*०* संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या, पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास सुरुवात केली. भाजीत मीठ का नाही ? तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतं आहे याचे कारण काय ?
*०* विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मातली जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला आहे. गाय ते खाण्यास नकार देते आणि जनीने छडी उचलली. तिने गायीवर वळ उठवले परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला.
*०* विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली. विठ्ठल म्हणाला, "जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कुणाला चुकलेले नाही. हे सर्व भोगूनच ह्या भवसागरातून तरून जावे लागते.
*०* तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे तेंव्हा तुझे सर्व पूर्वसंचित ह्या जन्मी फेडून, माझ्या चरणी, चिरंतन समाधीत विलीन होशील ...."
*तात्पर्य :-*
*०* त्याचे तसेच का किंवा मला असे का नाही ? हे रडण्यापेक्षा कर्म भोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले तर जनीच्या ह्या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल, पण चांगले कर्म करणे सोडू नका. हेच आपल्या जीवनाचे ध्येय व उद्देश असावा ...
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"