Thursday, May 23, 2019

परमेश्वराचा कोणता श्रेष्ठ अवतार ?

आजचा प्रश्न
परमेश्वराचा कोणता श्रेष्ठ अवतार ???/
कुणाला ग्रुप मध्ये उत्तर द्यायला  नको असेल त्यांनी वैयक्तिक रित्या उत्तर द्यावीत 
काळाच्या प्रश्नाचे उत्तर
स्वामी समर्थ अजानू बहू होते वाल्मिकी रामायणात श्रीरामाची जी काही शारीरिक वैशिष्ठ्ये सांगितली आहेत त्यांत असा उल्लेख आहे की श्रीराम आजानुबाहु होता. आजानुबाहु म्हणजे असा व्यक्ती की जिचे हात गुढग्यापर्यंत लांब असतात.
काही जण असंही म्हणतात की आजानुबाहु असल्यामुळे श्रीराम धनुर्विद्येत प्रवीण होता. हात लांब असल्याने त्याला मोठ्या आकाराचे धनुष्य पेलता येत असे आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा इतरांपेक्षा अधिक लांब ओढता येत असे.
आजानुबाहुपणा हा सहजपणे आढळून येणारा मनुष्य शरीराचा गुणधर्म नाही. फारच थोड्या लोकांमध्ये हे शरीर वैशिष्ठ्य दिसून येते. अध्यात्मिक जगतात ह्या आजानुबाहु गुणवैशिष्ठ्याचे एक गूढच आहे. अनेक अवतारी मानले गेलेले सिद्ध आणि सत्पुरुष आजानुबाहु होते असे आपल्याला दिसून येते. त्यासंदर्भात अनेक लोकप्रिय सत्पुरुषांची नावे सांगता येतील. वानगी दाखल दोन-तीन उदाहरणे देतो.
नाथ संप्रदायाचे सिद्ध शिरोमणी शंभू जती श्रीगोरक्षनाथ सुद्धा आजानुबाहु होते. नवनाथ पोथीच्या नवव्या अध्यायात गोरक्षनाथ बारा वर्षीय बालकाच्या रुपात अवतीर्ण कसे खाले त्याचे वर्णन आहे. तेथे त्यांना खांद्यापासून सरळसोट आखीव-रेखीव हात आणि "अजानबाहू" असेच म्हटलेले आहे.
दुसरे उदाहरण द्यायचे तर शेगावच्या सिद्ध योगी संत श्रीगजानन महाराज यांचे देता येईल. ते दिगंबर, पिशाचवृत्ती वगैरे अवधूत लक्षणांनी सुशोभित तर होतेच पण आजानुबाहु होते. श्रीगजानन महाराजांच्या पोथीत तसा उल्लेख आढळतो.
अजून एक उदाहरण द्यायचे झाले तर धनकवडीच्या नाथपंथी अवलिया श्रीशंकर महाराज यांचे देता येईल. शरीराने "अष्टावक्र" असलेले श्रीशंकर महाराज आजानुबाहु सुद्धा होते.
अध्यात्म जगतात अशी अजूनही उदाहरणे आपल्याला आढळतील. कदाचित परमेश्वराने अशा सत्पुरुषांच्या बाबतीत ते अवतारी असल्याची एक सांकेतिक शारीरिक खुण म्हणून हा गुणधर्म त्यांना प्रदान केला असावा. या आजानुबाहु सत्पुरुषांनी श्रीरामाप्रमाणे युद्धातले धनुष्य जरी उचलले नसले तरी जन उद्धाराचे आणि भक्तांना अध्यात्ममार्गावर आणण्याचे शिवधनुष्य आपापल्या काळी नक्कीच पेलले. आजही त्यांचा भक्तवर्ग त्यांच्या लीलांमधून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतो आहे.
( तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईका ना ही प्रश्न मंजू शे साठी  ग्रुप मध्ये सामील करून घेऊ शकतात त्या साठी व्हाट्सअप्प no 8605582623)

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"