Sunday, September 29, 2019

प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३० सप्टेंबर  🌸*

 *प्रपंचात  असावी  खबरदारी  ।  मन  लावावे  रामावरी  ॥*

सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥
रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण॥
म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥

व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥

स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥
प्रयत्नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥

मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥

आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥ 
नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥ 
म्हणून परमात्मा आणि प्रयत्न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥
जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥
चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥
राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥

देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥
संतांची संगति ।रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥ व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥

रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । 
वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।
आल्या अतिथा अन्नदान ।
भगवंताला भिऊन वागणे जाण ।
याविण परमार्थ नाही जाण ॥

 प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।त्याचा राम होईलदाता । न करावी कशाचीहि चिंता ॥

करवंटीचे कारण ।खोबरे राहावे सुखरूप जाण । तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥
परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥
प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥
प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचेबोल । मनी ठसवावे खोल ॥
पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्नांती राम ।हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥

कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥
प्रयत्न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥
कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥
जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥

*२७४ .   दाता  राम  हे  आणून  चित्ती ।   आपण  वर्तावे  जगती ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, September 28, 2019

शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन

२३ सप्टेंबर
शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन.
एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की, "तू आपल्या मुखानेच सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल." तेव्हा परमात्मा म्हणाला, "भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते." भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन, थोरवचन आणि आत्मसंशोधन. आपले सध्या सगळे विपरीत झाले आहे. शास्त्रवचन म्हणावे, तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की, हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते, 'मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू ? यापासून माझा काय फायदा होणार?' तसेच आत्मसंशोधनाचे. आपण शोधन करतो ते कसले, तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव-पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा, अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले, "मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते, निर्याणस्थळ कोणते, याची आता खात्री झाली." मी म्हणतो की, ते करतात ते ठिक आहे. पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी, कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरूरी वाटली नाही; त्यांनी दृढ उपासना करून कृष्णाला आपलेसे केले. खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने हृदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे.

आपण जर आपले वर्तन पाहिले, मनातले विचार बघितले, तर आपल्याला असे आढळून येईल की, लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो, याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही. आपल्याला तो पुरता ठाऊक असतो. अभिमान खोल गेलेला, विचारांवर ताबा नाही, साधनात आळशीपणा; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे, आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, 'रामा, आता मी तुझा झालो; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन; तू मला आपला म्हण.' देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही, शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो.

२६७. नाम घेण्यात एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे.

कुटुंबात कसे वागावे ?*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ सप्टेंबर  🌸*

 *कुटुंबात  कसे  वागावे ?*

देहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बरोबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. 

मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे., म्हणजे कुळाची कीर्ति वाढते. 
मोठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नोकर होऊन राहावे. बाईनेही पतीपरते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. 

जो मनुष्य तरूणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणीही स्वाभाविक रीतीने वागता येईल; म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. 
आपण अस्वाभाविक रीतीने, म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे, म्हातारपणी कर्तेपण कमी होते आणि आसक्ती मात्र टिकते; आणि ती तापदायक बनते. 

ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो, त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल; पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही, आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. 

म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावे ! 
पण मी सांगतो ना !, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही.

प्रपंचात वागत असता प्रत्येकाने अंतर्मुख होऊन, आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावेत आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. 

वयाची सोळा ते पंचवीस वर्षे हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेलीअसते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आईबाप सांगतील त्याप्रमाणे वागणे हे होय; कारण आपले हित व्हावे यापलीकडे त्यांचा दुसरा हेतू नसतो. 

जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसे शक्य आहे ? म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यावा. आपले आईबाप एखादे वेळी चुकणार नाहीत असे नाही, कारण चुकणे हा मनुष्याचा धर्मच आहे; परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते, तिच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. 

कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. 
सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वात मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि निःशंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.

*२६८ .   आपले  अवगुण  शोधावेत  व  त्यांचा  त्याग  करून  गुण  घ्यावेत .*

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

अखंड अनुसंधान ठेवण्याकरिता काय करावे

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २५ सप्टेंबर  🌸*

 *अखंड  अनुसंधान  ठेवण्याकरिता  काय  करावे  ?*

भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आणि ती चालवून आपण काम करतो, 
म्हणजे भगवंतच आपल्याकडून सर्व कर्मे घडवीत असतो. त्याच्या प्रेरणेनेच सर्व घडते आहे, अशी भावना प्रत्येक कर्मात ठेवली, म्हणजे भगवंतावर प्रेम जडते. 

जे जे काही करायचे ते भगवंताकरिता करावे; म्हणजे पापपुण्याची बाधा आपल्याला होणार नाही. 
एकदा कबीराच्या घरी पाहुणे आले. घरात तर त्यांना जेवू घालायला काही नव्हते. आणि अतिथीला भगवत्स्वरूप पाहावे असे शास्त्र आहे, तेव्हा कबीराने त्यांना पुरेल इतक्याच धान्याची चोरी केली. चोरी करणे हे वाईट असले,तरी ती भगवंताकरिता केल्यामुळे तिचे पाप त्याला नाही लागले. 

निदान, कर्म झाल्यावर तरी भगवंताचे स्मरण करून ते त्याला अर्पण करावे, म्हणजे हळूहळू अभिमान कमी होऊन भगवंतावर प्रेम जडेल.

आपण भगवंताचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधणे कठीण आहे. 
त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे, जे काही घडते आहे ते भगवत्प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे, अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. 
आणि हेही साधत नसेल, तर वैखरीने अखंड नामस्मरण करावे. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असते. 

सध्या आपले उलट चालले आहे; आपण देहाने पूजा करतो, यात्राबित्रा करतो, पण मन मात्र प्रपंचाकडे ठेवतो. 

सासरी असलेली सून कुटुंबातल्या सर्वांकरिता कष्ट करते; नवर्याचे कदाचित् ती फारसे करीतही नसेल, पण अंतःकरणात मात्र ती फक्त त्याच्यासाठीच असते. तसे, प्रपंचात सर्वांकरिता सर्व करावे, पण मनात मात्र 'मी रामाचा आहे' ही अखंड आठवण ठेवावी. 

आपले स्टेशन ठरून आपण गाडीत बसल्यावर मध्ये अनेक गोष्टी घडतील; उभे राहावे लागेल, निरनिराळ्या तर्हेचे लोक भेटतील. पण स्टेशनावर उतरल्यानंतर त्या आनंदामध्ये मागचे सगळे आपण विसरून जातो. तसे भगवंताचे ध्येय निश्चित करावे. 
भगवन्नाम हे भगवत्कृपेसाठी घ्यावे, कामनापूर्तीसाठी नसावे; नामच ध्येय गाठून देईल. 

भगवंताप्रमाणे आपणदेखील, प्रपंचात असून बाहेर राहावे; आपल्या देहाकडे साक्षित्वाने पाहायला शिकावे. 
पण ते साधत नसेल, तर व्यापात राहून अनुसंधानात असावे. 

वाचलेले विसरेल, पाहिलेले विसरेल, कृती केलेली विसरेल, पण् अंतःकरणात घट्ट धरलेले भगवंताचे अनुसंधान कधी विसरायचे नाही.

*२६९ .  कलियुगात  अवतार  नसला  तरी  'नामावतार'  आहे ,  आणि  तोच  खरा  तारक  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

प्रपंच हे साधन , परमार्थ हे साध्य .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ सप्टेंबर  🌸*

*प्रपंच  हे  साधन ,  परमार्थ  हे  साध्य .*

मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 
'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. 

प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. 
प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही.

जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. 

समई लावली पण तेल बरोबर न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील.
 परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. 

पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार ? 
परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.

आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. 

घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे.

 संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. 

मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच.
परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट, प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच.
 संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे.

खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.

*२७३ .   कर्तृत्व  न  घेईल  तरजीव  सुखदुःख  भोगणार  नाही .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, September 27, 2019

भगवंताला विसरणे ही आत्महत्याच

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २६ सप्टेंबर  🌸*

*भगवंताला  विसरणे  ही  आत्महत्याच .*

एकदा एका माणसाने पक्वान्ने कशी तयार करावी हे शिकविण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या साहाय्याने, निरनिराळी पक्वान्ने कशी तयार करायची, हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरते पीठ देखील मिळत नसे; त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरे ? 
त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखे आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो, त्याला त्यापासून तसा काही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही, ते ज्ञान खरे असले तरी आपल्याला उपयोगाचे नाही.

आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की, आपण जगतासाठी देव मानतो, तर संत देवासाठी जगत मानतात. 

खरे म्हणजे, जी गोष्ट आचरायला अतिसुलभ असते, ती समजावून सांगायला फार कठीण असते; ती खरी अनुभवानेच जाणायची असते. 

ज्याचा अनुभव दुसर्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा; म्हणजेच, जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दॄष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे; त्याला विसरणे ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात, म्हणजेच त्याच्या नामात, राहाण्याचा प्रयत्न करावा.
सर्व कीर्तनांचे सार हेच असते. फक्त मांडणी निराळी.

रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितले. जो तो 'हूं, हूं' करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारूती अती बुद्धीमान्; त्याने 'सीतेला कसे ओळखायचे' म्हणून विचारले. त्यावर श्रीरामांनी तिचे पुष्कळ वर्णन केले. ती सुंदर आहे म्हणून सांगितले. परंतु स्त्री कशी दिसते हेच त्याला माहिती नाही ! 
तेव्हा श्रीरामप्रभू त्याला म्हणाले, "तुला मी काय सांगतो हे कळलेले दिसत नाही; तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव, जिथे तुला रामनामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज." तेव्हा ती खूण मारुतिरायाला पटली. 

ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचे सार्थक झाले, त्याचा परमार्थ सफल झाला, आणि त्याला जगात मिळवायचे बाकी असे काही राहिलेच नाही. 

मारुतिरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटले, याला आता काहीतरी 'चिरंजीव' असे दिल्याशिवाय याचे समाधान होणार नाही; 

म्हणून चिरंजीव असे हे आपले नाम त्याला त्याने दिले. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला.

*२७० .   सर्व  संतांचे  सांगणे  आहे  की ,  मनापासून  भगवंताचे  नाम  घ्या  आणि  आपले  कर्तव्यकर्म  करा .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो.

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ सप्टेंबर  🌸*

 *अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो.*

अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो.

 'मी म्हणेन तसे होईल,' असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. 

अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते.
 एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच. 

अभिमान म्हणजे 'मी कर्ता' ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले, तर् व्यवहारात कुठे नडते ? 
आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजुड देह कामाचा नाही. 

आपले मन तयार झाले पाहिजे. 'मी भगवंताचा आहे' हे एकदा मनाने जाणून घेतले, म्हणजे मग अभिमानरहित होता येते. नेहमी भगवद्‌भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. 

डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. 

अमुक एक गोष्ट अमक्या तर्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे, आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे.

आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरूणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की, 'मी कुणाचा द्वेष-मत्सर करतो का ?' तसे असेल, तर ते मनातून जबरीने काढून टाकावे; ते थोडे जरी शिल्लक राहिले, तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे; 

आपल्या मनाने आपल्याला निश्च्ययाने असे सांगितले पाहिजे की, 'मी कुणाचाही द्वेष करीत नाही.' 

आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की, आपण तर कुणाचा द्वेष-मत्सर करू नयेच नये, 
परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. 

'मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही,' असे अखंड अनुसंधान् ठेवून, आपल्याला भगवत्स्वरूप का होता येणार नाही ? 

जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय' आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते, त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी, आणि तोच खरा मुक्त समजावा.

*२७२. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, September 26, 2019

*स्मरण ही कृती आहे .*

*‌‌।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ सप्टेंबर  🌸*

*स्मरण  ही  कृती  आहे .*

गुरूने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे, आणि तो करतो ही ही गोष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे. 

देहातीत व्हायला, गुरूआज्ञे प्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 
'मी देही नाही' असे म्हणत राहिलो तर केव्हातरी देहातीत होईन. 
दुसरा मार्ग म्हणजे 'भगवंत माझा' म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. 

समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतिधर्म सांभाळा, आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. '

मी जे जे करतो ते ते भगवंताकरिता करतो' असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. 

भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे. 

भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय. 
तोच काळ सुखात जातो की जो भगवत्स्मरणात जातो. खरोखर, स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे.

 भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय, आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. 

आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते. विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते; पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणे अगदीच सोपे नाही; परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे.

भगवंताची भक्ती ही सहजसाध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केले पाहिजे; तिथे अनुभव लवकर येईल. 

पहार्यावर शिपाई जसा जागृत राहतो, त्याप्रमाणे अनुसंधान जागृत् ठेवले तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील.
चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून, अनुसंधान चुकू देऊ नये. 

ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे, वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही. त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. 

एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, 'आता मी मोकळा झालो बाबा !' नंतर चार दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे, आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे, आणि मग मजेने संसार करावा; आपल्याला अगदी आनंदच मिळेल. 

उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे; त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. 

प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, याला भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे म्हणतात.

*२७१.  भगवंताच्या  इच्छेने   अकर्तेपणाने  कर्म  करणे,  हेच  अनुसंधान  ठेवणे  किंवा  भक्ती  करणे  होय.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Monday, September 16, 2019

परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १७ सप्टेंबर  🌸* 

*परमेश्वर  प्राप्तीची  तळमळ  हवी .*

परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी?
 बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? 

तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून ! असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. 

परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला. 

तुकाराम, रामदास,यांना एका परमेश्वरावाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले, परंतु भाऊ म्हणाला, 'बाळ, तू अजून लहान आहेस.' रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. 

परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातिधर्मावर अवलंबून नाही; ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरूरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. 
रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले कि, "रामा मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे." एवढे प्रेम,एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार !

परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही. 

परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर, भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते, आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा.

*२६१ .   आपण  नामाची  जागृती  ठेवली  तर  विकारांना  बाहेर  पडता  येणार  नाही .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, September 15, 2019

भगवंताचा विसर हेच मोठे पाप

९ सप्टेंबर
भगवंताचा विसर हेच मोठे पाप !
खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे पाहावे. ज्यांनी भगवंताला जाणले, त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे. 'सर्व विषयवासना सोडून भगवंताला शरण जावे' हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे; कारण स्वतः अनुभव घेऊन, म्हणजेच स्वतः मुक्त होऊन, त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखविला. जन्ममरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहीले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही ? मग भगवंताला शरण जायला का भ्यावे ? खरोखर, सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.

नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुऊन मागे लागतात. म्हणजे मी आतबाहेर विषयाने किती भरलेला आहे ! तथापि काही झाले तरी दृढनिश्चयाने नाम चालू ठेवावे. प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत ? मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण ? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही; त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढविण्याकरिता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. आपली पापे मनात आणू नयेत. माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो, नाही का ? स्वतःचे मनच स्वतःला खाते याला काय करावे ? काल झालेले आज नाही सुधारता येणार; पण चालू क्षण मात्र दवडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखे मानावे. भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे हे पक्के ध्यानात ठेवावे. प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरिता, भगवंत जोडण्याकरिता, थोडे कष्ट का घेऊ नयेत ? खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना, म्हणजेच विषयांचे हवे-नकोपण जसजसे कमी होईल, तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तर्‍हेने, 'तू आहेस, मी नाही' ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल, तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल. निदिध्यासाने आनंद-साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय.

२५३. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की, बाकीच्याचा त्याग आपोआप होतो.

देव आहे ..... देव नाही : एक अनुभव

व्हाट्सअप्प वर आलेली पण खूपच छान अनुभव ह्या ताईचा. नक्की वाचा.
श्री गुरुदेव दत्त
*देव आहे.....देव नाही*

*जय गिरनारी*
साधारण २००३ मधे मी संधीवाताने आजारी पडले. हळूहळू  *बेडरीडन* झाले. गुडघ्यात गॅप..त्यात लंबर कंप्रेशन....डॉ. नी तातडीने आॅपरेशन करायला सांगितले. काही सुचेना. अगदी पाय घासूनच चालत असे मी. पाय उचलेचना. कुणाचा मानसिक आधार नाही. प्रचंड तणावाखाली जगत होते. दादरच्या *डॉ. रामाणीं* ची ट्रिटमेंट घेत होते. त्यांनी पंधरा दिवसांची मुदत दिली ऑपरेशन साठी. मी फार देवदेव करणारी नाही पण माझी देवावर अपार श्रद्धा आहे. आणि त्याच्या कृपेने खूप सकारात्मकही आहे. दीड वर्ष जागेवर होते पण दृढ विश्र्वास होता मी ह्यातून बाहेर पडणार. माझं प्राक्तन तर मला भोगावं लागणारच होतं पण देवाने माझ्या त्रासाचं प्रमाण खूप कमी केलं. 

कोणी तरी म्हणाले सेकंड ओपिनियन घ्या. डॉ. इंगलहलीकरांचा पत्ता दिला. डॉ. इंगलहलीकर देवा सारखे भेटले. तेव्हा त्यांचे क्लिनीक ठाणे स्टेशनला लागूनच होते. मी त्यांच्या कडे गेले. मला त्यांनी पाऊण तास तपासले आणि स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले *मीच काय पण मी हिला कोणालाही हात लावू देणार नाही* हिच्या मसल्स आणि नर्व्हस विक आहेत. हिचं आॅपरेशन करायचं नाही. एका जागेवर बसेल ही. अंतर्बाह्य घाबरले पुर्ण गोठून गेले. त्यांनी माझी अवस्था बघून मला शांत केलं. काही व्यायाम प्रकार दिले. जोडीने पंचकर्म केले आणि जवळजवळ सहा महिने झोपून प्राणायाम केला. देवाला नम्रतेने सांगितले "धावले नाही तरी चालेल पण तू मला चालवणार हे नक्की. दोन वर्षांनी माझ्या पायावर उभी राहिले. 

२०१० मधे  *रेकी* चा कोर्स केला. तिनही लेवल केल्यात. तेव्हापासून आजतागायत न चुकता रेकी करतेच दिड तास, एक तास, अर्धा तास तर करतेच करते.  

आज मी *९५%* ओके आहे. तीच मी आज योगाचे क्लासेस घेते सगळी आसनं करते. देव आपली शिक्षा सुसह्य करतो हे खरं फक्त श्रद्धा आणि सत्कर्माची जोड हवी.

त्याच्याच भरवश्यावर *कर्दळीवन* केले. सात पहाड चढले. आणि तीन महिन्यांपूर्वी दत्तप्रभूंच्या भेटीला *गिरनारला* गुरूशिखरावर जाऊन आले. सगळ्यांनी समजावले होते "बघ विचार कर दहा हजार पायऱ्या आहेत." तुला गुडघ्यांचा त्रास आहे. मनातून घाबरत होते आणि माहाराजांना भेटायचे पण होते. मग रोज *स्वामी समर्थांच्या* मठात त्यांना त्रास द्यायला जायचे. अन् म्हणायचे स्वामी मला शक्ती द्या गिरनार चढायचेय. आणि लक्षात असू द्या तुम्हाला पण माझ्या सोबत यायचेय.‌ आणि  जाण्याचा दिवस उजाडला. द्वारका सोमनाथ जुनागड आणि गिरनार. पोटात गोळे यायचे सारखे आणि मनोमन स्वामी अशी हाक द्यायचे. 

द्वारकाधिशाचं दोनदा मनभरून दर्शन घेतले. सोमनाथाला प्रेमळ विनवणी केली. चल बाबा गड चढायला म्हणून. सोमनाथाचं दर्शन घेताना दोन गृहस्थ भेटले म्हणाले दत्तप्रभूंच्या मागे पंचधातूची कमान बसवली..कालंच गिरनार उतरलो. अहो काय सांगावे प्रचंड पाऊस वारा आणि थंडीने गारठून गेलो आम्ही. गोरक्षशिखरावर तर थंडी,वाऱ्यामुळे चालता येईना. सांभाळून जा काहीतरी गरम कपडे न्या. पुन्हा पोटात गोळा. पुन्हा स्वामींना डोळे बंद करून पाचारण. तितक्यात एक तेजःपुंज पस्तीशीचे गृहस्थ आले हातात चांदीची पेटी आणि त्या पेटीत *माहाराजांच्या* चांदीच्या पादुका. काय वर्णू तो आनंद. नमस्कारा आधी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष केला. आणि नवऱ्याकडे वळून आपली गिरनार वारी सक्सेस होणार असं आपल्याला सांगायला माहाराज स्वत: आलेत बघा असं म्हणाले आणि त्या सद्गृहस्थांना "दादा मी स्पर्श करून नमस्कार करू?" असे विचारले. ते सुंदर हसले..करा हो म्हणाले. मी मस्तक टेकवले आणि संपुर्ण शरीरात काहीतरी शिरतय असं जाणवलं. डोकं वर करवेचना. प्रयासाने दूर झाले. मनात अवधूताना, स्वामींना आळवत. 

लॉजवर येवून सामान घेऊन जुनागड साठी निघालो. छातीत धडधड, पोटात गोळा आणि मुखात स्वामीजप. पहिल्या पाचशे पायऱ्यात पाय जाम झाले. पुन्हा "स्वामी मी डोली करणार नाही तुम्ही मला चढवणार" असं दृढ निश्चयाने सांगितलं. धावा केला. आणि मग भरभर स्वामींनी उचलून नेलं. पाच तास दहा मिनिटात दत्तमहाराजांच्या पुढ्यात. काही सुचेना. नुसतीच चरणकमल बघत होते. ह्यांनी पुजेचं सामान दे म्हंटल्यावर उपरण, चाफ्याची फुले, हिना अत्तर, पेढे यंत्रवत पुजाऱ्याच्या हाती दिले. दिढमुढ अवस्था झाली होती. साक्षात श्रीदत्तप्रभूंनी बारा हजार वर्षे उभं राहून जिथे तपश्र्चर्या केली त्या पवित्र पावन जागेवर आता मी उभी होते..प्रचंड आनंदाचा क्षण होता तो. चलो आगे असे शब्द ऐकून पुढे झाले. गुरूशिखर उतरू लागले. मन माहाराजांच्या धुंदीतच मग्न. 

आणखी एक उपरण नेलं होतं कोणा दिव्यव्यक्तिस देण्यासाठी. आतापर्यंत कोणी तसं जाणवलं नव्हतं. उतरताना *चला* असा मोठ्याने आवाज आला. मी आणि स्मिताताई बाजूला झालो. तेजःपुंज, किरकोळ शरीरयष्टीच्या त्या तरुणात मला चक्क जटाधारी शंकर दिसले कमंडलू सहित. ताई ह्यांना मी उपकरणं देते म्हणेपर्यंत वाऱ्यासारखी ती मुर्ती दिसेनाशी झाली सुद्धा. आम्ही दोघी एकमेकींकडे बघतच राहिलो.
त्यांना मी विचारलं ताई तुम्हाला काही जाणवलं काहो ?? त्या म्हणाल्या माहात्मा वाटतं होते ते. तुम्ही उपरण हातातच ठेवायला हवं होतं.

मी ऐकून होते की गिरनारला प्रत्येकाला दत्तमाहाराज दर्शन देतात आणि बहुतेकांना शंकराच्या वेशात दिसतात. मी स्वत: ती अनुभूती घेतलीय.
तीन दिवस माझे पाय आणि गुडघे एकदम ठणठणीत होते. संधीवाताचा जबरदस्त त्रास असलेली मी कशी काय दहा हजार पायऱ्या चढले..उतरले? आश्र्चर्य होतं खरं. पण हे कोडं नाही तर स्वामींची कृपा आहे.

आहे हो..खरंच आहे..कलियुगातही *देव आहे*.. फक्त श्रद्धापूर्वक अंत:चक्षूने बघा.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

भारती वार्डेकर....
नेरुळ, नवी मुंबई....

थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे.

८ सप्टेंबर
थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे.
माया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नासते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत, तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुणरूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. 'मी निर्गुणाची उपासना करतो' असे जो म्हणतो, त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही; कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही.

एकाने मला सांगितले की, "मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत." त्यावर मी त्याला म्हटले की, "तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे!" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच काय ते मिळाले नाही." मग एवढे वाचून काय उपयोग झाला ? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे ? आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन, त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो, तो 'माझे पोट भरावे' असे कधी शब्दांनी म्हणतो का ? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते ! आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय ? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे.

शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल; आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष, आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते, या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे.

२५२. देह केव्हा जाईल याचा नियम नाही. म्हणून, 'वृद्धापकाळी नामस्मरण करू' असे म्हणू नये.

पैसा नीतिधर्माने मिळवावा

*।।  श्री  राम  जय  राम जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ७ सप्टेंबर  🌸*

*पैसा  नीतिधर्माने  मिळवावा .*

काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. 

पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली, तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार ? पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जिवापाड श्रम करून जो कमवायचा, तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग ?

 पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे; आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूरआहे. पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. 

पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदाकदाचित तो गेला, तर भगवंताच्या इच्छेने गेला, असे म्हणून, आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही; आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. 

अशी म्हण आहे की, 'पैसा पुरून उरावा इतका मिळावा.' पण आपल्याला जगात काय आढळते ? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही 'पुरून उरणे' नव्हे. याच्या उलट, आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे. 

मनुष्य नेहमी म्हणतो की, 'माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे; मी काय, आज आहे आणि उद्या नाही.' पण आपण जसे खात्रीचे नाही, तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत ? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही.पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले, असे योगवसिष्ठात वर्णन आहे. तसे ते आपल्यालाही लागू आहे; फरक एवढाच की, रामाचे उदासपण पैसा'असणेपणाचे' होते, आणि आपले उदासपण पैसा'नसणेपणाचे' आहे. 

पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते. पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते. आता, आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा; अर्थात, राहिलेला सगळा दुसर्याचा. त्याचा लोभ करू नये. 

श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी, म्हणजे लक्ष्मीसाठी, सर्व जीवन खर्च करतो. पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली, की ती आपला नाश न करता, आपल्या आनंदाला कारण होते.

*२५१ .  पैसा  हा  नीतिधर्मानेच  मिळवावा ;  तो  वाटेल  त्या  मार्गाने  मिळवणे  इष्ट  नाही .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

अखंड अनुसंधान हेच संताच्या चरित्राचे मर्म

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १५ सप्टेंबर  🌸* 

*अखंड  अनुसंधान  हेच  संताच्या  चरित्राचे  मर्म .*

कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते. 

भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून, गाढव मागण्यासारखे आहे. 
नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असताना पैसा, लौकिक किंवा संतती आपण मागितली, तर ते दुःखालाच कारण होते. 

नामात स्वतःला विसरायला शिकावे; असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी. नाम घेत असताना स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय.

 जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला, त्यालाच माझे चरित्र कळले; नुसत्या तर्काने ते कळणार नाही.

 सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्व असते, आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे.

 देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही; म्हणून संताच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. खरे म्हणजे संताचा चरित्रकार जन्माला यावा लागतो.

मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मस्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत, हरिहरामध्ये भेद नाही असेच श्रृतिस्मृतीही सांगतात. 

श्रीशंकरालाही अत्यंत प्रिय असेलेले रामनाम आपण अखंड घ्यावे. श्रीशंकरापासून श्रीसमर्थांच्यापर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले, त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले. 

रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवत्वाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामनामाचा आधार घेऊन सर्वांनी राम जोडावा. राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा.

मी देव पाहीला आहे; पण ज्या डोळ्यांनी देव पहायचा असतो ते हे डोळे नव्हेत. ते ज्ञानचक्षू असतात, आणि भगवंताचे नाम सतत घेत गेल्याने ते प्राप्त होतात.

 माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की, काळजी न करता,'परमात्मा सर्व करतो' ही भावना ठेवायला शिकावे. 

जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो, तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल.

*२५९ .  ज्याच्या  मुखी  नाम  आहे ,  त्याच्या  हृदयामध्ये  माझी  वसती  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

भगवंताकडे मन लावावे व देह प्रारब्धावर सोपवावा

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १६ सप्टेंबर  🌸*

*भगवंताकडे  मन  लावावे  व  देह  प्रारब्धावर  सोपवावा .*
 
खरोखर, प्रारब्धाचे भोग कुणालाही टळत नाहीत. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो, मनाशी नाही. देहास सुखदुःख प्रारब्धाने मिळते. 

दुःख कोणालाही नको आहे, पण ते येते. सुखाचेही तसेच आहे. 

प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. हे चांगले वा वाईट असू शकते. सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही, पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो, "मी देवाचे एवढे केले, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे, मग मला असे दुःख का भोगावे लागते ?" पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे. त्याला देव किंवा संत काय करील ? 

समजा, आपल्याला काही पैशाची जरूरी आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मनेजर आहे; पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसले तर तो काहीही करू शकत नाही. फारच झाले तर तो आपल्या स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल. त्याचप्रमाणे, आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार ? संत फार तर जरूरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून आपला भार हलका करील इतकेच. म्हणून आपल्या प्रारब्धाने आलेल्या बर्यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे.

 खरा भक्त हा देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे वा न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते. म्हणून तो भोग टाळत नाही.

मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमीजास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे, म्हणजेच प्रारब्धाप्रमाणे, कमीजास्त प्रमाणात येतात.

 आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. 

जगातल्या घडामोडी जशा चालतात, तशाच आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धानेच चालतात. आपल्याला येणार्या आपत्ती आपल्या प्रारब्धाच्या असतात; त्या भगवंताच्या नसतात; त्या पाहुण्यासारख्या असतात. त्या जशा येतात तशा जातात देखील. आपण होऊन त्या आणू नयेत, आणि प्रारब्धाने आल्या तर त्यांना घाबरू नये. 

प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. 

जो संताची किंवा सद्गुरूची आज्ञा पाळतो, त्याचे प्रारब्ध हे प्रारब्धरूपाने राहात नाही. 

भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.

*२६० .   भगवंताचा  जो  झाला ।  त्याला  देह  प्रारब्धावर  टाकता  आला ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, September 14, 2019

रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १० सप्टेंबर  🌸*

*रामापायीं  ठेवा  मन ।  नाम  घ्यावें  रात्रंदिन ॥*

राम हा तारक मंत्र निराकार । जपा वारंवार हेचि एक ॥
हेचि एक करा राम दृढ धरा । पुनरपि संसारा येणे नाही ॥
येणे नाही पुन्हा सांगितली मात । जानकीचा कांत आळवावा ॥

पार्वतीरमण जपे रामनाम । विषयाचे दहन तेणे झाले ॥
दीनदास म्हणे वाल्मीक तरला । पापी उद्धरीला अजामेळ ।

जयासी लागला रामनामचाळा । आठवी गोपाळा सर्वकाळ ॥
सर्वकाळ मति संतांचे संगती । जोडिला श्रीपति येणे पंथे ॥

तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक । धरूनि विवेक जपे सदा ॥

हनुमंते केले लंकेसी उड्डाण । रामनाम ठाण हृदयामाझी ।दीनदास म्हणे वानर तरले । नामी कोटि कुळे उद्धरती ॥

रामनामाविणे साधन हे जनी । बरळती प्राणी स्वप्नामाजी ॥
स्वप्नीचा विचार तैसा हा संसार । सोडुनि असार, राम ध्यावा ॥

रामनामध्वनी उच्चारिता वाणी । पापाची ते धुनी होय तेणे ॥
सिंधूचे मंथन रत्नांची खाण । तैसे हे साधन रामनाम ॥

वेदाचेही खंड योगाचे ते बंड । त्याचे काळे तोंड, दास म्हणे ॥
मन हेचि राम देही आत्माराम । जनी मेघश्याम पाहे डोळा ॥
पाहूनिया डोळा स्वरूपी मुरावे । वाचेसि असावे रामनाम ॥

नारायणनामे प्रल्हाद तरला । अजामिळ झाला एकरूप ॥
एकरूप झाले वसिष्ठ महामुनि । तया चापपाणि वश झाला ॥
दीनदास म्हणे स्मरे । संसाराची चिंता त्यासी नसे ॥

जनी जनार्दन रामाचे चिंतन । सत्याची ही खाण रामनाम ॥
गाईचे रक्षण भूतदया जाण । अतिथीसी अन्न घाला तुम्ही ॥
संताचा संग विषयाचा त्याग । रामनामी दंग होऊनिया राहे ॥
राम कृष्ण हरि एकचि स्वरूप । अवताराची लीला वेगळाली॥
दिनदास सांगे लावूनिया ध्यान । तुम्ही आत्मज्ञान जतन करा ॥

यत्न परोपरी साधनाचे भरी । आवळे घेता करी तैसे होय ॥
तैसे होय, म्हणुनी करा, त्याग । साधावा तो योग रामनामे॥
रामनामी आस ठेवूनिया खास । वृथा न जाय श्वास ऐसे करा ॥

ऐसे करा तुम्ही संसारा असता । वाया आणिकपंथा जाऊ नका तुम्ही । येतो आता आम्ही, कृपा करा ॥
शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी । संसारजाचणी पडू नका ॥

रामपाठ तुम्हा सांगितला आज । आणिकाचे काज नाही आता ॥
नित्यपाठ करी माणगंगातीरी । होसी अधिकरी मोक्षाचा तू ॥

ब्रम्हचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे । दीनदास जपे राम सदा ॥

*२५४.  मनी  धरा  राम  हाती  धरा  काम ।  वाउगाचि  श्रम  करू  नका ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

नाम अभिमानाचा नाश करते .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १२ सप्टेंबर  🌸*

*नाम  अभिमानाचा  नाश  करते .*

दुसर्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की, भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे. पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला !
'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' असे नसावे.
जे आपण दुसर्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे.

माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. 

नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे.

खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते, लहान अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे. 'यश देणे न देणे तुझ्या हाती आहे' असे म्हणून रामास शरण जावे. 

जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीरसुखभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत. 
परंतु खर्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध, एक साधुसंतच करू शकतात, त्यांनी समाधानाची म्हणून  जी काही साधने सांगितली आहेत, त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल.

आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करीत असताना, किंवा केल्यावर, त्याबद्दल अभिमान झाला नाही, तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पाहा ! 

एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती. ती वयात आली, दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता; परंतु त्या मुलीचे लग्न पाचसहा वर्षे कुठेही जमू शकले नाही.
पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला,"माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले." 
त्यावर त्याला कोणी विचारले, "मग दोनचार वर्षे आधीच का नाही केलेत ?" तेव्हा तो म्हणाला, "त्या वेळी जमले नाही" मग आता जमले म्हण की. 'मी केले' असे कशाला म्हणतोस ?" असो. 

अभिमान घालवायला, भगवंताला मनापासून शरण जाणे, हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. 
एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला, की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही. तसेच, एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून, 'रामा, मी तुझा झालो आणि तू माझा झालास,' असे अनन्येतेने म्हटल्यावर, त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल. ते त्याला अर्पण करण्याची जरूरी नाही. म्हणून, होईल ते कर्म त्याचेच मानावे.

कोणतेही कर्म अर्पण केले असताना 'अर्पण करणारा' उरतोच; तर तसे न व्हावे.

*२५६ .  सत्कर्माने  अभिमान  मरत  नाही ,  भगवन्नामाने  आणि  सत्संगतीने  तो  मरतो .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी .

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ११ सप्टेंबर  🌸*

*चिकित्सा  मर्यादेपर्यंतच  करावी .*

भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. 
अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्‌गुरूकृपा झाल्याशिवाय राहात नाही. 
अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्‌गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ?

 चारपाच वर्षे खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो, तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. 
जे काही होणार ते सद्‌गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे.
साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. 
आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो, ते आता करू लागलो, असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? 

सद्‌गुरूच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते, यात सद्‌गुरू पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा. 

आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते,परंतु घ्यायचे काही जमले नाही; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?

प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. फार चिकित्सा करण्याने नुकसान होते.

विद्येचे फळ काय, तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे आणि 
आपल्याला जे करायचे नाही त्याची चिकित्सा करित बसायचे ! 
चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही.

एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध, तूप खातो; पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी रोग आहे असे नक्की समजावे. 
त्याचप्रमाणे, सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे; हे काही खर्या सुधारणेचे लक्षण नाही. 

परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत, आपल्याला आनंदरूप बनता येईल. 

आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर 'आपण केले' असे थोडेच असते; म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे, आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल.

*२५५ .  'कर्ता  राम  आहे'  असे  ज्याला  वाटले ,  त्याने  सर्व  काही  साधले .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १३ सप्टेंबर  🌸*

*शुद्ध  भावनेशिवाय  सर्व  व्यर्थ .*

भगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येतो, परिस्थिती आड येत नाही. ती व्यसनाच्या आड कुठे येते ?
 
अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे, जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. तोच कर्ता, आपण काहीच करीत नाही, अशी भावना ठेवावी; म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. 

आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे; त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. 

वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. 
ज्याला एकदा नामाची गोडी लागली त्याला प्रपंचाची भीती वाटू लागते. विषय त्याला कडू वाटू लागतात. 

परमात्म्याच्या नामाने संसार बिघडतो हे म्हणणे चुकीचे आहे. नाम घ्यायचे म्हणून कर्ममार्ग सोडू नये. 

नामाची गोडी ज्याला आली त्याचीच कर्मे सुटतात.

नामाचा अनुभव नाही असे म्हणणे खोटे आहे; आपण ते जितके घ्यावे तितके घेतच नाही. नामात प्रेम येईल असे करावे. 
जन्माला आल्यासारखे नामाचे होऊन राहावे. भगवंत आपल्या नामस्मरणात आहे.

 शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ आहे; आणि भाव शुद्ध होण्यासाठी सत्समागमावाचून दुसरा उपाय नाही. 

एकदा त्याचे होऊन राहिले म्हणजे तोच सर्व उपाय काढतो. 'मी' अमुक एक साधन करीन, असे म्हणू नये. 'परमेश्वरा, तूच माझ्या हातून करवून घेणारा आहेस,' अशी दृढ भावना ठेवावी. 

समजा, आपण एक व्यापार केला, त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले, तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही; त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या, पैसा, प्रकृती दिली, त्याला आपण कधीही विसरू नये. 

भगवंत हा सहजसाध्य आहे, सुलभसाध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते 'सहज'होय. म्हणून, 
सहजसाध्य याचा अर्थ, फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. 

भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. 

जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. आपण मनुष्यजन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे.

भोग आणि दुःख यात वेळ न घालविता, भगवंताकडे लक्ष दिले पाहीजे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे, हेच आपले खरे कर्तव्य आहे. याकरिताच सतत त्याचे ध्यान करावे, आणि मनातून आपले भगवंताशी नाते जोडून ठेवावे, यासारखा दुसरा सुलभ उपाय नाही.

*२५७ .  'तुझ्या  नामात  मला  गोडी  दे',  हेच  भगवंताजवळ  मागावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*सत्पुरुषाची लक्षणे

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १४ सप्टेंबर  🌸*

 *सत्पुरुषाची  लक्षणे .*

जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर होतो. 
तो निःस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो. 
स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही. 

असा सत्पुरुष म्हातार्याला म्हातारा, पुरूषाला पुरूष, मुलाला मुलासारखा दिसतो; म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते. 

असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही. 
मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही. 
स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसर्याच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो. 
तो सहजावस्थेत राहतो; म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही. असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा. अशा लोकांनाच संत म्हणतात; 
आणि ते जी जी कर्मे करतात, ती ती भगवंताच्या प्रेरणेनेच आणि भगवंतासाठीच असल्यामुळे, त्या कर्मांच्यापासून जगाचे कल्याण घडते. 
संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निःस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील.

अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरूवात करावी. माझे चुकते कुठे हे पाहावे. 

दुःख भोगण्याची मला पाळी आली, म्हणजे मार्ग चुकला म्हणावे, ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी. 
'मी रोज नामस्मरण करतो, चार वर्षे माझे भजन नाही चुकले , असे आपण म्हणतो; पण 'मी हे सर्व करतो' अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग ? 

मी मेहनत घेतो पण थोडक्यात नासते, ते या अभिमानामुळे. जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते 'स्मरण' कसे म्हणावे ?

 भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून, मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल ? 

मी तुम्हाला खरेच सांगतो, तुम्ही रामाकडे कर्तेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा, तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. 
खुणेने जावे, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे, म्हणजे मार्ग सापडतो.

 खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते.

'भगवंताने माझी आपत्ती दूर करावी, हे म्हणणे वेडेपणाचे आहे. संकटे, आपत्ती आल्या म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही. देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास !

 नामात प्रेम येत नाही याचा विचार करीत राहिलो तर नामाचाच विसर पडतो, हे कुठे ध्यानात येते ! उगीच विचार करीत नाही बसू. 

समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाव घेऊन जी वीट ठेवली ती राहिली, हे लक्षात ठेवा.

*२५८ .   चमत्कार  करणे  हे  संतलक्षण  नव्हे ,  संत  चमत्कार  दाखवावा  म्हणून  चमत्कार  करीत  नाहीत .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, September 8, 2019

परम सिध्द सन्त रामदास जी जब प्रार्थना करते थे तो कभी उनके होंठ नही हिलते थे

🌟🌟 *रात्रि कहानी* 🌟🌟
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
परम सिध्द सन्त रामदास जी जब प्रार्थना करते थे तो कभी उनके होंठ नही हिलते थे !

शिष्यों ने पूछा - हम प्रार्थना करते हैं, तो होंठ हिलते हैं। 
आपके होंठ नहीं हिलते ? आप पत्थर की मूर्ति की तरह खडे़ हो जाते हैं। आप कहते क्या है अन्दर से  ? 
क्योंकि अगर आप अन्दर से भी कुछ कहेंगे, तो होंठो  पर थोड़ा कंपन आ ही जाता है। चहेरे पर बोलने का भाव आ जाता है।लेकिन वह भाव भी नहीं आता !

सन्त रामदास जी ने कहा - मैं एक बार राजधानी से गुजरा और राजमहल के सामने द्वार पर मैंने सम्राट को खडे़ देखा, और एक भिखारी को भी खडे़ देखा !
वह भिखारी बस खड़ा था। फटे--चीथडे़ थे शरीर पर। जीर्ण - जर्जर देह थी, जैसे बहुत दिनो  से भोजन न मिला हो !
शरीर सूख कर कांटा हो गया। बस आंखें ही दीयों की तरह जगमगा रही थी। बाकी जीवन जैसे सब तरफ से विलीन हो गया हो !
वह कैसे खड़ा था यह भी आश्चर्य था। लगता था अब गिरा -तब गिरा ! 

सम्राट उससे बोला - बोलो क्या चाहते हो ?
उस भिखारी ने कहा - अगर मेरे आपके द्वार पर खडे़ होने से, मेरी मांग का पता नहीं चलता, तो कहने की कोई जरूरत नहीं !
क्या कहना है और ? मै द्वार पर खड़ा हूं, मुझे देख लो। मेरा होना ही मेरी प्रार्थना है। "

सन्त रामदास जी ने कहा -उसी दिन से मैंने प्रार्थना बंद कर दी। मैं परमात्मा के द्वार पर खड़ा हूं। वह देख लेगें । मैं क्या कहूं ? 

*अगर मेरी स्थिति कुछ नहीं कह सकती, तो मेरे शब्द क्या कह सकेंगे ?* 
*अगर वह मेरी स्थिति नहीं समझ सकते, तो मेरे शब्दों को क्या समझेंगे*  ?

*अतः भाव व दृढ विश्वास ही सच्ची परमात्मा की याद के लक्षण है यहाँ कुछ मांगना शेष नही रहता ! आपका प्रार्थना में होना ही पर्याप्त है !!*
🙏💥🇲🇰

Saturday, September 7, 2019

थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे

८ सप्टेंबर
थोडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावे.

माया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया. जे दिसते आणि नासते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत, तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये आहे, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुणरूप समजायचे नाही. म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. 'मी निर्गुणाची उपासना करतो' असे जो म्हणतो, त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही; कारण तिथे सांगायलाच कुणी उरत नाही.

एकाने मला सांगितले की, "मी सर्व वेदांतग्रंथ वाचले आहेत." त्यावर मी त्याला म्हटले की, "तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे!" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच काय ते मिळाले नाही." मग एवढे वाचून काय उपयोग झाला ? आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे ? आपण आपली भोळीभाबडी भक्तीच करावी. देवाला अनन्य शरण जाऊन, त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो, तो 'माझे पोट भरावे' असे कधी शब्दांनी म्हणतो का ? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते ! आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय ? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे.

शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल; आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष, आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते, या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्ये करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे.

२५२. देह केव्हा जाईल याचा नियम नाही. म्हणून, 'वृद्धापकाळी नामस्मरण करू' असे म्हणू नये.

Shri M thoughts on worldly miracle

 6 सप्टेंबर 2019

Sri M said..
If you look at life, it's in itself a miracle. You don't need any external miracles.

श्री एम म्हणतात ..
जर आपण (आपल्या मानवी) जन्माकडे पाहिले तर तोच एक चमत्कार आहे. आपल्याला इतर कोणत्याही बाह्य चमत्कारांची गरज नाही.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻


Sri M said…
What we cannot explain, we call a miracle. Usually, miracles happen due to laws of nature that most people don't know of. All the Yogi does is to tap these laws, so that he/she can operate it.

श्री एम म्हणतात …
ज्या घटनेला आपण समजू  (किंवा समजवू) शकत नाही, त्याला आपण चमत्कार म्हणतो. चमत्कार सहसा निसर्गाच्या विद्यमान नियमांमुळे होतात, जे (नियम) बहुतेक लोकांना माहित नसतात. योगीजन ह्या नियमांच्या कक्षेत काम करतात, जेणेकरून ते त्यांचा (जगासाठी) उपयोग करून घेऊ शकतील.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻


Sri M said …
It's dangerous for sadhaks (spiritual aspirants) to get caught up in miracles. Most of the miracles are of this world, and if you get caught up in it, you're also caught up in this world.

श्री एम म्हणतात…
साधकांसाठी (अध्यात्मिक मुमुक्षुंसाठी) चमत्कारांच्या जंजाळात अडकणे धोकादायक आहे. बरेच चमत्कार या जगरहाटी संबंधित आहेत आणि आपण त्यात अडकल्यास, आपण देखील या जगाच्या जंजाळात जखडले जात आहोत.
🙏🏻🌸🌼🔥🌼🌸🙏🏻

A brilliant story from the life of Rahim and Tulsidas

A brilliant story from the life of Rahim and Tulsidas

Rahim used to write poetry dedicated to Krishna. Tulsidas came to know about a unique behaviour of Rahim. While giving alms to the poor, Rahim gave with extreme humility. While giving, he kept his gaze downwards towards the earth.  He never looked at the person he was giving alms to. Tulsidas promptly wrote the following couplet and sent it to Rahim.

" ऐसी देनी देंन ज्यूँ , कित सीखे हो सैन
ज्यों ज्यों कर ऊंच्यो करो , त्यों त्यों निचे नैन "
"O great person, where have you learn this amazing way of giving?
As your hands rise (to give), your eyes look down."

Completing the couplet which Tulsidas wrote, Rahim replied in extreme humility. His reply shows how evolved Rahim was as a soul.

" देनहार कोई और है , भेजत जो दिन रैन
लोग भरम हमपर करे , तासो निचे नैन "
"The Giver is someone else (the God almighty), giving day and night.
The world has a misconception that I am the giver. So, I lower my eyes in embarrassment."

This exchange of couplets reminds me about

*Why do we need a Master?*

*Why do we need a Master?*

Once upon a time, a cow went out to graze in the jungle. Suddenly, she noticed a tiger racing towards her. She turned and fled, fearing that at any moment the tiger would sink his claws into her. The cow desperately looked for someplace to escape and at last, saw a shallow pond. Barely evading the tiger's reach, she jumped into the pond, and in the heat of the chase, the tiger blindly leaped after her.

To the surprise of them both, the pond was extremely shallow yet filled with deep recesses of mud. After toppling over each other, the cow and the tiger found themselves a short distance apart, stuck in the mud up to their necks. Both had their heads above water but were unable to free themselves no matter how much they writhed.

The tiger repeatedly snarled at the cow and roared, "I am going to enjoy the sound of crunching your bones between my teeth!"

He thrashed about in fury but soon became fretful as he found no prospect of escape.

The cow thoughtfully laughed as the tiger struggled to free himself and asked him, "Do you have a master?"

The tiger disdainfully replied, "I am the king of the jungle. Why do you ask me if I have a master? I myself am the master!"

The cow said, "You may be the king of the jungle, but here all your power has failed to save your life."

"And what about you?" Retorted the tiger. "You are going to die here in this mud too!"'

The cow smiled mildly and said, "No, I am not."

"If even I, the king of the jungle cannot free myself from this mud", snapped the tiger, "Then how can you, an ordinary cow?"

The cow gently replied, "I cannot free myself from this mud, but my master can. When the sun sets and he finds me absent at home, he will come looking for me. Once he finds me, he will raise me up and escort me home sweet home."

The tiger fell silent and coldly glared at the cow.

Soon enough, the sunset and the cow's master arrived. He immediately recognized the plight she was in and lifted her to safety. As they walked home, the cow and the master both felt renewed gratitude for one another and pitied the tiger they both would have been happy to save if only the tiger had allowed them.

The cow represents a surrendered heart, the tiger represents an egoistic mind, and the master represents the Guru.  The mud represents the world, and the chase represents the struggle for existence therein. 


*Debrief*


*Its good to be independent and not rely on anyone. But don't take it to an extreme, you always need a partner/coach/mentor who will be always on the lookout for you.* 

*Having them does not mean you are weak, it's just that you can be stronger with their help.* 


_Make sure to share this story with your partner/coach/mentor and express your gratitude_.

Friday, September 6, 2019

आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे

*आपल्याकडे दैविक शक्ती आरुढ झाली आहे हे कसे ओळखावे?* जेव्हा आपण कोणतेही साधना, परायन, जप - तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे? *या साठी हा लेख ….* १) ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत ( ङावी - उजवीकडे न हलता सरळ रेषेत ) वाढत जात असेल तर समजून जावे कि दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे. २) ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे कि दैविक शक्ती तूमच्या जवळपास आहे. ३) दर गूरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात. ४) शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते. ५) ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो ( एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण ) त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे कि देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अद्रुष्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकांच्या फुलांचा, भगवान विष्णु व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो, देवीचे उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो. ६) शिंवलिंगावर पंचामृताने अभिषेक करते वेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे. ७) ज्या स्रीया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावनेने पुजा करतात त्या स्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते अन् ती त्या स्रीला योग्य तो मार्ग दाखवते. ८) जे दत्तगुरुंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे परायण करतात. ते जेव्हा रात्री डाव्याकुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात.यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते. ९) ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरा पर्यत धोती, एका हातात कमंडलू, कपाळावर भस्म, पायात पादुका, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे कि तो देव आहे व तो तूम्हाला दर्शन देत आहे अथवा तूमच्या पुर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तूमचे गुरु असतील असे समजावे. १०) जे दुर्गा सप्तशती चे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्रीया ( पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात - पाय दिसत नाही, कान - नाक - डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अध्रुश्य अवस्थेत ) त्यांच्या गळ्यात मोठे चकाकते मंगळसुत्र, केसात अंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्रीयांचे दर्शन होते.या स्रीया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात. काहींच्या मते यांना देवींचे बया असेही म्हणतात. ११) ज्यांना स्वप्नामध्ये जून्या घरचे देव म्हणजेच मूळदेव दिसतात त्यांनी समजून जावे की तूम्हाला मूळदेव हाक देत आहे. १२) जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्रीला कोणीतरी बाहेरुन तीची ओळखीची सुवासीन स्री तीला अचानक भेटावयास येते व चालता - बोलता अचानक तीच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या स्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे. १३) ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जानवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते.अशा घरात दैवी तत्त्व मोठ्या प्रमाणात रुढ असते. १४) शिर्डी, गाणगापूर, नृसिह वाडी, अक्कलकोट, शेंगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अङचनी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. काहींना याची अनुभूती असेलच. १५) घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा ( हळद ), ज्योतीबाचा भंडारा ( लाल गुलाल ), काळूबाईचा अंगारा, महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हाता - पायाला लावले असता अंगातील ताप ( उष्णता ) शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो.त्यामूळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो.यामधून देवाचे खरे सत्त्व कळते. १६) आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात काही मंदिरात देवाच्या दोन भुवयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो.काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो.हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पहावयास मिळतो. या मध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत. १७) लहान बाळ ज्यावेळी हसत - खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे कि येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलिकडची असते. १८) रस्तावरुन किंवा आडवाटे वरुन चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्हीही हातानी ढापून घेतो व नंतर हळूच डोळे उघङून पाहता तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. १९) जी व्यक्ती संकाटाच्या पेचात सापडली आहे व आज तरी आपले काम होईल का? किंवा अॉफिसमध्ये आज आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे कि नाही? अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळ धारण करुन कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अङचणी शिथील होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते. २०) ज्या घरातली व्यक्ती आजारपणा मूळे हॉस्पिटलमध्ये ऐडमीट असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास ही उतरत नसेल किंवा रात्री त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेऊन गार्हाने घातले असता काहींना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे. देवाचे सत्त्व आजही या कलयुगात आहे.देव हा उघङ्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त " मी आहे तूझ्या आजूबाजूलाच आहे " याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तूम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. *श्री गुरुदेव दत्त.*

ब्राह्मणत्वाचा विनाश का होतो ?

संध्या                  ।।श्रीः।।    
              ।।श्री वेदपुरुषाय नमः।।
         ब्राह्मणत्वाचा विनाश का होतो ?

अनभ्यासेन वेदानाम्
आचारस्य च वर्जनात्।
आलस्याद् अन्नदोषाच्च
मृत्युर्विप्रान् जिघांसति।।

वेदांचा अभ्यास न करण्याने,
सदाचार सोडल्याने,
आळस करण्याने*शुद्ध सात्विक अन्न न खाण्याने किंवा दूषित अन्न खाण्याने ब्राम्हणांचे 
ब्राह्मणत्व नष्ट होते,
-- मनुस्मृति 5/4

*संध्योपासना,* 
*महत्व व आवश्यकता.....*
----------$$$--------------------

संध्या ही दिसायला अगदी क्षुल्लक गोष्ट आहे असे वाटते 
म्हणून संध्या न करण्यात भूषण मानणारी बरीच माणसे आहेत.
संध्या ही क्षुल्लक नसून ती फार महत्वाची क्रिया आहे.
अलिकडे लोकामध्ये श्रद्धा फार वाढत आहे. जीवनात श्रद्धेची 
नितांत आवश्यकता आहे. यादृष्टीने कोणी रोज गुरूचरित्र, नवनाथ,
गीता, शिवलिलामृत इ. वाचतात. कोणी जप करतात. 
कोणी देवपूजा करतात. अथर्वशीर्ष म्हणतात. असे अनेक वर्षे 
करूनही त्याचे फल न मिळण्याचे कारण ते संध्या न करता 
वरील गोष्टी करतात.
 संध्या न करता केलेल्या कोणत्याही कर्माचे 
फल मिळत नाही, असे शास्त्र सांगते. पण संध्या केल्याने खरी 
शुद्धता येते. संध्या न करणारा नित्य अशुचि असतो. 
अशुचि (अशुद्ध) अवस्थेत केलेल्या कर्माचे फल मिळत नाही, 
असे शास्त्र सांगते, म्हणून कोणतेही कर्म करण्यापूर्वी प्रथम संध्या 
करणे आवश्यक आहे.

*संध्याहीनः अशुचिर्नित्य अनर्हः सर्वकर्मसु |*
*यदन्तत् कुरूते कर्म न तस्य फलभाग् भवेत्||*

संध्येला अदृश्य फल नाही. पण सर्वकर्माचे अदृश्य फल मिळवून 
देण्याचे सामर्थ्य संध्येत आहे. संध्या केली नाहीतर प्रत्यवाय येतो. 
*'अकरणे प्रत्यवाय श्रवणात्'*
 नित्य संध्या करावी अशी शास्त्राची
आज्ञा आहे.
*'अहरहः संध्यामुपासीत.'*
संध्या हे कर्म नसून उपासना आहे. उपासना कोणाची? संध्या ही 
सूर्याची उपासना आहे कारण गायत्री मंत्र हा सूर्य देवता विषयक 
आहे. म्हणून संध्योपासना म्हणजे सूर्योपासना आहे. सूर्योपासना 
म्हणजे ब्रह्मोपासना आहे. एवढे संध्येचे महत्व आहे.
संध्या ही उपासना असल्यामुळे इतर कर्माच्या संकल्पाप्रमाणे 
'प्रातःसंध्याख्यंकर्म करिष्ये' असा संकल्प नसून प्रातः संध्यामुपासिष्ये 
किंवा प्रातः संध्योपास्तिंकरिष्ये. असा संध्येचा संकल्प आहे.
हे ध्यानात घेण्याजोगे आहे.
स्रियांनी संध्या करावी का ?
सूर्यापासूनच ही श्रृष्टी निर्माण झाली आहे. आपणही सूर्याचेच 
वंशज आहोत. सूर्यामुळेच आरोग्य लाभते. सूर्योपासनेने म्हणजे 
संध्योपासनेने आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभते. म्हणुन प्रत्येक 
हिंदुमात्राने अवश्यमेव संध्या करावी. स्रियांनीही मासिक पाळीचे 
दिवस सोडून संध्या करावी.
संध्येत पाच ते सहा वेळा तरी प्राणायाम आहे. प्राणायामाने 
आयुष्य वाढते. सर्व मंत्रात गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ व अत्यंत 
प्रभावी असा मंत्र आहे.हे विज्ञानाने आता सिद्ध झाले आहे. 
गायत्री मंत्र म्हणजे तेज आहे. असे उपनिषदांनी म्हटले आहे. 
संध्योपासना म्हणजे तेजस्वी मंत्रांनी तेजाची - सूर्याची - उपासना 
करणे होय.
संध्याही नित्य असल्याने सोयर सूतकांतही करावी मात्र अर्घ्य 
प्रदानापर्यंत करावी. कारण अर्घ्याप्रदान हे संध्येतील प्रधान कर्म 
आहे. गायत्रीजप मात्र सोयर-सूतकात करू नये. अर्घ्य प्रदान 
झाले की पाणी सांडत अंगाभोवती प्रदक्षिणा करून आचमन 
करावे. म्हणजे संध्या संपली. त्याचवेळी अनेन प्रातः संध्या 
वंदनेन भगवान् परमेश्वरः प्रियताम् असे म्हणून हातावरून 
पाणी सोडावे. सोयर सूतकात सर्व मंत्र मनात म्हणावेत 
अर्ध्यांतामानसी संध्यां- असे वचव आहे.
रोज सकाळ संध्याकाळी आळस न करता प्रत्येकाने संध्या करावी.
नित्य संध्या करणाऱ्याचे सर्वतोपरि कल्याण होते अशी ऋषींनी
ग्वाही दिली आहे. हे संध्येचे ऐहिक (दृश्य) फल आहे.
उपनयनात कर्म कुरु असे जे सांगितलेले आहे त्याचा अर्थ संध्या हाच आहे. त्यामुळे ब्राह्मणत्वाचा लोप होवू नये आणी शुचिता प्राप्त होऊन सर्व कर्म सफल होण्यासाठी सर्वांनी नित्य संध्योपासना करावी. आणी आपले सर्वतोपरी कल्याण करुन घ्यावे.

*बुडला औरंग्या पापी| म्लेंछ संहार जाहला |*
*उदंड जाहले पाणी | स्नान संध्या कराया|*

हिंदुपदपातशाही स्थापन झाली तेव्हा समर्थांना आनंद झाला. 
व वरील उद्गार त्यांचे मुखातून सहज बाहेर पडले.

उच्च रक्तदाब Blood pressure High उपाय.

उच्च रक्तदाब Blood pressure High✍
उपाय.
१)सोसेल एवढ्या गरमपाण्यात पाय सोडून रोज बसणे.
२) एकचमचा लिंबाचा रस व एकचमचा मध घेणे.
३)कांद्याचा रस मधा बरोबर घेतल्यास रक्तदाब कमी होतो.
४)रोज एक फोड पपई खाणे
५)टरबूज बी आणि खसखस एकत्र वाटून एक चमचा उपाशीपोटी घेणे
६)रोज दोन्ही वेळ गरमपाणी पिणे
७)गरमपाण्यात लिंबू रस घेतल्यास लगेचच फरक पडतो.
८)लसूण व कांदा यांचा रोजच्या जेवणात वापर वाढवणे.
९)शवासन करणे फरक पडतोच.
आयुर्वेदिक औषध.
१)रोज अर्जुनारिष्ट दोन चमचे तीन वेळा.
२)आरोग्य वर्धीनी एक एक गोळी तीन वेळा गरमपाण्यात.
३)सर्पीना एक एक गोळी तीन वेळा उच्च रक्तदाब असेलतर.
वैद्य. गजानन
७७१५९९४०६०

लागोपाठ ७ दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा

*लागोपाठ ७ दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा : मग बघा काय होईल कमाल*

*वैद्य डॉक्टर रीटा कार्डोज़*
*बोरीवली* 
*मुम्बई*

थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळात गर्मी जास्त असते. गुळ खाल्ल्याने शरीरात गर्मी वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्वांमुळे शरीरातील ऍसिड नाश पावते. रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गुळ खाल्ला तर असा कमाल होईल कि तुम्ही याचा कधी विचारही नसेल केला.

तुमच्या शरीरासाठी गुळ म्हणजे एका अमृता समान आहे. तुम्हाला सांगतो गुळ खूप साऱ्या रोगांवर उपयोगी पडतो… चला तर मग बघूया गुळाचे कमालीचे फायदे.

*वैद्य डॉक्टर रीटा कार्डोज़*
*बोरीवली* 
*मुम्बई*

रोज गुळ खाल्ल्याने होणारे फायदे
♥ रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.
♥ गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.
♥ रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
♥ सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.
♥ गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.
♥ गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.
♥ गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.

*वैद्य डॉक्टर रीटा कार्डोज़*
*बोरीवली* 
*मुम्बई*

*गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे.*

▪ गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.

▪ रोज दुध प्यायल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

▪ शरीरातलं अशुद्ध रक्त साफ होतं..
गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

▪ लठ्ठपणा नियंत्रणात..
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

▪ पोटाचे विकार होतात दूर..
गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.

▪ सांधेदुखी वर उपाय..
गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

▪ त्वचा होते मुलायम..
गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

▪ मासिक पाळीचा त्रास होतो कमी..
मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो.

▪ थकवा होतो कमी..
कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.

      *🥛करा मग सुरूवात...*
              *आज पासूनच...*

कृपया हा मैसेज सर्वाना फॉरवर्ड करने ,

➖➖➖➖➖
*वैद्य डॉक्टर रीटा कार्डोज़*
*बोरीवली* 
*मुम्बई*
➖➖➖➖➖➖
CP....

परमात्माचे स्थान गिरनारला जाण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी

परमात्माचे स्थान गिरनारला जाण्यासाठी काही महत्त्वाच्या 
गोष्टी

१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.

२) चालण्यासाठी चांगली चप्पल घ्यावी (sports sandal  उत्तम )आणि त्यावर 10-15 दिवस चालण्याची practice  करावी.

३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.

४) साधारण रात्री 11 वाजता  चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते . अंदाजे ५ तास लागतत.

५) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी . 

६) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण 6000 पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो . 

७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३०रुपये रेंट त्यातील २० रुपये परत मिळतात ).

८) पाण्याची बाटली घ्यावी , रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले 3000 पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते .

९) खिशामध्ये खडीसाखर , गोड गोळ्या (eclair ) घ्यावेत.

१०) कमरेला pouch असेल तर उत्तम.

११) start तो end कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे. 

१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो .

१३) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो 6/8 ग्रुपमध्ये जावे ). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे .

१४) pocket torch बरोबर घ्यावी , 2 extra सेल बरोबर असावे . वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे .

१५) आपल्यापेक्षा बरेच physically unfit, वयस्कर  लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा . वेगळी अंतशक्ती मिळते .

१६) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने Stamina  वाढतो . बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी , थोडे फ्रेश वाटते .

१७)उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते .

१८) जमले तर उतरल्यावर पायाला  मालिश करून घ्यावी त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली।त्यावर 2,3 मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो।

१९) त्रिपुरी पोर्णिमा (साधारण 4 नोव्हेंबर ) च्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता खोलते,  तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे.

दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा .

20) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा . लोकं काय म्हणतील / बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते . अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात . डोलीचा खर्च आपले आपण करायचा आहे .

21) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही , पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार , फुले मिळत नाही . कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता सॅक मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्या . 

शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप energy देतो , कारण तुम्हाला परत साधारण 2000 पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे . विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये . जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा . 

या वर्षीची 15 नोव्हे ते 22 नोव्हें या काळात आहेत।
38 km ची ही पायी परिक्रमा असते।ही परिक्रमा फक्त पायी करता येते।डोली,वाहन या द्वारे करता येत नाही।
    

                               श्रीपाद श्रीवल्लभ  
                                 जय गिरनारी

नाम म्हणजे जादूचा दिवाच .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ५ सप्टेंबर  🌸*

*नाम  म्हणजे  जादूचा  दिवाच .*

एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर, अंथरूणातच 'आई, मला घे,' म्हणून रडू लागले. 
आई म्हणाली, 'बाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये'. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना, आणि 'आई, आई' म्हणून रडू लागला. 
तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले, आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. 
आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याची नि आपली भेट कशी होणार ? 

परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे, त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे; परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. 

संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल.

 आपण पुराणात वाचलेच असेल की, श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना, श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की, 'ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत'. हे ऐकून, दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की, एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग ?

कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे. तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. 

मी त्रिवार सत्य सांगतो की, नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. 

तीन गोष्टी अत्यंत जपा : परस्त्री मातेसमान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका; तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल.

*२४९ .  मुखात  नाम  ठेवावे  आणि  सदाचरणाने  वागून  प्रपंच  करावा .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

राम कर्ता ' या भावनेने समाधान मिळते

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ०६ सप्टेंबर  🌸*

*' राम  कर्ता '  या  भावनेने  समाधान  मिळते.*

पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील, तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील. 

पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. 

प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक, खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही. ते 'राम कर्ता' ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. 

समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. 

खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. 

पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरूवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. 

भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे, तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल, तर राम तुमचे कल्याण करील. 

नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात, अशी सर्वांचीच तक्रार आहे, परंतु असे पाहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की, 'तुला रस्त्यात कोण कोण भेटले ?' तर तो म्हणतो, 'माझे लक्षच नव्हते.' त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. 

'मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,' असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात.

एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणेहीच तपश्चर्या,

 ब्रम्हानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली. _/\_ ते एवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला, आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा, मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे.

*२५०.  नामात  राहा  आणि  रामकर्ता  ही  भावना  दृढ  करा.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*