Saturday, April 27, 2019

shankarbaba_maharaj

अवलिया तू बालोन्मत्त
शिव स्वरूप तू साक्षात दत्त
प्रगटले गुरु आम्हा भक्तांसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [१]

अमृत वाणी प्रगटे बोबड्या बोलातुनी
अभय प्रत्येकास त्यांच्या दर्शनातूनि
गुडघ्याच्या पाशी घुड्गा घेऊन बससी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजासी [२]

पाहुनी बाबांना शांत मन होते
किल्मिषांचे जाले अंतरीचे सुटते
भक्तीच्या प्रेमाला तू आतुरसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [३]

कधी घडे चमत्कार तुझ्या अगाध लीलांचे
करी मोकळे आकाश आपल्याच भक्तांचे
मिळे अक्षय आधार तुझ्या चरणासी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [४]

हाती मद्य कधी सिगारेट पाहणारा कुजबुजतो
बाह्य रुपास तुझ्या न जाणून सत्याला ओळखतो
मळवट अज्ञानाचे तुझ्या कृपेने तू दूर करिसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [५ ]

मढी क्षेत्री नऊ नाथांचे रम्य स्थान अदभूत
घडविले दर्शन आप्पा धानेश्वराना पवित्र गुहेत
येथेच तू गुरु शिष्य नाते उकलीलेसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [६ ]

पडदा ओढून गंधर्वांच्या नाटकाचे तूच रक्षिले
आवाज बसता त्यांचा विद्यातुनी अमृत दिले
दिले साक्षात दर्शन पंढरीचे ,बालगंधर्व गहिवरती
नमस्कार माझा सदगुरु शंकर महाराजांसी [७ ]

त्रिभुवनी गुरु राया तुझा संचार अनंतात
हाक मारता भाकानी साक्ष तुझी साक्षित्वात
प्रगटूनि तूच साक्षात रूप तुझे दाखविसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ ८ ]

धरुनी हात स्वामींचा विश्व संचार केला
स्वामी सांप्रदायाचा मेरु गगनावरी आरुढला
देती वचंन भक्तासी करा भक्ती स्वामींची पावेल मजसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [९ ]

वास्तव्य बाबांचे मधी ,नाशिक नगर पुण्यात
खेळ खेळती भक्तान सवे बाबा वेग वेगळ्या रुपात
दाखवुनी खून बोध करुनी भक्तांसी उद्धारीसी
नमस्कार माझा सदगुरु शंकर महाराजांसी [१० ]

शिष्य जवळचे महाराज तुमच्या अंत रंगीचे
लख लखणारे हिरे जणू कि अध्यात्म शिखरावरचे
प्रगटे साक्ष शिष्यात तुमचीच आम्हा दिससी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [११ ]

साक्ष जिवंत चिन्मय ,संजीवन गुरूंच्या समाधीत
निघे पालखी गुरूंची वद्य अष्टमीला गुरु मंदिरात
भक्त जन पालखी सोहळ्यात स्वःतला विसरून जासी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ १ २ ]

अलख पुकारा तुमच्या नजरेने मिळतो
नाद सोहम नाथानाचा अस्तित्वाने प्रगटतो
गुरु भक्तीचे नाते तूच भक्तांना समजाविसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ १ ३ ]

गूढ ज्ञानाचे भांडार भक्तांसी दाविले
अज्ञानी भक्तास भक्तीतून तारिले
वलयात धुराच्या आत्मानंदात तू डोलसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ १ ४ ]

घेई कसोटी तू कधी भक्तांची
होई परीक्षा खडतर भक्तीची
सहाय्य होता तुझे तूच साकारून घेसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ १ ५ ]

नेले भस्मे काकांसी दर्शनास थेट गिरनारी
ठेविले चरण आपले काकांच्या माथ्यावरी
कृपांकित करुनी मार्फत त्यांच्या शंकर गीता प्रगटलि
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [ १ ६ ]

तूची दत्त शंभू तूची आदि माया तुळजा भवानी
साक्ष अस्तित्वाची गुरु राया तुझ्या निष्काम भाक्तीतुनी
क्षणा क्षणांची सावली मायेची गुरु त्राता तुमची आम्हा रक्षिसी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी [१ ७ ]

एकची मागणे बाबा मागतो उद्धारा या जीवाला
नाम मुरु देत देहात तुझे जाणू देत गुरु तत्वाला
विसर न पडो या देहाला गुरु चरणांचा , मोक्ष मिळू देत तुझे चरणापाशी
नमस्कार माझा सदगुरू शंकर महाराजांसी

Instagram Follow :

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"