दत्तमहाराज एखाद्याची एवढी कठोर परीक्षा का घेतात ?
आपल्या आयुष्यात जे सुख-दुःखं आपण भोगतो त्याचा दाता कोणीही नसतो...कुठलीही वस्तू-कुठलीही व्यक्ती-कुठलंही वित्त आपल्याला कधीही सुख देत नाही वा दुःखं देत नाही..."सुखस्य दुःखस्य न कोपि दाता । परो ददातिती कुबुद्धी रेषा " ह्या न्यायानं सुख देणारा पण कोणीही नव्हे तसाच दुःखं देणारा पण कोणीही नव्हे...
"जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूंचि शोधोनी पाहे, मना त्वांची रे पर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले..." ह्या श्री समर्थ उक्ती नुसार आपणच आपल्या अनंत जन्माच्या पूर्व कर्मानुसार तयार झालेलं प्रारब्ध भोगत असतो...आणि प्रारब्ध हे केवळ भोगूनच संपवावं लागतं…!!!
आपण जर दत्तगुरूंची उपासना करत असाल तर दत्तगुरूं आपली खडतर परीक्षा घेत आहेत असा विचारही अजिबात करू नका...उलट निर्माण झालेल्या प्रारब्धाच्या तडाख्यातून आपल्या भक्तांला कसं बाहेर काढायचं हे महाराज ठरवत असतात...!!!
साक्षात् श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या सोबत होता पण त्याने १४ वर्षांचा खडतर वनवास पांडवांना उपभोगू दिलाच की... पण तो वनवास भोगत असताना (म्हणजे कठीण समयी) तो "श्रीकृष्ण" रूपाने पूर्णपणे पाठीशी उभा होता...देव साक्षात सोबत होते पण त्यांनी आपल्या भक्तांच्या प्रारब्धात ढवळा ढवळ नाही केली...!!!
सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत...बाहेर कडक ऊन आहे अश्या वेळी ऊनच नको असं आपण नाही म्हणू शकत...परंतु कितीही कडकडीत उन्हाळा असला तरी डोक्यावर टोपी घालणं-छत्री घेऊन बाहेर जाणं हे सोपे सोपे साधे उपाय आपण करतोच की...उपासना करणं-नाम घेणं हे प्रारब्धाच्या तडाख्यातून वाचवणारी साधनं आहेत...
जिथे आपलं प्रारब्ध न्यून आहे तिथे माणसानं आपली साधना वाढवावी...भरपूर आणि विश्वासपूर्वक नाम घ्यावं... दत्त महाराज अत्यंत दयाळु आहेत...ते शरण आलेल्या जीवाचं कायमच कल्याणच करतात...!!!
5/6 महिने आपल्याला खूप त्रास झाला असेल तर (किंबहुना खूप त्रास भोगत असाल तर) न चुकता संध्याकाळी करुणा त्रिपदी-घोरात् कष्टोद्धरण स्तोत्रं व चित्त स्थैर्यकर दत्तस्तवन स्तोत्रं म्हणत जा....पूर्ण उभारी मिळेल...दत्तगुरूं जर परीक्षा घेत असतील तर भय निर्माण केलेलं असेल तर निर्माण केलेल्या भयातून "भयमुक्त' पण तेच करतील..."भयकृद् भय नाशन:" असं विष्णू सहस्र नामांत वर्णन केलं आहे...'भयकर्ता तूं भयहर्ता" असं करुणा त्रिपदी मध्ये वर्णन आलेलं आहे...निश्चिन्त मनाने दत्तगुरूं वर पूर्ण भरोसा ठेवून उपासना करा दत्त महाराज योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील...!!!
"नशीब तुझी थट्टा करो । नियती तुझे सत्व पाहो, ध्यास कधी सोडू नको दृढ नाही नामा.... 🙏💐
#ब्रह्मांडनायक
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दिगंबरा दिगंबरा,श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"