॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -२७
पंचदेव पहाड प्रांतात विरुपाक्षाची भेट
श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलिकडील तिरावर पोहोचलो, ती मध्यान्हीची वेळ होती. त्या दिवशी गुरुवार होता. गुरुवारी श्रीपाद प्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारीत. असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्ह वेला होती. पंचदेव पहाड या स्थळी एक गवताची कुटी बांधावी असा श्रीपाद प्रभूंचा आग्रह होता. ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुध्दा ते म्हणाले होते. परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता. कुटी बांधण्यास सोयिस्कर जागा हवी होती. बांधकामाचे साहित्य गवत, काठ्या दोऱ्या, पाने इत्यादि काहीच वस्तु आमच्या कडे नव्हत्या. कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुध्दा तेथे नव्हते.
पंचदेव पहाड स्थानाचे महत्व
कोठे जावे याचा निश्चित विचार मनात नव्हता. या परिसरात आम्ही वाटसरु प्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो. फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो. तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता. शेतात एका स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरिता घालून ठेवली होती. त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले. आणि आम्हास भोजन दिले. आम्ही भुकेजलेलेच होतो. शूद्राच्या घरचे भोजन करावे का नाही ही शंका आमच्या मनांत क्षणभर डोकावून गेली. तेंव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला, आमची जनावरे चोरुन नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे भोजन घ्यावे का नाही अशी विचित्र शंका आली का ? त्या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो. परंतु भुकेमुळे आम्ही तेथील भोजन केले. त्या शेताच्या मालकाचे नांव विरुपाक्ष असे होते. भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका-एका झाडास बांधण्यात आले. मी एक गरीब ब्राह्मण आहे. माधुकरी मागून आपला उदर निर्वाह करतो असे अत्यंत दीनवाणीने त्यांना सांगितले. माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुध्दा पुन्हा सांगितले. या नंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असेल अशा विचाराने त्यांच्या कडे गेले आणि त्यांच्याकडील असलेले सारे धन हिसकाऊन ध्यावे अशा विचारात होते.
मश्रीपाद प्रभूंची कल्पनातीत दिव्य लीला
आमची सत्यस्थिती परोपरीने समजाऊन सांगितली, तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो. काय करावे ते सुचत नव्हते. त्याच वेळी एक यात्रेकरूंचा घोळका (तांडा) तेथे आला. या यात्रेकरूंमध्ये ''शिवकावडी'' नावाचा एक भक्त समुदायात होता. हे यात्रेकरू वासविकन्यका परमेश्वरीसाठी कावडी नेत असतात. हे भक्तगण त्रिपुंडगंध लावतात. घंटानाद करीत, श्री कन्यका परमेश्वरीची स्तुतीभरित गीते गात आपले मार्गक्रमण करतात. गंगेच्या पवित्र जलाची कावड शुभ कार्यासाठी किंवा वासवि मातेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात. या यात्रेकरूमध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात. त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो. या पट्टयामध्ये तलवार, कवच, आणि विविध प्रकारची युध्दाची शस्त्रे असतात. या लोकांच्या समुदायास ''वीरमुष्टि'' असे नांव आहे. हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात.
त्या शेतकऱ्याने आलेल्या यात्रेकरूंना आणि वीरमुष्टि लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आम्हास बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला. आम्ही कामास लागलो. सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षाने आम्हास प्रश्न केला,''मुष्ठीतील मुष्ठी वीरमुष्ठी याचा अर्थ काय ?'' आम्हास तो अर्थ माहित नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले. त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुध्दा त्याने आम्हास दिले. गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या रात्री तेथेच झोपावे असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्या बरोबर हसत खेळत निघून गेला. त्या रात्री आम्ही मध्यरात्री पर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि दिव्य लीलांचे स्मरण करीत होतो. त्यानंतर आम्हास झोप लागली सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडताच घाईने उठून बसलो. आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या. आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किंमतीस विकत घेतली. आम्ही काल घडलेला वृतांत त्याना संपूर्णपणे सांगितला, परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेडयातच काढले. आमच्या मनांत एकच प्रश्न सतत घोळत होता-काल पाहिलेले दृष्य खरे का हे दिसत असलेले खरे. अशा संभ्रमित अवस्थेत असतानाच एक अपरिचित गृहस्थ आला. त्याने आम्हास विचारले ''श्री वासविकन्यका देवीचा जन्म वैशाख शुध्द दशामीच्या दिवशी झाला का सप्तमीच्या दिवशी झाला ?'' या प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले, ''श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुध्द दशमीच्या दिवशी मध्यान्ह समयी झाला. त्या दिवशी शुक्रवार होता.'' हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, ''तुम्ही दोघे वेडे आहात.'' त्या गृहस्थाने श्रीपाद प्रभू बद्दल काढलेले उद्गार आम्हास आवडले नाहीत. परंतु कुरुगड्डीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो. आमच्या दोघांकडे नावडयास देण्यास पैसे नव्हते ही गोष्ट आम्ही नावाडयास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली, त्यामुळे नावाडयाला दया येऊन त्याने आम्हास नावेत बसू दिले. नाव चालू झाल्यावर नावाडयाची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली. त्याने ती काढून घेतली परंतु स्वत:जवळ न ठेवता कृष्णेच्या पाण्यात टाकून दिली. आम्ही नदी पार करून कुरुगड्डीस पोहोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान संध्यादी आटोपून तपश्चर्येसाठी बसले होते.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"