Friday, May 24, 2019

गाणगापूर : मनोहर पादुका

।।श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी।।

       मनोहर पादुका 

श्री दत्ताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या ह्या क्षेत्रास साधू संतांच्या व साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या वास्तव्याने पतित पावन झालेल्या स्थानास अनन्यसाधारण असे महत्व आहे त्यामूळे ईथे आलेला साधक केव्हा एकदा श्रीकृष्णेत डुबकी मारून श्री गुरूमहाराजांना एकदा डोळे भरून पाहतो ह्या आनंदात असतो   .श्री भगवान दत्तात्रेयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी ह्या क्षेत्री बारा वर्षे तपस्या केली आणि श्री क्षेत्र गाणगापूर ला जातांना स्वामी महाराजांनी श्री चौसष्ठ योगिनींच्या आग्रहाखातर ज्या ठिकाणी महाराजांनी तपस्या केली त्या औदुंबराखालीच श्रीच्या पादुका श्री दत्तमहाराजांनी स्वताःस्थापन केल्या त्यावर स्वामी महाराजांनी कमंडूलू तील श्रीकृष्णाजल त्या पाषाणावर शिंपडून त्यावर स्वहस्ते प्रणवाची म्हणजे ओंकाराची सुंदर आकृती आपल्या बोटांनी रेखाटली ह्या चंद्रकांत पाषाणावर याशिवाय   वज्र अंकूंश ध्वज कमल ही दैवी चिन्हे ही काढली . 
याच त्या स्वामी महाराजांच्या मनोहर पादुका  होय कितीही दा दर्शन घेतले तरी मन भरत नाही परत परत दर्शन घ्यावेसे वाटते डोळे भरून पहावे वाटते .स्वामी महाराज असतांना असणारे भाविक आणि परिसरातील लोक केवढे भाग्यवान कि त्यांना महाराजांचा सहवास लाभला त्याच्या चमत्काराने अनेकांचा ऊद्धार हि झाला श्री गुरू चरित्रात श्री नृसिंहवाडीत घडलेल्या घटना डोळ्यासमोरून तरळून भुतकाळात स्वामी महाराजाच्या काळात घेऊन जाऊन आपण ही त्या घटनेचे मुक साक्षुदार  आहोत असे वाटते .
श्री स्वामी महाराजांच्या पादुका स्थानी स्वामी महाराजच खुद्द बसले आहे आणि येणार्या सर्व भाविकांची आस्थेने चौकशी करून आवस्थ करून सांगतात काळजी करू नकोस मी कुठेही गेलो नाही मी या पादुका स्थानीच आहे .

  ।। श्री गुरूदेव दत्त ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"