Friday, April 12, 2019

परमेश्वर तत्व

✨नक्की वाचा.✨
दूधाला दुःख दिले की
*दही* बनते.
दह्याला दुखावले की
*ताक* बनते.
ताकाला त्रास दिला तर
*लोणी* बनते.
आणि लोण्याला लोळवले तर
*तूप* बनते.

दुधापेक्षा दही महाग.
दह्यापेक्षा ताक महाग.
ताकापेक्षा लोणी महाग.
लोण्यापेक्षा तूप महाग.
परंतु...
या सर्वांचा रंग एकच,
*शुभ्र*.
याचाच अर्थ...
पुन्हा पुन्हा संकटे आणि 
*दुःख झेलुनही जो माणुस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते*.
दूध उपयोगी आहे पण एक दिवसात *नासते*.
दूधाचे विरजण दही दोन दिवस *टिकेल*. 
दह्याचे घुसळलेले ताक *तीन दिवस टिकेल*. 
ताका मधले लोणी *आठवडाभर राहील*. 
पण....
लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही *खराब होत नाही*.
आता बघा आहे की नाही गंमत,एका दिवसातच नासण्याऱ्या दूधात कधीही न नासणारे तूप लपले आहे...!
तसेच आपले मन अथांग आहे.
त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा...!
चिंतन करा,मनन करा आणि आपले जीवन तावुन सुलाखून त्यातुनच बाहेर पडलेले तुम्ही..!
म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्त्व!!!
✨✨✨✨✨✨✨
🌹🌹 *श्री स्वामी समर्थ*   🌹🌹

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"