Thursday, May 23, 2019

नाना महाराज तराणेकर ह्यांची बोधवाणी

॥ अमृताचा घनु ॥

नाना महाराज तराणेकर ह्यांची बोधवाणी.

भक्तांबरोबर झालेल्या संवादरुपात.

प्रश्न : नाना! बरेच वेळा जपात खंड पडतो. असे कां होते? 
उत्तर :
 1 ) इंद्रियांना वळण लावता आले पाहिजे. दोन वेळा चहा पिण्याची सवय असली की डोके दुखायला लागते. भगवंताच्या नामस्मरणाचीही अशीच सवय लागायला पाहिजे. नामाचा नियम लावून घ्यावा. नामाचा नियम चुकल्यावर चैन न
पडणे हेच इंद्रियांना वळण लावणे आहे. 
          2) शाळेचा धाक, परिक्षेचा धाक असतो म्हणून आपण अभ्यास चुकवत नाही. 
रोज नियमित अभ्यास करतोच. पण नामजप फुकाचा व बिनधाकाचा म्हणून तुम्ही आळस करता. पण लक्षात ठेवा तुमच्या या आळसाची नोंद चित्रगुप्त बरोबर ठेवत असतो.
  3 )नित्य उपासनेत उत्साह ठेवा, आळस नको वाटल्यास त्यासाठी रोज थोडासाच नेम ठेवा. नाहीतर एक दिवस 30 माळा तर दुसरे दिवशी दोनच. हे नको.

 *॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"