Thursday, May 23, 2019

श्रीगणपती नामाष्टक स्तोत्रम्

श्रीगणपती नामाष्टक स्तोत्रम्
विष्णुरुवाच 

गणेशमेकदन्तं च हेरम्बं विघ्ननायकम् I 
लम्बोदरं शूर्पकर्णं गजवक्त्रं गुहाग्रजम् I  
नामाष्टार्थ च पुत्रस्य श्रुणु मातर्हरप्रिये I 
स्तोत्राणां सारभूतं च सर्वविघ्नहरं परम् II १ II 

ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचकः I 
तयोरीशं परं ब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम् I 
एकशब्दः प्रधानार्थो दन्तश्च बलवाचकः I 
बलं प्रधानं सर्वस्मादेकदन्तं नमाम्यहम् II २ II 

दिनार्थवाचको हेश्च रम्बः पालकवाचकः I 
परिपालकं दिनानां हेरम्बं प्रणमाम्यहम् I 
विपत्तिवाचको विघ्नो नायकः खण्डनार्थकः I 
विपत्खण्डनकारकं नमामि विघ्ननायकम् II ३ II 

विष्णुदत्तैश्च नैवेद्यैर्यस्य लम्बोदरं पुरा I 
पित्रा दतैश्च विविधैर्वन्दे लम्बोदरं च तम् I 
शूर्पाकारौ च यत्कर्णौ विघ्नवारणकारणौ I 
सम्पद्दौ ज्ञानरुपौ च शूर्पकर्णं नमाम्यहम् II ४ II 

विष्णुप्रसादपुष्पं च यन्मूर्ध्नि मुनिदत्तकम् I 
तद् गजेन्द्रवक्त्रयुतं गजवक्त्रं नमाम्यहम् I 
गुहस्याग्रे च जातोSयमाविर्भूतो हरालये I 
वन्दे गुहाग्रजं देवं सर्वदेवाग्रपूजितम् II ५ II 

एतन्नामाष्टकं दुर्गे नामभिः संयुतं परम् I 
पुत्रस्य पश्य वेदे च तदा कोपं तथा कुरु I 
एतन्नामाष्टकं स्तोत्रं नानार्थसंयुतं शुभम् I 
त्रिसंध्यं यः पठेन्नित्यं स सुखी सर्वतो जयी II ६ II 

ततो विघ्नाः पलायन्ते वैनतेयाद् यथोरगाः I 
गणेश्वरप्रसादेन महाज्ञानी भवेद् ध्रुवम् I 
पुत्रार्थी लभते पुत्रं भार्यार्थी विपुलां स्त्रियम् I 
महाजडः कवीन्द्रश्च विद्दावांश्च भवेद् ध्रुवम् II ७ II 

II इति श्रीब्रह्मवैवर्ते गणपतीखण्डे श्रीविष्णुर्प्रोक्तं गणपति नामाष्टकं संपूर्णं II 

श्रीगणपती नामाष्टक स्तोत्रम्
मराठी अर्थ 

भगवान श्रीविष्णू हे गणपती नामाष्टक स्तोत्र पार्वतीला सांगत आहेत. माते ! तुझ्या मुलाची गणेश, एकदंत, हेरंब, विघ्ननायक, लंबोदर, शूर्पकर्ण, गजवक्त्र आणि गुहाग्रज अशी आठ नांवे आहेत. या आठही नांवांचा अर्थ ऐक. हे शिवप्रिये ! हे उत्तम, पवित्र स्तोत्र सर्व स्तोत्रांचे सारभूत आणि सर्व विघ्नांचे निवारण करणारे आहे. 'ग' ज्ञानार्थवाचक आणि 'ण' निर्वाणवाचक आहे. या दोन्ही (ग + ण) चे जे ईश्वर आहेत, त्या परब्रह्म गणेशाला मी नमस्कार करतो. 'एक' शब्द प्रधानार्थक आहे आणि 'दन्त' बलवाचक आहे. ज्यांचे बल सर्वांहून अधिक आहे, त्या 'एकदन्ताला' मी नमस्कार करतो. 'हे' दीनार्थवाचक आणि 'रम्ब' पालक (पालनकर्ता) याचे वाचक आहे. म्हणून दीनांचे पालक 'हेरम्ब' यांच्या समोर मी नत मस्तक होतो. "विघ्न" विपत्तिवाचक आणि "नायक" खण्डनार्थक आहे. अशा प्रकारे जे विघ्नांचे विनाशक आहेत, त्या "विघ्ननायकाला" मी अभिवादन करतो. पूर्वींच्या काळी विष्णूने दिलेला नैवेद्य आणि पित्याकडून दिलेले नाना प्रकारचे मिष्टांन खाल्यामुळे ज्याचे पोट मोठे झाले आहे अशा "लंबोदराला" मी वंदन करतो. ज्यांचे कर्ण भक्तांची विघ्न निवारण्यासाठी, त्यांना संपदा आणि ज्ञान देण्यासाठी सुपासारखे आहेत, त्या "शूर्पकर्णापुढे " मी नतमस्तक होतो. ज्यांच्या डोक्यावर मुनींनी दिलेले विष्णूंचे प्रसादरूपी पुष्प आहे आणि जो गजेन्द्राच्या मुखाने युक्त आहे, त्या "गजवक्त्राला" मी नमस्कार करतो. जो "गुह" म्हणजे स्कन्द यांच्या आधी जन्म घेऊन शिवाच्या घरी अवतीर्ण झाले आणि सर्व देवांच्या आधी अग्रपूजेचा मान असणार्या "गुहाग्रजाला" मी वंदन करतो. दुर्गे ! आपल्या पुत्राच्या उत्तम नामाष्टक स्तोत्राचे वेदांतील महत्व आधी जाणून घे आणि मग क्रोध आवर किंवा योग्य निर्णय घे. हे स्तोत्र जे नाना अर्थांनी भरलेले आहे आणि शुभकारक आहे, त्याचा पाठ जोकोणी रोज त्रिकाळ करतो, तो सुखी आणि सर्वत्र विजयी होतो. गरुडापासून साप जसे लांब पळतात तशीच संकटे त्याच्यापासून लांब पळतात. गणेश्वराच्या कृपेने तो निश्चितच महान ज्ञानी होतो. पुत्राची इच्छा करणारास पुत्र आणि पत्नीची इच्छा करणारास उत्तम सुशील स्त्री लाभते. तसेच महामूर्ख असला तरी निश्चितच तो विद्वान आणि श्रेष्ठ कवी होतो. अशा रीतीने श्रीविष्णूंनी पार्वतीला सांगितलेले हे ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गणपतीखंडांतील गणपती नामाष्टक पूर्ण झाले.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"