*जल आणि वन्यजीव व्यास्थापानासाठी करा उंबराची लागवड*
औदुंबर किंवा उंबराचे धार्मिक नाते खूपच घट्ट असल्याचे पूर्वीपासून आपण सर्वजण ऐकत आहोत मात्र त्या धार्मिकतेला खूप मोठे शास्त्र असल्याचे अलीकडील अनेक अभ्यासातून पुढे येत आहे. निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली यांनी तर सर्वाना खूप महत्वाचा संदेष दिलेले आहे कि, प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतीच्या बांधावर उंबराची झाडे आपल्या शेताच्या चारही बाजूला लावल्यास शेतीला लागणारे २५ टक्के पाणी हि उंबराची झाडे पुरवतील, इतके महत्व असलेले झाड कदाचित जगात कुठेच मिळणार नाही मात्र आपल्या भारत भूमीत ते सर्वत्र सापडते. मात्र आपल्या काही चुकीच्या गैरसमजुतीमुळे या झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाल्याचे भयानक चित्र समोर येत आहे.
नदी, झरे, यांची सानिध्यात उंबर खूपच वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. मुळात उम्ब्राचे मुल स्थान आशिया खंडातील असून भारतीय उपखंडात हा वृक्ष निसर्गीक्रीत्या म्यानमार ते अफगाणिस्थान पर्यंत पसरलेला दिसतो. भारतात समुद्र सपाटीपासून ते ४००० फुट उंचीच्या पर्वत रंगामध्ये हा वृक्ष वाढताना दिसतो. तांबडी माती ते लाल गाळाची मातीत अश्या विविध मातीत सहजपणे उंबर वाढत असल्याचे दिसून येते.
पूर्वीच्या कथापासून ते आजच्या आयुर्वेद शास्त्रातून हा वृक्ष पवित्र मानला जात असून यात औषधी गुणधर्म असलेला आहे. अगदी आपल्या शहराची उष्णता वाढल्यास आपण या झाडाची फळे हाताने कुसकरल्यास दाहकता कमी होत जाते. आयुर्वेदात गोवर, कांजण्या सारख्या रोगावर शरीराचा दाह शांत करणेसाठी, उंबराचे मुळावर छेद देऊन त्यातून गळणारे पाणी म्हणजेच "औदुंबर जल" रुग्णांना पिण्यास दिले जाते. शरीराची तलखी लगेच कमी होते.
कलियुगातील कल्पतरू म्हणून संबोधल्या गेलेल्या झाडाखालीच ब्रम्हा, विष्णू , महेश या तिघांनी दत्तात्रेयाचा अवतार घेऊन वास्तव केल्याचे सांगितले जाते. आजही शानिशिन्ग्नापूर, शिर्डी, गाणगापूर अश्या अनेक धार्मिक ठीकानी उंबराच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. प्रत्येक दत्ताच्या मादिराजवळ आजही उंबर असतोच तसेच याच्या डहाळ्या यज्ञ कर्मातहि वापरतात.
साधारणपणे उम्ब्राचे झाड ४० ते ६० फुट उंचीचे असून जंगलात १०० फुटापर्यंत याची वाढ पहावयास मिळते. याच्या पानावर काही तांबूस रंगाचे फोड येतात मात्र हे छोट्या किड्यांनी केलेले असतात. आपल्याकडे उंबराला फुल आल्याचे खूप ठिकाणी गाजावाजा करून सांगितले जाते मात्र उंबराचे हिरवे लहान उंबर म्हणजेच त्याचे फुल असते हाच उंबराचा फुलोरा असतो. सगळी फुले खोडावर येत असतात. यात नरफुले , मादीफुले आणि ज्यात दोन्ही लिंग नसतात अशी तीन फुले गुठळ्याप्रमाणे येत असतात. ज्या लिंग नसलेल्या फुलात कीटक अंडी घालतात, आणि एकाच पुष्प्कोश्यातील नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी पक्क होतात मात्र हे कीटक एक फुलातून दुसर्या फुलात जाऊन परागीभवन करीत असतात, त्यामुळे उंबर आणि कीटक हे समीकरण अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे कीटक नसतील ते उंबराला फळे येणारच नाहीत आणि उंबराची पुढील पिढीही थांबेल.
उंबराला साधारणपणे वर्षातून दोनदा फळे येतात, फेबुवारी ते मार्च आणि पावसाळ्यात जून ते जुलै मध्ये. लालसर तांबूस रंगाची पिकलेली मधाळ फळे खूपच गोड लागतात, याचा वास थोडासा नशीला असतो आणि सर्व वन्यजीवासह माणसेही याची फळे खूपच आवडीने खातात. काही कीटक यात असतात मात्र हे फळ आणि कीटक याचनात खूप घट्ट असल्याचे दिसून येते. या किटकाशीवाय उंबराचे परागीकरण होत नाही. हे कीटक याच फळात आपले प्रसुतीग्रह बनवत असल्याने यांच्याशिवाय उंबरहि आपली प्रजा वाढवू शकत नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
आजकालचे पानाडे विहीर अथवा बोअर वेलची जागा शोधायची असल्यास उंबर झाडाचा शोध घेऊन त्याच्या कडेला जमिनीखालील पाण्याच्या झर्यांचा वेध घेण्यासाठी करतात. सर्वात म्हत्वाचे म्हणजे हे झाड भूगर्भात लाखो लिटर पाणी सोडत असून जल संकटावर मात करणेसाठी याची लागवड वनपरिसरात लाखोंच्या संखाने होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात हातसडीचे तांदूळ तयार करण्यासाठी तसेच नाचणी सडण्यासाठी उंबराच्या झाडाच्या बुंध्यापासून तयार केलेली उखळ आणि मुसळ वापरतात. पपूर्वी जात्यावर तांदूळ भरडत असताना तांदुळाचे तूस निघावे आणि तांदूळ अखंड मिळावा म्हणून उंबराची साल ज्यात्यात घालून भात भरडत असत. उंबराचे झाडाची पाने जनावरांना चारा म्हणून उपयोग होतो त्यामुळे जनावराच्या अंगात गारवा निर्माण व्हावा म्हणून जनावरांना उम्ब्राची पाने चारतात.
ग्रामीण भागात आजही उंबराच्या कच्या फळाच्या दोड्या करून खातात तसेच काही भागात हिरवी उंबरे चटणी करून खातात. पिकलेली फळे चिलटासकट खाली तर डोळ्याचा आजार होत नाही असे आदिवासी मानतात आणि ते खातातही...जंगलात फिरताना आदिवासी नेहमी उंबर या झाडाखालील पाणी पिण्यास घेऊन जातात आणि सांगतात कि हे औषधी पाणी आहे. तसेच आम्ही कधीपण उंबर तोडत नाही...
निसर्गातील या झाडांचे महत्व अतिशय महान आहे. निसर्गातील असंख्य पक्षी, वटवाघळे याचं मुख्य अन्न म्हणून उंबर या झाडाचा उपयोग होत असून अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी हे झाड स्वताच एक परिसंस्था आहे. या झाडाळा पिकलेली फळे असताना २४ तास निरीक्षण केले असता असे दिसून आले कि, अनेक कीटक, माश्या, पक्षी यात चस्मेवाला, भोरड्या, तांबट, साळुंक्या, शिंपी, बुलबुल तर रात्री शेकडो वटवाघळ या फळावर तुटून फडतात. आजकाल द्राक्ष आणि बोरीच्या फळावर पक्षी आणि वटवाघळ खूप मोठ्या प्रमणात हल्ले करीत असल्याचे दिसून येत आहे, याला इलाज म्हणून लोकांनी आपल्या परिसरात उंबराची लागवड वन परिसरात अथवा शेतीच्या बांधावर केल्यास असे हल्ले कमी होण्यास मदत होईल. सस्तन प्राणी, पक्षी अनेक कीटक असे नानविध जीव यावर अवलंबून आहेत
तर चला करूया अश्या कल्पवृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"