शिष्य समर्थांना म्हणाला, मी उपासनेला बसलो की माझ्या मनात अनेक विचार येतात त्यामुळे माझी उपासना उत्तम होत नाही. याउलट विचारचक्र वाढत जाते तेव्हा यावर उपाय सांगा. समर्थ हसले, समर्थांनी त्या शिष्याला एक काम सांगितले. समर्थ म्हणाले, त्या बाजूच्या छोट्या नदीतून पाणी घेऊन ये. शिष्य पाणी आणायला गेला. त्या नदीच्या किनाऱ्यावर काही बायका कपडे धूत होत्या. भांडी घासत होत्या. त्या नदीतून एक बैलगाडी गेली. त्यामुळे नदीचं पाणी गढूळ झालं होतं. तो शिष्य तसाच समर्थजवळ रिकाम्या हाती परतला. आणि समर्थाना म्हणाला, नदीचं पाणी गढूळ झालं आहे. समर्थ हसले, म्हणाले जा थांब थोडा वेळ आणि पाणी घेऊन ये. तसा तो गेला त्याने पाहिलं नदीवर आता कोणीच नाही. पाणी स्वच्छ झालं होतं. गाळ तळाला जाऊन बसला होता. त्या शिष्याने त्या भांड्यात पाणी घेतले आणि समर्थाजवळ आला. समर्थ म्हणाले, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का. समर्थ म्हणाले, थोडा वेळ थांबल्यावर पाणी स्वच्छ झाले व नदीचे पाणी स्वच्छ वाहते आहे.
समर्थ म्हणाले, मनाचे ही तसेच आहे, " उपासनेला बसल्यावर असे अनेक गढूळ विचार येतील पण कालांतराने ते निघून ही जातील. पण आपली उपासना काही केल्या कमी करु नका." कारण,
*उपासनेला दृढ चालवावे।*
*भुदेव संतासी सदा नमावे।*
*सत्कर्म योगे वय घालवावे।*
*सर्वांमुखी मंगल बोलवावे।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"