकर्मांचा नाश भाग्य वृद्धि 
अध्याय १९ मानसिक क्लेश निवारण 
अध्याय २० कष्ट नष्ट निवारण 
अध्याय २१ अध्यात्मिक लाभ पुण्यवृद्धी 
अध्याय २२ कर्मदोष निवारण 
अध्याय २३ ऐश्वर्य प्राप्ति 
अध्याय २४ दांपत्य सुख 
अध्याय २५ आर्थिक समस्या दुरी करण
अध्याय २६ दूर्दैव नाश संत संतानप्राप्ती 
अध्याय २७ ऐश्वर्यलक्ष्मी प्राप्ती 
अध्याय २८ विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी 
अध्याय २९ पितृ दैवतांचे आशीर्वाद 
अध्याय 30 उज्ज्वल भविष्य होण्यास 
अध्याय ३१ विद्या ऐश्वर्या यांची प्राप्ती 
अध्याय ३२ सद्गुरू कृपा कटाक्ष प्राप्ती होण्यासाठी 
अध्याय ३३ अनुकुल विवाह होण्यास 
अध्याय ३४ ऋणमोचनासाठी 
अध्याय ३५ वाक्सिद्धीसाठी 
अध्याय ३६ अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी 
अध्याय ३७ जीवनात स्थैर्य 
अध्याय ३८ आत्म स्थैर्य 
अध्याय ३९ सर्प दोष निवारण 
अध्याय ४0 असाध्य कार्यात यश मिळवण्यासाठी 
अध्याय ४१ लोकनिंदा परिहारार्थ 
अध्याय ४२ हरवलेले मुल सापडण्यास 
अध्याय ४३ अष्ट ऐश्वर्य प्राप्ती 
अध्याय ४४ उज्वल भविष्यासाठी 
अध्याय ४५ सर्व क्षेत्रात वृद्धी 
अध्याय ४६ त्वरित विवाह साठी 
अध्याय ४७ सर्व शुभफल मिळण्यास 
अध्याय ४८ आर्त अर्थार्थी जिज्ञासू मुमुक्षु याना चारही पुरुषार्थांची सिद्धी साठी 
अध्याय ४९ समस्त कर्म दोषांपासून निवृत्ती 
अध्याय ५० गुरु निंदा केल्यामुळे आलेले दारिद्र्य दूर होण्यास 
अध्याय ५१ जलगंडादिका पासून रक्षण 
अध्याय ५२ सर्व समस्या व अप्रयत्नाने दूर होतील 
अध्याय ५३ महापाप ध्वंस होण्यास

।। सर्वम् श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य चरणार् विंदार्पण मस्तु।।

श्री वासवी कन्यका देवीच्या जयंती उ

शुक्रवारचा दिवस होता.श्री वासवी कन्यका देवीच्या जयंती उत्सवाचा शुभ समय होता.श्रीपाद क्रुष्णा नदीच्या जलावरुन चालतच पैलतीराला गेले.आम्ही मात्र नावेने पोहचलो.सकाळचे सात वाजले असतील.तिकडे तिरुमल क्षेत्रातही श्री वेंकटेश्वर स्वामी व श्री अलेमेलु मुकांबिका यांच्या अर्चनेची शुभ वेळ होती.
-श्रीपाद श्रीवल्लभ संपुर्ण चरितामृतम्, अध्याय २८.

It was Friday. It was holy time of celebration of birthday of Shri Vasavi Kanyaka Devi.Shripad Swami crossed Krishna river by walking over the water and reached other side of bank.We reached by a boat.It was the holy time of worshiping Shri Venkateshwar Swami and Shri Alemelu Mukambika Devi there in Tirumala Kshetram.
-Shripad Shri Vallabh Sampoorna Charitamrutam, Chapter 28 th.

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara!
Digambara Digambara Narsinh Yativar Digambara!
Digambara Digambara Shri Gopalbaba Digambara!

*देवी देवतांचे विविध जाती-वर्णांमधले अवतार*---

*देवी देवतांचे विविध जाती-वर्णांमधले अवतार*-----

--- केवळ क्षत्रिय कुळात जन्मलेले आपले लाडके छ. शिवाजी महाराजच दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापुरम् यांचा अवतार आहेत, असे नाही, तर यांसह इतिहासात अनेक ऊदाहरणे होवून गेली

---(परवाच्या१४ मे ला म्हणजे) वैशाख शुद्ध दशमीस वासवी कन्यका/ कन्यका परमेश्वरी/ कन्याकुमारी देवीचा वैश्य समाज/कुळात मध्यान्हीस अवतार (जन्म) झाला, 

---याचप्रमाणे जन्माष्टमीस कृष्णाचा मथुरेत जन्म झाला, तेव्हाच देवीचा गवळ्याच्या घरात नंद व यशोदेच्या पोटी वैश्य (सध्याचे ओबीसी, व्यापारी/ बिजनेसमन्) कुळात जन्म झाला, जिला कृष्णाशी आदलाबदली करुन वसुदेवाने मथुरेत आणले

--- जेजुरीच्या देवाची राणी म्हाळसादेवीही (मोहिनी रूपातली पार्वती) वैश्य / वाण्याच्या कुळात अवतार घेतलेली होती

--- बानूबाई देवी पूर्वजन्मातली जयाद्री असून धनगरांच्या कुळात जन्म घेतला होता

--- तसेच संत नामदेव हेच पुढे संत तुकाराम अवतार घेवून जन्मले. हे दोघेही महाभारतातील ऊद्धवाचाच अवतार आहेत. ऊद्धवाची कृष्ण/विष्णूबद्दलची भक्ती ईतकी लोकप्रिय आहे, की एकदा शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे किर्तन ऐकत असताना शत्रूंनी त्या मंदिरास सर्व बाजूंनी घेरले, महाराजांस याची कल्पना होती, तरी पण तुकाराम महाराजांच्या दिव्य शक्ती वर विश्वास ठेवून ते किर्तन ऐकतच राहीले, थोड्याच वेळात शत्रूपक्षास १००-२०० शिवाजी दिसे लागले, प्रत्येक ठिकाणि त्यांना शिवाजीच दिसू लागले, व त्यांनी भितीने पळ काढला

---हनुमानानेच भगवंताच्या सल्ल्यानुसार  साईबाबा/साईराम हा संत अवतार घेतला, याचाही ऊल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात आहे

--- साईबाबांचे २ शिष्य बडे बाबा व अब्दुल बाबा हे सुद्धा त्यांच्या मागील जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास येवून गेल्याचा उल्लेख आहे

--- पातंजली मुनी व नित्यानंद प्रभू हे बलरामाचा अवतार आहेत

---चैतन्य महाप्रभू हे संत रूपात श्रीकृष्णाचा अवतार आहेत

-- रामदास स्वामी हे अंशात्मक रूपात हनुमानाचाच अवतार होते.

--- स्वतः ब्रह्मा हा कालिदास व याज्ञवल्क्य ऋषींचा अवतार होय

--- भीष्म हे ८ वसूंपैकी एकाचा शापामुळे झालेला अवतार असून अभिमन्यू हा बुध ग्रहाचा अवतार होता, तर द्रौपदी ही वायुपत्नी भारती, आदिती हि देवकी म्हणून जन्मली, स्वतः शिव अंशात्मक अश्वत्थामा होता, तर गुरू ग्रह /ब्रहस्पती द्रोणाचार्य म्हणून जन्मले, सत्यवती कोळीणीचा मुलगा व्यास ऋषी हा विष्णूचाच अवतार होत. महाभारतात कौरवांकडचा जीवंत राहिलेला कृतवर्मा व सात्यकी हे मरूद्गणाचे अवतार होते

--- अंबा राणी हीच शिखंडी रूप घेवून जन्मली होती,तर कंस हा मागील जन्मीचा कालनेमी राक्षस होता. जरासंधरूपात विप्रचित्ती (राहूचा पिता) याने जन्म घेतलि होता

--- विष्णूचे द्वारपाल जय विजय हे शापामुळे पुढल्या जन्मांत हिरण्यकश्यपू व हिरण्याक्ष, रावण व कुंभकर्ण व शिशुपाल व दंतवक्र हे झाले.

---धर्मदत्त ब्राह्मण पुढच्या जन्मांत दशरथ क्षत्रिय राजा झाला, तर मागल्या जन्मात पिशाच्चयोनीत झाडावर राहणारी नंतरच्या जन्मात कौसल्या होवून पुण्याच्या जोरावर श्रीरामाची माता बनली, राम सुद्धा क्षत्रिय कुळात जन्मला, तर ब्राह्मण कुळात जन्मलेल्या सुदाम्याने खोटे बोलल्याने कर्मानुसार त्याला दारिद्र्य आले, कोण कुठल्या जन्मात कोणत्या जातीत स्त्री/ पुरूष रूपांत जन्म घेईल हे सांगणे कठीण आहे, कारण जाती लिंग धर्माचा भेद आपल्याला असतो, पण आत्म्याला नसतो.

करंजी येथील 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ'

करंजी येथील 'श्रीदत्तप्रभूंचं आजोळ'

स्थान: दिंडोरीजवळ, वणी कडे जाताना नाशिक-वणी मार्गांवर, ओझरखेड धरणाच्या उजव्या बाजूला.   
सत्पुरूष: श्री दत्तात्रेय. 
विशेष: श्री दत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती, कर्दम मुनींचा आश्रम.
 श्रीदत्तप्रभूंचं आजोळ
(महर्षी कर्दममुनींचा आश्रम) करंजी
त्रेतायुगात मार्गशिर्ष पौर्णिमेच्या भर माध्यान्ही, महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्ररुपानं भगवान् श्रीदत्तात्रेयांनी अवतार धारण केला. ब्रम्हदेवांच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र, दुसरे महर्षी अंगिरस, तिसरे महर्षी अत्रि आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्रि आणि महर्षी अंगिरस यांना मानाचं स्थान थेट सप्तर्षींमधेही आहे. साक्षात् श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रिंची पत्नी महासाध्वी माता अनसूया! अत्रिमुनींचं ज्ञान, तपःसामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी-देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसूया या सौंदर्यवती-सुशील कन्येचा अत्रिमुनींशी विवाह लावून दिला. 'अनसूया' म्हणजे 'असूयारहित'! अश्या या महान सती श्रीअनसूयेचं माहेर अर्थात् श्रीदत्तप्रभूंचं आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) आहे. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ 'करंजी' या गावी, अगदी भर नाशिक-वणी मार्गावर! वणीकडे जाताना डाव्या बाजूला लागतं ओझरखेड धरण आणि उजव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ ३-४ किमी आत हे पवित्र स्थान आहे. यालाच 'निर्जल मठ' असंही म्हणतात. याच परिसरात पराशर, मार्कंडेय, कण्व या तपस्वी महर्षींचेही आश्रम होते. साक्षात् श्रीकृष्णानं ज्यांचं वर्णन 'सिद्धानां कपिलो मुनीः' असं केलंय, त्या कपिलमुनींनीही या स्थानी तपश्चर्या केलेली आहे.
श्रीदत्तप्रभूंची पद्मासनस्थित मूर्ती अन्यत्र कोठेही पहायला मिळत नाही व एकमेव भारतामधून इथे पहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती येथे तप केलेल्या श्रीशिवदयाळ स्वामींना प्रसादस्वरुप दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेमतेम एक वित उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.
श्री दत्तप्रभूं
इथे आणखी एक आश्चर्य असं पहायला मिळालं की परिसरात असलेली सगळे कुत्रे दुपारी १२ च्या आरतीला देवळाच्या गाभा-याच्या आत जमतात आणि आरती संपल्यावर निघून जातात.
दत्तप्रभूंचे आजोळ, श्री क्षेत्र करंजी

श्रीदत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ...

श्रीदत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ...
जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.
*अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||*
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.
*ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||*
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.
*अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||*
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.
*झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||*
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.
*क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||*
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.
*आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७||*
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.
*सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||*
*दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||*
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.
*किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||*
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.
*विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||*
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.
*जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||*
*विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||*
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.
*एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||*
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?
*दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||*
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.
*बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||*
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.
*एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||*
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?
*दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||*
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.
*जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||*
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.
*स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||*
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.
*पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||*
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.
*करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||*
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!
*शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||*
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस
*जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||*
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.
*करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||*
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.
*वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||*
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.
*झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||*
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.
*ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||*
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.
*पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||*
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.
*हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||*
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.
*निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||*
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.
*एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||*
*संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||*
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.
*यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||*
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.
*रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||*
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.
*तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||*
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.
*अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||*
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?
*आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||*
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.
*मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||*
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.
*डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||*
*नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||*
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.
*करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||*
*सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||*
*दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||*
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.
*बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||*
*यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||*
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.
*अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||*
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.
*सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||*
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.
*वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||*
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!
*थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा?
*अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||*
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.
*तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||*
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन 'जय जय श्री गुरुदेव' म्हणावे
*॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥*

दत्त सँप्रदाय आध्यत्मिक गुरू

श्री क्षेत्र टिंगरी, गाळणे रास्ता (गाळणे शिवार), गाळणे गाव, तालुका मालेगाव. जि. नाशिक
स्थान: श्री क्षेत्र टिंगरी, गाळणे रास्ता (गाळणे शिवार), गाळणे गाव, तालुका मालेगाव. जि. नाशिक.
सत्पुरूष: स्वामी त्रिशक्ती (ठाकूर स्वामी)
विशेष: श्रीपाद श्री वल्लभांचे आदेशानुसार स्थापना, श्रीपाद श्रीवल्लभ जागृत स्थान 

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी
॥ श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ परमात्मने नमः॥

नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे | वसित्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव ||
कृते जनार्दनो देवः त्रेतायां रघुनंदनाः | द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ||

काषायवस्त्रं करदंड धारिणं | कमंडलुं पद्मकरेण शंखं | 
चक्रंगदां भूषित भूषणाढ्यं | श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||

ज्यांना पिठापुरास जाणे शक्य नसेल पण श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्यांनी गाळणे येथील गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानास अवश्य भेट द्यावी. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दिव्यमंगल स्वरूप आणि समस्त गुरुदत्त परंपरा यांच्या दर्शनाने, श्रीवल्लभांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या ह्या स्थानाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य एका निराळ्याच आनंदाची, भक्तिरसाची उमेद देणारा आहे यात संशय नाही.

मालेगाव नवीन एस. टी. स्टेंड येथून कुसुंबा रस्त्याने केवळ २२ कि. मी. अंतरावर टिंगरी गावापासून गाळणे रस्त्यावर असलेल्या ह्या स्थानाबद्दल फारच कमी लोकांना कल्पना असेल. अतिशय नयनमनोहारी स्वरूपात असलेल्या श्रीवल्लभांच्या रुपात आणि सभोवतालच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या ह्या स्थानात पारायण, जप, साधना करण्याचे फळ हे पिठपुरात केलेल्या कर्माइतकेच आहे. तसेच, सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या ह्या स्थानात अध्यात्मिक उर्जा व्यापून आहे. सर्वत्र व्यापलेल्या श्रीगुरुंच्या चैतन्याचा विशेष व्यक्त होत असल्याचा अनुभव इथे आल्यावाचून राहत नाही. सर्व स्थानांच्या तुलनेत या ठिकाणी चैतन्य तर आहेच, पण या रूपाचा आणि स्वामींच्या रूपाचा एक आगळा वेगळाच संबंध आहे. 

श्री क्षेत्र टिंगरी- श्रीपाद पादुका 
श्री क्षेत्र टिंगरी- श्रीपाद पादुका 
श्री स्वामी त्रिशक्तींच्या बद्दल
श्री स्वामी त्रिशक्ती महाराज मुळचे आंध्र प्रदेशातले. जनकल्याण, व्याधी निवारणार्थ परोपकार करीत आपले शरीर, मन आणि जीवन चंदनाप्रमाणे लोकोपयोगी आणणारे महान निरपेक्ष कर्मयोगी. यांचे आराध्य श्री जगदंबा असून, साईबाबांची विशेष प्रीती यांस होती. श्री अंबिकेने यांना विशेष वरप्रदान करून साक्षात्कार दिला. असे असून सुद्धा, महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तास कुक्कुटेश्वर स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कुमार रुपात दर्शन देवून पुढील कार्याची सूचना दिली. गुरुस्थानी श्रीपाद श्रीवल्लभ असलेल्या "स्वामीजीं" च्या अध्यात्मिक अधिकाराची सीमा तेच जाणो. या प्रमाणे गुरुने भक्तश्रेष्ठास प्रेरणा देवून २००९ साली प्रथम महाराष्ट्रात धाडले. तेव्हापासून स्वामीजींनी असंख्य जनमानासांचे होम-हवन तसेच चित्र-विचित्र उपाय सांगून कल्याण केलेले आहे. या सर्व श्रीपादांच्या लीला आहे, आणि त्यातला आनंद घेत असल्याचा निर्मळ भक्तीभाव हीच श्री स्वामींची अनन्यभक्ती आहे.
 
सेवाकार्यात रमलेल्या या काळात श्री स्वामीजींना श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी मूर्ती-पादुका देवून मंदिर स्थापनेचा आदेश केला. वेळीच दोन व्यक्तींनी २४ गुंठा मापाची जागा दान करून स्वामिजिंना दिली. मूर्तीचा शोध घेण्यास स्वामीजी जयपूर साठी अग्रेसर झाले. श्रीचरणांच्या संचाराच्या तसबिरीची एक प्रत बनवून ती मुर्तीकारास द्यावी असा मानस घेवून स्वामीजी जयपूरला पोहोचले. कितीतरी शोध करून सुद्धा हवी तशी शिळा सापडत नव्हती. गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. आज श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आहे, आणि आज काही चमत्कार होणार अशी प्रेरणा घेवून स्वामीजी शोधार्थ निघाले, ते एका शिळेच्या समोर येवून उभे झाले. विचारल्यास, ५ वर्षांपासून सदर शिळा इथेच आहे, कुणीही विकत घेत नाही असा निरोप व्यक्तीने दिला. शिळा मूर्तीस योग्य अशीच होती. श्रीगुरुंच्या महिमेचे वर्णन कोण करू शकेल? वेद सुद्धा नेति नेति म्हणून मौन झालेत. या तसबिरीतून मूर्ती घडवली असली तरीही या तसबिरीत आणि मूर्तीच्या चेहऱ्यात कमालीचा फरक आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी- श्री श्रीपाद 
प्रतिष्ठापना - तिथी महत्व
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहुर्तास मंदिराचे बांधकाम सुरु झाले. चरित्रमृतात सांगितल्या प्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आजोबांसमवेत तसेच आपल्या वडिलांबरोबर अग्निहोत्र करीत. मंदिराचे कामासाठी सुद्धा वापरलेली सर्व राशी हि श्री स्वामीजींनी केलेल्या हवनांच्या मार्फत श्रद्धाभावाने भक्तांनी दिलेले दान होते. अहाहा! काय हा विलाक्षण सोहळा! मंदिराची प्रतिष्ठापना दि. २४-सप्टेंबर-२०१५ रोजी ठरली. या तारखेस श्रवण नक्षत्र असून, परिवर्तन एकादशी आहे. या प्रमाणेच, हि तारीख श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामींची विशेष संख्या २४९८ (२४ तारीख, ९ महिना, २०१५ -> २+०+१+५=८) चे निदर्शक आहे. श्रवण नक्षत्र आणि परिवर्तन एकादशीचे महत्व म्हणून, या स्थानाचे महात्म्य असे, कि आलेला भक्त अथवा साधक, आपल्या अडचणी, शंका श्रीस्वामींना सांगून परिवर्तन अनुभवेल. अश्रद्ध मनुष्याला मात्र हि जागा मृगजळ वाटेल.
प्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी श्रीवल्लभांची पालखी निघाली, वेळी श्रीपादांच्या अस्तित्वाची अनुभूती प्रत्येकांनी घेतली. मंदिराच्या प्रतिष्ठापनेस क्रमश: पंचनद्यांचे, ३ समुद्रांचे पाणी आले होते. सर्वत्र आनंदाचे वातावरण असता, प्रतिष्ठापनेपूर्वी स्मितहास्य करणारी मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधत होती.  जणू काही पुढे होणा-या लीला आणि त्यावेळी प्रगटणारी स्वामींची ज्योती, याला सूचक अशी हि छबी छायाचित्रात सुद्धा कैद झाली आहे हे विशेष. अनंताचे दान देणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या या स्वरूपाचे नित्य मंगल होवो.  

प्रतिष्ठापनेस आकाश तत्वाचा आशीर्वाद म्हणून कि काय, संथ पावसात इंद्रधनुष्य येवून सृष्टी चकाकत होती. मंदिर प्रतिष्ठापनेस स्वामिजिंबरोबर पिठापुरातले मुख्य पुजारी उपस्थित होते. प्रतिष्ठापना श्री रामचंद्र सरस्वती स्वामींच्या हस्ते होण्याचा श्रीपादांचा मानस होता. त्यानुसार, प्रतीष्ठापनेच्या वेळी मंत्रोच्चाराच्या गजरात गाभार्यात रामचंद्र सरस्वती स्वामी आणि पिठापुरातील पुजारी असता, कळसामधून ज्योती प्रगटून श्रीपादांच्या मूर्तीच्या भृकुटात विलीन झाली. याच वेळी मंदिरात चार बाल श्वानांचा, वेद्स्वरुपांचा जन्म झाला, हे मंगल सूचक होते. तेव्हापासून, मूर्तीच्या भृकुटामध्ये विशेष तेज, आणि ज्योत दिसते. हे श्रीवल्लभ प्रत्यक्ष तिथे असल्याचं प्रतिक म्हणायला हरकत ती नाही.

प्रतिष्ठापनेनंतर बोधपर, अनुभूतीपर मार्गदर्शन करताना श्री रामचंद्र सरस्वती स्वामी, श्री स्वामी त्रिशक्ती यांनी आपल्या अनुभवांच्या वाणीचा लाभ उपस्थितांना करवून कृतकृत्य केले. सर्व मंडळी भजनाच्या, नामस्मरणाच्या निराळ्याच आनंदात रमली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी (१७-०९-२०१५) वरुणेश्वराच्या रुपात शिवलिंग सुद्धा मंदिराच्या आवारात तयार झाले होते. याची कहाणी सुद्धा रोमांचक आहे. कुरवपुरी श्रीपाद स्वामी प्रतिदिन रुद्राभिषेक करीत याची आठवण श्री स्वामीजींना झाली. हीच साधना श्रीपादांनी आणि भक्तांनी करावी असा मानस श्री स्वामीजींनी श्रीपादांना तशी याचना करताच,मध्यरात्रीस मुसळधार पाउस सुरु झाला. सकाळी यात वाळू मध्ये शिवलिंग बनले होते. याची जागा श्रीपादानीच निवडली हे विशेष. हे शिवलिंग वाळूचे असून जमिनीत थोड्याच खोलीवर अलगद बनलेले सकाळी दिसले. हे तयार झाले तेथे मंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे. तसेच, प्रभूंच्या सानिध्यात नवग्रह आणि नक्षत्र मंदिर सर्व दोष निवारणार्थ असावे अशी श्री स्वामी त्रीशाक्तींना आज्ञाच आहे. तद्वत याचे काम सुरु आहे. भविष्यात येथे भक्त निवास व अन्नछत्र निर्माण कार्य होणार आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी
मंदिराचे बांधकाम व मुर्तीचा शुभयोग मंदिराच्या मूर्तीच काम गुरुपौर्णिमेला सुरू झालं. मूर्ती ज्या चित्रापासून बनली ते चित्र आणि मूर्तीचा चेहरा यात कमालीचा फरक आहे. सदर मूर्तीची निर्मिती  जयपूर येथे करण्यात आली . सादर मूर्तीस लागणारा दगड मिळता मिळेना अखेर श्रीपाद जन्मदिवस गणेश चतुर्थीला दगड मिळाला जो केवळ श्रीपादांचे  मूर्तीसाठी ५वर्षांपासून पडून  होता. आणि सध्याची अत्यंत नयनमनोहर श्रीपादांची मूर्ती तयार झाली .मंदिराला 3 मजले आहेत, चरणस्थळी संत / दत्तावतार परंपरा यांच्या कमालीच्या जिवंत मूर्ती आहेत. वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि राजराजेश्र्वरी देवीची मूर्ती आहे. सगळ्यात वर दत्त मूर्ती असून मंदिरास कळस शिवलिंग आहे.

गुरुपौर्णिमेच्या पावन मुहुर्तास मंदिराचे काम सुरु झाले. पृथ्वीतलावर एकही नसेल अश्या दिव्य स्वरूपाच्या ह्या स्थानाची महिमा वर्णू तितकी कमी आहे. मंदिराचा साचा ३ मजल्यांचा आहे. पैकी जमिनीस दत्त अवतार, गुरु परंपरा, गुरुदत्त परंपरेच्या ९ अतिशय जिवंत मूर्ती आहेत, त्या अश्या,

१. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज.             
२. श्री स्वामी समर्थ महाराज.
३. श्री माणिक प्रभू महाराज.         
४. श्री बाळू मामा महाराज.           
५. श्री साईबाबा 
६. श्री गजानन महाराज.     
७. श्री राघवेंद्र स्वामी      
८. श्री रामकृष्ण परमहंस महाराज
९. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी.

पहिल्या मजल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची कुमार रूपातील दिव्यमंगल परंज्योती तेजपूर्ण मूर्ती आहे. हि मूर्ती इतकी जिवंत आहे, जणू स्वामीच स्वतः उभे आहेत. येथेच पंचधातूची श्रीपादांची मूर्ती आणि पादुका आहेत. पार्श्वभागी देवी राजराजेश्वरी ची मूर्ती आहे. प्रदक्षिणा करताना श्री बापनार्युलू आणि श्री अप्पळराजू नृसिंहराज शर्मा यांच्या मनमोहक मूर्ती आहेत.

दुसर्या माळ्यावर श्री गुरुदत्तात्रेय विराजमान आहेत. हे श्वान, धेनु संगे स्मितहास्य करीत त्रिमूर्ती आहेत. ओंकारात नटलेले शिवलिंग मंदिराच्या कळसस्थानी आहे. श्रीपादांच्या या स्थानात अग्निहोत्र सुद्धा आहे. इथे विविध प्रकारचे दोष, उदा. कालसर्पदोष, व्याधी, बाधा इ. चे निवारण केले जाते. श्री स्वामीजी आणि त्यांचे मंत्रोच्चार ऐकत हवनात आहुती देणे हि एक आगळीच अनुभूती असून अग्नीत अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभ, तसेच संपूर्ण गुरुदत्त परंपरा प्रगट होउन आशीर्वाद देतात. आज या स्थानात गोधन आहे.

श्री क्षेत्र टिंगरी
श्री क्षेत्र टिंगरी
२४ हि संख्या गायत्री मंत्राचे निर्गुण (अग्नी) स्वरूप आहे. संतांच्या हृदयी परब्रम्ह वास्तव्य करतात, ९ हि संख्या परब्रम्ह सूचित करते. ८ हि संख्या मायेचे स्वरूप आहे. या संख्या ह्या स्थानी अश्याप्रकारे व्यक्त होतात. तसेच हे शिल्प मानवाच्या अध्यात्मिक प्रगतीचा महामेरू होय. पायाशी सर्व संतविभूती. हृदयात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असले कि पार्श्वभागातली कुंडलिनी जागृत होईल. हि राजराजेश्वरीच्या रुपात आहे. हि जागृत झाली कि त्रिगुणात्मक सृष्टीतून मनुष्य सच्चिदानंद शिवतत्वात प्रवेश करतो. हि मोक्ष अवस्था असून, या स्थानाचे आणखी एक महात्म्य आहे.

या संपूर्ण स्थानाची बांधणी दक्षिणी पद्धतीची असून, श्री स्वामीजींच्या कटाक्षाने पुरातन शास्त्रशुद्ध पद्धतीनी झालेली आहे. मंदिराच्या आवारात अंतर्वाहिनी नदी, (सरस्वती) श्रीपाद अंतर्वाहिनी प्रगटली असून, येथे व्याघ्रेश्वर शर्माने सुद्धा हजेरी लावलेली आहे. पंचमहाभूतांच्या आशीर्वादाने आणि श्रीपादांच्या अनंत कारुण्याने संपूर्ण भूमी अग्नीप्रमाणे जागृत झालेली आहे. अध्यात्मिक स्पंदनांनी युक्त अश्या स्थानात श्रीपादांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल. या स्थानी लीला घडत राहतील अशी श्रीचरणांची आज्ञाच जणू आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्ताला दत्तमिठाईचा भरपूर प्रसाद मिळत राहणार आहे.

उत्सव
या अतिमंगल स्थानात आनंद वाटप, अन्नदानयुक्त उत्सव साजरे केले जातात. महाशिवरात्री चा दिवस अति शुभमंगलप्रद आहे. या दिवशी श्रीपादाना समंत्रक, नामस्मरणयुक्त भक्तिभावाने अभिषेक, केला जातो. शिवनामाच्या आहुती सोडून विश्वकल्याणाचा संकल्प करून यज्ञ केला जातो. आनंदाच्या ह्या वातावरणात आरती आणि भजनात दंग भक्त नक्कीच देहभान विसरतो. पालखीची सेवा असताना, श्रीवल्लभांचे अलौकिक नृत्य भक्तांना अनुभवता येते.

राखीपोर्णीमेस या स्थानी अनंत आनंदाचा वर्षाव श्रीस्वामी करतात. शब्दात याचे वर्णन कठीण आहे. नेत्र दिपतील असे हे सुख आहे. श्रीपादांचे मुखकमल बघून शेकडो भक्तांचे हृदय कधी न संपणार्या आनंदाचे धनी होतात. याचा अनुभव मानव घेऊच शकणार नाही. यासाठी एकदा तरी या स्थानी राखीपोर्णिमेस यावेच यावे.

अक्षय तृतीयेस मंदिराच्या आवारात एक चमत्कार पहावयास मिळतो. उगवण्याच्या वेळी सुर्यभगवान आपल्या कोमल किरणांनी श्रीपादांच्या पूर्ण शरीरास अभिषेक करतात. हे दृश्य नयन मनोहारी आहे, तसेच शास्त्र सूक्ष्म आहे.

मार्गशीष पौर्णिमेस श्रीदत्त जन्माच्या संध्याकाळी संपूर्ण चंद्र श्रीपादांच्या भृकुटाच्या रेषेत असून, श्रींचे दर्शन जणू घेत आहे असे पहावयास मिळते. या काळात श्री गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यांचे पारायण अति आल्हाद दायक ठरते. भक्त अश्याप्रकारे आराधना करून श्रीपादांची कृपा अनुग्रह प्राप्त करू शकतात.

याशिवाय अतिआनंदात गुरुपोर्णिमा, दत्तजयंती, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, बाळू मामा जयंती इ. उत्सव येथे साजरे केले जातात.
जनमानसाची अथक सेवा करून श्री स्वामीजींनी शून्यातून हे स्थान निर्माण केले आहे. इतके विलक्षण कार्य करून, तन मन आणि धनानी सर्व शक्ती समर्पण करून स्वतःला फक्त एक सेवक म्हणविणारे स्वामीजी शुद्ध, धन्य, वंदनीय विभूती आहेत यात शंका नाही. महाराष्ट्रातील भक्तासाठी असे कार्य करून आज प्रचलित होत असलेल्या या स्थानात अजून काही काम शेष आहे. प्रकृती आणि काही इतर कारणास्तव श्री स्वामीजींना आज निधी गोळा करण्यास कष्ट पडत आहेत. श्रीपादांचे कार्य श्रीपाद करतीलच यात शंका नाही. स्वतःला सेवक म्हणवून गुरुस्वरूप या स्थानाची / श्री स्वामीजींची आर्थिक सहायता करण्यास तत्पर असणा-या भाविकांनी जरूर स्वामीजींना संपर्क करून तसे कळवावे. अनायासे, दर्शनास आवर्जून यावे आणि श्रीदत्तांचा प्रसाद घेवून धन्य व्हावे.

पोहचण्याचे मार्ग, संपर्क व पत्ता
येण्यापूर्वी अवश्य श्री स्वामीजींना संपर्क करून जावे. येथे जाताना सोवळे, धोतर सोबत न्यावे. पुरुषमंडळी अभिषेक, इ. गाभा-यातून करू शकतात. तसेच वस्त्र श्रीपादांसाठी नेल्यास आकर्षक पद्धतीने नेसविले जाते. 

पत्ता: गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड (गाळणे शिवार), गाळणेगाव, ता. मालेगाव जी. नाशिक, महाराष्ट्र.
जवळचे बस स्थानक: मालेगाव /धुळे
जवळचे रेल्वेस्टेशन: मनमाड जं.

पुणे/नासिक येथून बसने येणाऱ्या भक्तांनी मालेगाव मधील मोसमपूल सर्कलला उतरावे, येथून जवळच असलेल्या शिवाजी पुतळ्यापासून टिंगरी गावाचे रिक्षा, ऑटो मिळतात.
सकाळी ६;३०, ७:३० वाजता मालेगाव नवीन स्टेड पासून फलाट ९ वरून कुसुंबा रोड च्या बसेस आहेत. सकाळी ८:३० वाजता मालेगाव ते गाळणे बस असून हि मंदिरासमोरच थांबते. सकाळी ९:३० , संध्याकाळी ६ ला मालेगाव टे लुल्ल बस गाळणे फाटा येथे सोडेल,  येथून मंदिर अगदी जवळ आहे.

सादर तिर्थ क्षेत्री अनेक चमत्कार घडत आहेत. मंदिर परिसर पूर्णतया जागृत आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना येथील दर्शनाने पूर्ण झाल्याचे भक्त सांगतात. मंदिरात एक गोशाळा हि आहे. सादर मंदिराची बांधणी हि दक्षणी पद्धतीची आहे. परिसर अत्यंत अध्यात्मिक स्पंदनांनी भरलेला आहे. येथे संपर्क साधण्याचा फोन नो दिलेला आहे. ज्या कोणा भक्तांना सेवा रुजू करायची असेल त्यांनी स्वामीजी कडून बँक डिटेल्स घ्यावेत. दत्तभक्तानी श्रीपाद चरणी सेवा करून क्षेमकल्याणाची प्रार्थना करावी. स्वामीजी हेच सांगतात श्रीपाद श्रीवल्लभ हे कार्य फक्त माझ्या माध्यमातून करवून घेतात. हे सर्व श्रींचेच आहे.

जाण्या आधी सोबत धोतर/सोवळे न्यावे, गाभाऱ्यात सगळ्यांना अभिषेक/ पालखी सेवा करता येते. येथील श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहून भक्तगण देहभान विसरतात. श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहून भक्तगणांच्या डोळ्यातून प्रेम व श्रद्धेच्या अश्रुधारा वाहात राहतात व भक्त सर्व दुःख विसरून जातो हे मात्र नक्कीच. आपणही याचा अनुभव घ्यावा हि विनंती.

श्री स्वामी त्रिशक्ती
(०७७९८७३९१०९,८००७९७३७९९