*पाऊले चालती मार्कंड्याची वाट *शिवभक्ती दाटूनी आली काठोकाठ ।।* 🌼☘🌼☘🌼☘🌼☘
मंडळी सप्रेम नमस्कार 🙏🏻
*हर हर महादेव 🙏🏻* दर वर्षी प्रमाणे या वर्षी *दि 28 फरवरी ते 4 मार्च* पर्यन्त 5 दिवसीय पद दिंडी ठरली आहे । 28 फरवरी ला वेळ सकाळी साडे 9 वाजता श्री महाकाली मंदिर चंद्रपूर ते मार्कण्डा पद दिंडी निघणार आहे । सर्व भक्त गणांनी यात उत्साहाने आनंदाने सहभागी व्हावे ।🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹 मंडळी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे भूषण असलेले चिरंजीव , जागृत क्षेत्र श्री मार्कंडा , 🌸 उत्तरवाहिनी वैनगंगा नदी असलेले मार्कंडा 🌸 मनमोहक शिल्पकलेने नटलेले मार्कंडा 🌸 मार्कन्डेय ऋषींचे तपस्थल मार्कंडा 🌸 असे हे अद्भूत शिवमंदिर मार्कंडा बघायला आपण वाहनांनी भेट देतोच पण पद वारी ने महादेवा ला भेटण्याचा आनंद काही निराळाच । पंढरपूरच्या विठू माऊली ला पद वारीने जाण्यात जो आनंद आहे , तोच आनंद आपल्याला या पद वारीतून देवांचे देव महादेव मार्कनडेश्वराच्या दर्शनात मिळावा , यासाठी हा इवलासा प्रयत्न..... चला मार्कंडा🙏🏻🌷🙏🏻 चला मार्कंडा । 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷टीप --- 1) दि 28 फरवरी , पदवारी तील पहीला मुक्काम रात्री लोहारा गोरक्षण . 2 ) दि 1 मार्च दुसरा मुक्काम महादवाडी जि प शाळा .3) दि 2 मार्च मुक्काम मुल येथील शामा प्रसाद सभागृह . 4 ) दि 3 मार्च हरणघाट हनुमान मंदिर . 5 ) दि 4 मार्च पहाटे 5 वाजता मार्कन्डा महादेव मंदिर साठी प्रस्थान । दुपारी 12 ते 3 महादेव दर्शन त्यानंतर आपापल्या घरी चंद्रपूर जिल्ह्यातील पदवारी तील सहभागी भाविक परतीच्या प्रवासाला लागणार । 28 फरवरी ला श्री महाकाली मंदिरात येताना आपली 5 दिवसाचे लागणारे सामान घ्यावे । त्यात आपल्या 2 चादर , आपले कपडे , बीपी, शुगर असेल तर आपली औषधी , उन्हापासून सुरक्षा साहित्य घ्यावे , छोटी पाणी बॉटल , सोबत असावी । 5 दिवसांत राहणे व्यवस्था , चहा ,नास्ता व्यवस्था , भाविक वारकऱ्यांच्या साठी सेवेत उपलब्ध राहील । या दैवी कार्यात कुणी पायी सेवा देण्यास असमर्थ असतील तर त्या भक्तांनी , पदवारी तील भाविकांची जी जमेल ती सेवा करावी .त्यासाठी संपर्क नंबर खाली दिलेला आहे .. रोज 15 ते 20 km पायी चालल्यावर भोजन झाल्या नंतर मुक्काम ठिकाणी रात्री 1 तास प्रवचन ,कीर्तन , प्रबोधन, भजन कार्यक्रम असेल । त्यात आध्यत्मिक , संत कथा चरित्रा सोबत देशभक्ती , सामाजिक , पर्यावरण जागृती , स्वछता संदेश असेल । चला तर मंडळी पदवारीला ... आपले दैवत श्री महाकाली व श्री मार्कंडा याची महती आपण नाही तर कुणी उजागर करायची ? बरोबर ना ... आपल्या साऱ्या भारत देशात आपल्या या प्राचीन देवस्थानाची माहिती पोचावी हा या वारिचा प्रामाणिक उद्देश्य ... 2016 ला शिवरात्री च्या पावन पर्वावर , आपली माती आपल्या माणसासाठी हा इवलासा प्रयत्न आम्ही आरंभ केलाय तुम्ही ही यात सहभागी व्हा ..जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरूनिया ...शेवटीं चालवून घेणारा आहे , फक्त दृढ संकल्प , आणि इच्छाशक्ती हवी तर मार्ग सुकर होतोच । मंडळी हा आनंद अवर्णनीय च ... एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ । या उक्ती नुसार या शुभ कार्याचा शुभारंभ करूया 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃चला तर भेटुया 28 फरवरी सकाळी 9 वाजता श्री महाकाली मंदिर चंद्रपूर येथे ... महाशिवरात्री च्या पदवारीत सहभागी होण्यासाठी आपले सहर्ष स्वागत 🙏🏻🙏🏻🙏🏻 *हर हर महादेव* 🌼☘🌼 9422136864 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"