Monday, May 20, 2019

परशुरामचरित्र महाग्रंथ पारायण

*परशुरामचरित्र महाग्रंथ पारायण करितां यथार्थ तयां चतुर्विध पुरुषार्थ महेंद्रनाथ देइजे ॥४१॥*
*तीर्थेंक्षेत्रें दैवत पारायण करितां यथार्थ वश होती तीं निश्चित न करीत कधीं विघ्नातें ॥४२॥*
*जी जी असे मनकामना पारायण करावें त्या कारणा भावें पूजितां परशुरामा इच्छीत प्राप्ती होतसे ॥४३॥*
परशुराम चरित्र जे वाचिती भक्तिभावें विचार करिती ते मोक्षपदा पावती पुनरावृर्त्तीवर्जित ॥४४॥
उप पातकें महापातकें रोगव्याधी शत्रू भयादिकें निवारणार्थ हे देखे परशुराम चरीत्र पारायण ॥४५॥
वैशाख शुक्ल तृतीया सायान्ह व्यापिनी ग्रात्द्या तें पर्व जगतींया पारायणाविषयीं ॥४६॥
परशुरामाचा उत्साह अपार करोनि वाचावें चरित्र असतां पुनर्वसू नक्षत्र पर्वमोठें ह्मणावें ॥४७॥
*प्रातः स्नान तिलक मुद्रा संध्याहोम परशुधरा पूजन ऐसें नित्य कर्म करा मग पितृश्राद्ध ते दिवसीं ॥४८॥*
*नंतर चरित्र पठण श्रवन करा स्वयें उत्साहा अंतीं पारण नाना प्रकारचे समारंभ जाण करितां परशुराम संतोषती ॥४९॥*
आणीक पारायण करण्यास सांगीतलासे दिवस आषाढ शुक्ल पूर्णा विशेष सज्जन ह्मणती ॥५०॥
जे जे दिवसीं चरीत्र वाचाल ते ते दिवसीं भार्गव दयाळ इच्छित देतसे सकळ स्वधर्म निष्ठासी ॥५१॥

चरित्राचें पत्र पृष्ठ वोवी वाचितां होयतो कवी आणि जावोनी वैकुंठ पदवी अखंड राहती ते ॥५२॥
जो का परशुराम चरित्र कल्पतरु तोचि परशुराम जगद्गुरु त्यासी चिंतितां इच्छित वरु दैन्यवारुनी देइजे ॥५३॥
हाच चरित्र कल्पतरु जगतीं मध्यें जालागुरु तेथें कृतार्थ होती शुकवरु ज्ञानामृत बिढारु सेउनी ॥५४॥
ऐसा यथार्थ गंथ श्रोते ह्मणती पूर्वीं न भूतोन भविष्यती जेथें सांगोनि ईशकीर्ती त्याप्रती तोषविलें ॥५५॥
जैसें श्रीहरी प्रीतीसी जगतीं मध्यें पद्म तुळसी कीं विष्णुपदी गंगा एकादशी तैसे त्द्या चरित्रानी प्रती असे ॥५६॥
परशुराम महेंद्रवासी शुक ठेवोनि देह पिंजर्यासी बोलविलें आपले चरित्रासीं स्वभक्तांसी तारावया ॥५७॥

*श्रीपरशुरा्रामचरित्र नाम वदतां पापासी होय दहन त्हृदयीं प्रगटोनि परशुराम आणि प्रसाद करिती ॥५८॥*

शुकासी जितुकें शिकवावें तितुकेंचि बोलतो ऐसें नवे तयासी पुष्कळ शिकवावें तेव्हां यथाशक्ती बोले तो ॥५९॥
तैशा परी माझी वाचा सारांश असे सित्धांतींचा श्रोते विचार करोत साचा श्रीहरी पदीं येवोत ॥६०॥

तेतीस अध्यायीं ओव्या चोविश्यें झाल्या सार्या तुळशीपुष्पा परी गुंफिल्या अर्पिल्या रामचरणीं ॥६१॥
त्द्या ग्रंथाचे प्रथम मध्यें अंतीं वर्णिला पूर्ण एक फरशुधर नारायण सर्वशास्त्रें वर्णिती जो ॥६२॥
त्या नारायण चरणीं मस्तक सर्वदा असो भक्तिभावात्मक त्याच्या भक्ताचाहि सेवक मी असें निश्चित पैं ॥६३॥
सर्वांचा कुलदेव नारायण नवसाचे होती अन्य जाण आपणां जोगेश्वरी महान अंब क्षेत्रींची ॥६४॥

दुसरे कुलदेव परशुराम आणि पुष्कळ सौम्य दारुण परी न सुटे एक नारायण ब्राह्मण जातीला ॥६५॥
सन्यास घेतला जरी तरी न सुटे नारायण हरी जो कां जन्मस्छिती लय करी सर्वोत्तम ईश्वर एकला ॥६६॥
जय सर्वोत्तमा लक्ष्मीवरा एका अनेक फल दातारा सत्य संकल्पा ईश्वरा फरशुधरा नमोस्तुते ॥६७॥
जय चिद्घन परमात्मा शिवविरिंची नुता पूर्णकामा रामाविरामा परशुरामा नारायणा नमोस्तुते ॥६८॥
श्लोक ॥ स्वानंदं कुल तीलकं भ्रुगोःपवित्रं श्रीरामं परशुधरं विचित्र लीलं ॥
ब्रह्मण्यं बृहदवतार वन्हिरुपं क्षत्रघ्नं दुरित हरं परं हि वंदे ॥१॥

सर्व प्राकृत ग्रंथाचा शेखरु जाला भांर्गव चरित्र कल्पतरु ऐकोनि तोषविती श्रीवरु आनंद विढारु सांपडे तयां ॥६९॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु ॥ त्रयःत्रिंशोऽध्याय गोड हा ॥३३॥
श्रीमत्परशुरांमार्पणमस्तु ॥ ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु॥श्रीलक्ष्मीकेशव प्रसन्नोक्त॥श्रीरस्तु॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"