श्रीपाद स्वामी कुरवपुर क्षेत्री लिला अवतारात असताना जर्मनी देशातुन जाॅन नावाचा भक्त दर्शनासाठी कुरवपुर येथे पोहचताच श्रीपाद क्रुष्णा नदीच्या जलावरुन चालतच पैलतीराला गेले व त्यांस आशिर्वाद दिले व त्यांस भविष्य काळात चरित्र लिखाणाची परवानगी दिली.
सन २०१२ च्या नोव्हेंबर मध्ये अॅमस्टरडॅम येथील जीन(जर्मन उच्चार जाॅन) यांस श्रीपादांनी दर्शन दिले व त्याच्या डोळ्यांसमोर"श्रीपाद श्रीवल्लभ संपुर्ण चरितामृतम् "धरुन यापुढे फक्त हेच वाचायचे असे आदेशित केले.जीनने नेटवरुन शोध घेतला व तो पिठापुर येथे २८ फेब्रुवारी २०१३ मध्ये आला.
दुस-या दिवशी १ मार्चला बाबा शेडमध्ये गादीवर योगनिद्रेत होते.दुपारचे ३ वाजले तरी चेह-या वरिल
पांघरुन काढत नव्हते.३ वाजता जूनने शेडमध्ये पाय ठेवला व बाबांनी पांघरुन झटकन फेकले व हात करन त्यास जवळ बोलावून बसायला सांगितले.सायंकाळी ५:४५ ला बाबांनी मला खुण करुन त्यास पिठापुर गावात बरोबर घेउन जाण्यास आदेश केला.मी त्यास गावात घेउन आलो,तो २ दिवस फक्त चाॅकलेट व पाण्यावर होता.संस्थानमधुन त्याची बॅग घेतली.बाबांच्या किचमध्ये तो भरपेट जेवला.रात्री ९ वाजता त्यास आश्रमात बाबांच्या रुममध्ये घेउन गेलो.बाबा पुर्ण तुर्यावस्थेत.किलकिल्या डोळ्याने पाहिले व बसा म्हणाले.बाबांनी त्यांचे चरण जीनच्या चेह-या समोरधरले.जीन रात्री बाबांच्या रुममध्ये राहिला. रात्री बाबांनी त्यास स्वप्न देउन डच भाषेत बोलले की तु सप्टेंबर मध्ये परत ये.सकाळी जीन बोलला की तो हाॅलंडमध्ये शिक्षक असुन पुरेस्या पैशा अभावी सप्टेंबर मध्ये परत भारतात येणे मुश्कील आहे.त्याने हिमालय भेटीचा कार्यक्रम रद्द केला व
तो हाॅलंडला परत जाईपर्यंत बाबांजवळ दिड महिना राहिला.परत हाॅलंडला जाण्यासाठी तो जेंव्हा मुंबई
विमानतळावर चेक इन ला काउंटरवर आला तेंव्हा
डच एअर लाईंन्सने त्याला सांगितले की काँप्युटर सिस्टिमवर आजच्या फ्लाईटचे एक सिट विमान क्षमतेपेक्षा जास्त बुक झाले आहे तरी तुम्ही उद्याच्या
फ्लाईटने जाल का?जीनने हो म्हणतां एअरलाईंसने
त्याची सोय फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये जेवण व गाडीसह केली व जीनने विनंती स्वीकारली म्हणुन
त्यांस भारताची एक ट्रीप फ्री दिली.या फ्री ट्रिपमुळे
बाबांनी सांगितले तसे जीन सप्टेंबर मध्ये परत
पिठापुरला बाबांजवळ येउन राहिला.त्याने
"श्रीपाद श्रीवल्लभ संपुर्ण चरितामृतम "चे डच भाषांतरण केले व पहिली प्रत बाबांच्या श्रीचरणी
अर्पण केली.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"