🌹📚🌹🔆🌅🔆🌹📚🌹
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*अक्षय साहित्याची*
*आज जागतिक पुस्तक दिन*
🌷📚🌷📚📕📚🌷📚🌷
*मानव प्रगतीपासून दूर जेव्हा उत्क्रांती अवस्थेत होता तेव्हा त्याच्या जगण्याला वळणच नाहीतर अर्थ दिला तो ग्रंथानी.त्यातूनच मग धर्मग्रंथही आले.योग्य वागण्याची दिशा मिळाली.*
*लोकमान्यांनी ग्रंथाला गुरु संबोधले तर भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगतीसाठी वाचण्याचा संदेश दिला.*
*वेद..उपनिषदे..पुराणे..गीता..बायबल..कुराण एवढेच काय पण या देशातील सर्व संताचे साहित्य याचा मोठा प्रभाव कायम प्रेरणादायी आहे.या भूमीला व्यासमुनी..वाल्मिकींसारखे जगविख्यात लेखक लाभलेत.*
*हीच परंपरा संत ज्ञानदेवांनी १६ व्या वर्षी तत्त्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी तर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून कायम ठेवलीय.*
*गावातील ग्रंथालय हे सांस्कृतिक वैभव आणि वाचक म्हणजे सुज्ञ अशी कायम ओळख आहे.समाजात शांतता निर्माण करुन "जगा आणि जगू द्या".."वाचाल तर वाचाल" हा मंत्र पुस्तकांनी दिला.*
*आज तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्याचे मूळ ज्ञान.. विज्ञान दडलेय ते या पुस्तकातच.माणूस..समाज घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करणारी ही पुस्तकेच.उत्सुकतेने पुस्तक बघणे..चाळणे..वाचणे हा अवर्णनीय आनंद.*
*वाचन संस्कृती टिकविण्यासाठी झटणारे लेखक..प्रकाशक..वितरक,कधीही क्षय न होणारे अक्षर धन जपणारे ग्रंथपाल बंधूभगिनीं आणि सर्व वाचनप्रेमींचे या पुस्तकदिनी अभिनंदन आणि शुभेच्छा..*
🌸📚🌸📚🌺📚🌸📚🌸
*_पुस्तकातील खूण कराया_*
*_दिले एकदा पीस पांढरे;_*
*_पिसाहुनि सुकुमार काहिसे_*
*_देता घेता त्यात थरारे._*
*_मेजावरचे वजन छानसे_*
*_म्हणून दिला नाजूक शिंपला;_*
*_देता घेता उमटे काही_*
*_मिना तयाचा त्यावर जडला_*
*_असेच काही द्यावे घ्यावे_*
*_दिला एकदा ताजा मरवा_*
*_देता घेता त्यात मिसळला_*
*_गंध मनातिल त्याहून हिरवा._*
🌷🌿🌸🍃🌺🍃🌸🌿🌷
*गीत : इंदिरा संत* ✍
*संगीत : गिरीश जोशी*
*स्वर : पद्मजा फेणाणी-जोगळेकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
🌻☘📚🌻🌸🌻📚☘🌻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"