Friday, May 24, 2019

जोतिष विद्या हि एक शापित विद्या आहे

जोतिष विद्या हि एक शापित विद्या आहे. शापित अशा कारणांसाठी.

१) दुसऱ्याचा हात अथवा पत्रिका पाहताना प्रश्नकर्त्याच्या पीडा/त्रास जोतिषाच्या अंगावर येतात.वाईट ग्रह जोतिषाच्याच मागे लागू शकतात.

२) याचा अभ्यास करणाऱ्याच्या घरात अनेक कटकटी/ त्रास निर्माण होऊ शकतात.

३) या विद्येतून मिळणारा पैसा ज्योतिषाला मनस्वास्थ्य लाभू देत नाही.

४) अमुक एक व्यक्ती पहिले जोतिष पाहायचे पण आता पाहत नाहीत. त्याला कारण वरच्या सर्व गोष्टी आहेत.

५) भविष्य कथन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याची काहींना काहीतरी किंमत चुकवावीच लागते.

जोतिष सांगणाऱ्या व्यक्तीची साधना तेवढी नसेल तर त्याला त्रास हा भोगावाच लागतो. ज्यांना इंट्युशन पॉवर नाही अशा लोकांनी तर याचा अभ्यास देखील करू नये. हजारात २/३ व्यक्तींना उच्च दर्जाची इंट्युशन पॉवर लाभलेली असते.

" अंदाज वर्तवण्याचे शास्त्र यापेक्षा जास्त जोतिषशास्त्राची प्रतिष्ठा नाही मात्र अंतर्ज्ञान शक्तीने सांगितलेले फलादेश याला अपवाद आहेत. "

कृपया जोतिषांच्या मागे लागू नका. जोतिषी प्रारब्ध बदलू शकत नाही. प्रत्यक्ष भगवंताने सुद्धा तो अधिकार फक्त सदगुरुंना दिलेला आहे. सद्गुरू सेवा करा, साधना करा आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करा. 
गुरुत्वाची गादी काटेरी आसन आहे.
आपणहून त्या गादीवर बसून आपल्या मनाने कोणालाही कसलीही उपासना करायला सांगणे म्हणजे त्याचे प्रारब्ध ओढवून घेणे आहे.आपली उपासना आधी प्रखर होऊन सद्गुरू प्राप्त होतात आणि त्यानी अनुग्रह देऊन आज्ञा केली तर दुस-याला उपासना देण्याचा अधिकार प्राप्त होतो.
उठसूठ कोणालाही काहीही साधना करायला सांगणे हे स्वतःवर संकटे ओढवून घेणे आहे. आम्हा सर्वांना सद्गुरू आवर्जून सांगायचे, "गुरू,महाराज बनून आपल्या पायावर कोणाचे डोके ठेवून घेऊ नका.महाराज बनण्याच्या भानगडीत पडू नका  लोकांची खडतर प्रारब्धे घ्यावी लागतील." पण गुरूवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी
पण अनुग्रह मिळाला म्हणून आपल्या मनाने लोकांकडून पैसे घेऊन यज्ञयाग करायचे याची फार अशुभ फळे भोगावी लागतात कारण त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते. अनुग्रहित शिष्याची जबाबदारी गुरूंवर असते पण त्यांच्याशी संपर्क न ठेवता आपणच महाराज म्हणून मिरवणे फार महागात पडते.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"