शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर...
शरीरावर ती चांदीचे दागिने वापरायचे.
हातामध्ये तांब्याचे कडे वापरावे
दररोज रात्री 100 ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे.
दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे.
रात्रीच्या जेवणा मध्ये नाही.
जिऱ्याचे पाणी रात्री प्यावे
सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे
*दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत*
जेवणामध्ये भात घेतला तर उष्णतेचे विकार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.
फळांमध्ये कलिंगड ताडगोळे द्राक्ष डाळिंब.
जेवणामध्ये पुदिन्याची चटणी.
फणस आणि अननस ही फळ उष्णता वाढवतात ही फळ कुठल्या तरी त्यांच्या पदार्थ रूपांमध्ये खायची.
अननसाचे सरबत फणसाची पोळी इत्यादी इत्यादी.
*तहान लागली नसेल तरी भरपूर पाणी*
लिंबाचे सरबत कोकम सरबत घ्या ज्या शक्य आहे त्या गोष्टी सकाळच्या नाष्ट्या नंतर घेतल्या तर त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो.
नाका मधून रक्त येणाऱ्यांनी डोक्यावरती पाणी मारावे.
ज्यांना खूपच प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आंघोळ केल्यावर ती ओल्या अंगाने पाच मिनिटे तसेच थांबावे.....
नंतर थंडावा प्राप्त होतो.
रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपले तर चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.
मसाले आंबट खारट तिखट प्रमाणातच घ्यावे.
रोजच्या जेवणामध्ये फोडणीला जिरं जास्त प्रमाणात वापरावे.
मोहरी आणि हळद हिंगाचा वापर कमी ठेवावा.
मसाला च्या ऐवजी धने-जिरे याची पावडर वापरावी.
खूप प्रमाणात तोंडामध्ये काही पुळ्या येतात तोंड आले असे म्हटले जाते ... सर्वात आधी पोट साफ ठेवावे.
आणि अगदीच शक्य नसेल त्यांनी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या घ्याव्या.
जे लोक कॅल्शियम घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम या गोळ्यांची पॉवर कमी घ्यावी.
पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.
लघवीला जळजळ उन्हाळ्यामध्ये अनेकांना व्हायची शक्यता असते त्यावर ती एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेक वेळा सांगितलेला सब्जा हेच आहे.👍
ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी नुसताच सब्जा घ्यावा.
दुपारच्या जेवणामध्ये दही भात खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये गारवा मिळतो.
कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर ती थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.
*अशा रीतीने आपल्या ग्रुपवरील सर्व जण आपण आपली स्वतःची तब्येत चांगल्याप्रकारे उन्हाळ्याचा कुठलाही त्रास न होता सांभाळू शकतो*🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"