🌹🌺🚩तळमळ🚩🌺🌹,
आज सकाळीच एका नातेवाईकाचा फोन आला होता, विषय असा होता की प्रपंचात कोणतीही उणीव नसावी, मुलाबाळांचे कल्याण, लौकीकात नेमके काय असावे, त्याअंतर्गत मुलांचे मुलींचे विवाह हे योग्य वयात होणे, घरदार, सुखसमृद्धिने संसार परिपूर्ण असला पाहीजे.
वरील गोष्टी प्राप्त व्हाव्यात, यासाठी मला असे वाटत नाही की कुणाची तळमळ, प्रयत्न कमी असतील.
परंतु कांही वेळेस, समोरचा माणुस फारच बेफिकीर, बेजबाबदार आहे, त्याला आपल्या प्रपंचाची काळजीच नाही, विशेषकरुन भौतिकतेची रेलचेल मुबलक प्रमाणांत असलीच पाहीजे हा विचार समोरच्याच्या दृष्टीकोनातुन आपल्या समोरील व्यक्तीच्या मनावर आपल्या बोलण्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जर समजत नसेल, कदाचित आंपण ज्याला समजुन सांगत आहोत, मग भलेही समोरच्या व्यक्तीने जीवनांत हेतुपुरस्सर कांही गोष्टी टाळुन, जवळ असणाऱ्या गुणांचा वापर लोकांवर छाप पाडुन आपला भौतिक स्वार्थ साधलेला नसेल, समोरच्या व्यक्तीचे ध्येय हे जर कांही प्रवाहाच्या विरुद्ध असेल तर त्याला तुच्छतेच्या भावनेने पाडुन, त्याची जीवनातील नेमकी भुमिका, जीवनाकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टीकोण नेमका काय आहे ? याचा विचार व्यक्तीगत पातळीवर ज्याचा त्याने ठरवु नये.
अध्यात्मिक पातळीवर प्रत्येकाची दैवगती, प्रारब्ध हे ठरलेलेच असते, माणसाच्या हातात फक्त प्रामाणिक, सचोटीने केल्या जाणारे प्रयत्न असतात.
जीवनांत नेमके काय मिळाले, मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना आंपण फक्त केलेले प्रयत्न किती योग्य होते, व मी ते प्रयत्न करतांना तो भगवंत माझ्यासोबत आहेच याची जाण क्षणोक्षणी ठेवणे हीच खरी समज येणे म्हणजे अध्यात्म होय, बाकी प्रत्येक जीवाचे व्यक्तीगत प्रारब्ध ठरलेले आहे तेंव्हा अती काळजी करणे वा ईतरांना तुच्छतेच्या भावनेने तसे त्याला समजणे योग्य नाही.
मी माझा गीतेच्या अभ्यासाचे धोरण या बाबतीत ठेवले आहे.
शेवटी, गतिर्भर्ता प्रभु:साक्षी, निवासं शरणं सुहृत् ||
प्रभव: प्रलय: स्थानं, निधानं बीजमव्ययम् || हे लक्षात ठेवावेच लागते.
🌹🌹🌺🚩हरि:🕉🚩🌺🌹🌹
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"