Wednesday, April 24, 2019

" *श्रीक्षेत्र नृसिंहवाडी व कृष्णा नदी महात्मय"*

" *श्रीक्षेत्र नृसिंहवाडी व कृष्णा नदी महात्मय"*                             
 श्री कृष्णा नदी ही साक्षात विष्णुस्वरूप वेणी ही शिवस्वरूप असून या दोन्ही नद्या एक रूपाने अभिन्नपणे वाहतात.  म्हणूनच कृष्णा नदीला केवळ कृष्णा हे नाव नसून तिला "कृष्णा वेणी"  असे संबोधतात .  या दोन नद्या व शिवा ,भद्रा ,भोगावती, कुंभी, व सरस्वती मिळून "पंचगंगा " असे सात नद्यांचे मिलन या क्षेत्री झाले आहे .आसमंतात" श्रीदत्तगुरूंचा संचार झालेली त्यांच्या र:जकाणानी  ही भूमी अत्यंत पवित्र  झालेली आहे. श्री दत्त महाराजांचे हे अत्यंत आवडते स्थान आहे .पवित्र अशा या कृष्णा तटावर देवर्षी ,राजश्री, महान तपस्वी, साधू आणि धर्मनिष्ठ लोक मोठ्या आनंदाने व सुखाने राहतात .त्यांनी आपले पुण्यश्रम  ही या तिरावर कायम राहण्यासाठी थाटले आहेत. त्यामुळे "श्री नृसिंहवाडी क्षेत्र"  हे भूवैकुंठ म्हणून गणले गेले आहे. या कृष्णा तीरावर शुक्लतीर्थ पापविनाशी, काम्य, सिद्ध ,अमर, कोटी, शक्ती ,व प्रयागतीर्थ ,अशी अष्टतीर्थ असून ती पवित्र व रमणीय आहेत .ही तीर्थे सर्व महापातके कायिक, वाचिक ,व मानसिक पापांचे निर्दालन करणारी आहेत .केवळ दर्शन मात्रे सर्व पातकांचा नाश होतो तर प्रत्यक्ष स्नान व तीर्थ जलपान घडले असता .सर्व पातकांचा नाश होईल याबाबत काय संशय !  त्यामुळे या क्षेत्रात अपूर्व असे पवित्र प्राप्त झाले आहे या क्षेत्रात वास घडावा  असे  मोठमोठे ज्ञानी, भक्तजन,  इच्छा करतात येथे मिळणारा आनंद परमेश्वराच्या तादात्म्य मिळणाऱ्या आनंदापेक्षाही अधिक वाटतो या तीर्थराज्यांच्या  दर्शनाने तात्काळ सर्व जीवांची पातके नष्ट होतात .शिवाय अध्यात्मिक आधिदैविक, व आधिभौतिक त्रिताप ही जळून नष्ट होतात. चित्तवृत्ती शांत होते राजाधिराज "श्री दत्त महाराजांची"  चिरकाळ वास करण्याची ही पुण्यभूमी आहे .राजधानी आहे . राजा ज्या प्रमाणे   आपल्या राजधानीत सिंहासनावर बसून प्रजाजनांची गाऱहाणी ऐकतो व दुःखे दूर करतो तत्वता श्रीदत्तमहाराज या राजधानीत सिंहासनावर विराजमान हून भूत प्रेत, पिशाच, यादी सर्व पीडा सांसारिक यातना दूर करतात .व आपल्या भक्तजनांना सुखमय करतात. म्हणून हे स्थान श्रीदत्तांचे जागृत स्थान म्हणून घडले आहेत अशा या परमपावन रमणीय सप्त नद्यांच्या संगमाने पवित्र झालेल्या संगम स्थानावर श्रीदत्त प्रभूंच्या द्वितीय अवतार भगवान "नरसिंह सरस्वती " महाराजांनी बारा वर्षे वास्तव्य करून आपल्या तपस्येने ही  भूमी पवित्र केली व भक्त लोकांच्या मनोकामना पूर्ण होण्याकरिता आपल्या" मनोहर पादुका " या ठिकाणी स्थापन केल्या . की ज्यांच्या दर्शनाने आजही सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात "श्रीक्षेत्र नृसिंहवाडी " येथे गेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीपासून   "कृष्णा वेणीचा उत्सव" माघ महिन्यात होत असतो दहा दिवस चालणाऱ या उत्सवात पुराण या विषयाकरिता कृष्णा महात्मा सांगत असत .                         ॥श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"