*श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' एक अद्वितीय मुद्रामंत्र स्वरूपिणी*
---------------------------------------------
' *श्रीपादराजं शरणं प्रपद्ये'* हा दिव्यं मंत्र तर आहेच पण श्रीगुरु श्रीपादराज याच्या चरणी शरण जाण्याची अनुभूती ही आहेच. परम पूज्य श्रीगुरुभक्त शंकर भट यांच्या श्रीगुरूंचे चरित्रआख्यान मधूनच जनमानसात या दिव्यं मंत्राची ओळख झाली. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा दिव्यं मंत्र फक्त अडचणीतून किंवा संकट काळातून तारून नेतो हा विश्वास असला तरी हा परम मंत्र आपल्या जीवनाचा आधार आहे. मृत्यूलोकामधल्या मनुष्य प्राण्यामध्ये याचे स्मरण होत असले तरी सकल सृष्टीमधील प्रत्येक भूतांमध्ये (मनुष्य, प्राणी, सर्व जीव, पंचभूते) याचे स्पंदनरुपी स्मरण होत असलेच पाहिजे.
कलियुगातले तारणहार व सद्विवेकबुद्धीदायक असे श्रीदत्तात्रेय श्रीपादवल्लभ आज गुप्तरुपाने आपले नियोजित कार्य सकल सद्गुरुंच्या योगे आपल्या परमात्मस्वरूप गुरुतत्वामध्ये करीत आहेत. श्रीगुरुंचे सर्वश्रुत असे ओम द्राम दत्तात्रेयाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तीन मंत्र आहेत. प्रत्येक मंत्राचे कृपासामर्थ्य वेगळे आहे व आपल्या भक्तिअवस्थेमधल्या रूपाचे दर्शन या मंत्र स्मरणा मधून होत असते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा श्रीगुरुंचा जयघोष आहे. श्रीगुरुंचे गुणगान करणारे अक्षरब्रह्म आहे. श्रीगुरुंची अनुभूती मिळाल्यावर आपल्या वाणीमधून उस्फुर्तपणे होणार हा नाद आहे, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद स्वामीमहाराज यांच्या दिव्यं अशा श्रीदत्तगुरूंच्या कर्मसाधनेतूनच याची अनुभूती भक्तजनांसाठी झाली आहे. या मंत्राचे ही कृपासामर्थ्य विलक्षण आहे कारण श्रीमद स्वामी महाराजांच्या दत्तसाधनेचा योग आपल्या भक्तिभावनेमध्ये मिसळून याचीही अनुभूती ही लवकर येऊ शकते.
आजचे तिन्ही श्रीदत्तावतार श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंहसरस्वती स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या सर्वांचा आवडीचा नाद हा "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" आहे, ओम द्राम दत्तात्रेयाय हा श्रीगुरुंचा बीजमंत्र आहे. जसे चांगल्या फळासाठी बीज उत्तम असावे लागते तसे आपल्या देहामधून षड्रिपूंचा -ऱ्हास झाल्यावरच या मंत्राची दिव्यं अनुभूती येईल. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये या मंत्रांचे कृपासामर्थ्य आपल्या या जन्मामधल्या देहापुरते मर्यादित तर नाहीच नाही. प्रत्येक आत्मास श्रीगुरूंच्या चैतन्याचा नुसता स्पर्श ही या मंत्राने येईल. मग मनुष्यदेहातील गुप्तरूपाने बसलेली कुंडलिनी शक्ती जी चैतन्यशक्ती आहे तिची जाणीव होईल. तिचा विकास हा श्रीगुरुंच्याच कृपाशक्तीमधून होत राहील.
एका रविवारी सकाळी श्रीगुरु श्रीपादराजानी "श्रीपादराजं शरणं प्रपद्ये" या मंत्राचे मुद्रारूप कसे आहे याचा बोध दिला. १५-२० मिनिटात हा बोध अक्षरप्रमाणामध्ये उतरून झाला. असे हे ३३ ओवीचे मुद्रामंत्रस्वरूपिणी रचले आहे. या मंत्रातील अक्षरब्रह्म ही मुद्राप्रमाणेच उमटले पाहिजे हा आग्रह नाही. ही सर्व श्रीगुरुंची मोहमाया आहे ही समजून घेतले तर जन्म कृतार्थ होईल. हा मंत्र आपल्या देहासमपर्णाची भावना तर आहेत कारण "श्रीगुरूंशी शरणंम" ही देहाची भावभक्तीतली पहिली अवस्था आहे. देहआसक्ती नष्ट झाल्यावर आत्मा -समर्पणाची भावभक्ती नंतर बहरून येते. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा मन्त्र दोन तीन रूपामध्ये प्रकट होतो. काही ठिकाणी 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' किंवा 'प्रपध्ये' असे ही आहे. श्रीगुरुबोध करताना जसा उमटला तसाच मी ठेवला आहे. याचे कारण ही विशेष असेच आहे.
'प्रपद्ध्ये' मधले द आणि ध यांचा विशेष असा अर्थ आहे. हा दत्त (द) धर्म (ध) आहे. या दत्तधर्माचा मी दास (द) आहे. 'प्रपद्ध्ये' मधील द आणि ध याचबरोबर ' ,' या जोडाक्षराचा आकृतिबंध म्हणजे हा दत्तधर्म जन्मोजन्मी, युगेयुगे प्रत्येक प्राणिमात्रामध्ये झिरपत जाणार आहेच आणि त्यानेच आपल्या सर्व जीवनाचे कल्याण होणार आहे. तसेच 'श्रीपादराजंम' व 'शरणंम' मधला "म" आकार हा विशेष अश्या श्रीमद्भावनेनें आला आहे. 'जं' आणि 'णं' ही अक्षर उच्चार करताना ओंकारमधला ओम हा दीर्घउच्चार अव्यक्त असतो. तो मुद्दामच व्यक्त रूपात दाखवण्यासाठी 'श्रीपादराजंम' मधला 'जंम' आणि 'शरणंम मधला 'णंम' याचा अर्थ मुद्रामंत्रात नमूद केला आहे. शेवटी रचनाकार म्हणून *"श्रीपादसूत'* असे लिहिले असले तरी त्याचाही बोध आहेच. या मुद्रामंत्रस्वरूपिणी रचनेचे कर्ताकरविता श्रीगुरु श्रीपादराजच. त्या रचनेला शब्दबद्ध आकार दिला म्हणून मी सूत. श्रीपादसूत नामकरण ही सर्व श्रीगुरु श्रीपादरांज यांचीच कृपा.
*'श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये'* या मुद्रामंत्रस्वरूपिणी रचनेला आपल्या सुंदर अक्षरब्रह्मामध्ये कागदावर उतरविण्याचे कार्य माझी पुतणी स्वरदा हिने आपल्या अक्षरकौशल्याने प्रतित केले आहे. *'श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये'* हा मंत्रच आपल्या जीवनाला श्रीगुरुकृपाकारक ठरणार आहे. श्रीगुरूंच्या कुरवपूर क्षेत्री श्रीगुरुसमवेत श्रीगुरुभक्तीचाच परमानंद लाभणार आहे कारण
*।। श्रीपादराजं शरणं श्रीपाद दत्त वैभवम ।।*
*।। श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।*
====================
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"