Saturday, April 13, 2019

वासना शुद्धी

*वासना शुद्धी*

स्वयंपाकी बाईपेक्षा घरच्या आईनं केलेला स्वयंपाक अधिक रुचकर लागतो. श्याम खूप दिवसांनी घरी येणार म्हणून आईनं साध्या पाल्याची केलेली भाजीही किती चवदार लागायची! 'अरे, तूझेच विचार असतात ना रे श्याम, माझ्या मनात?' त्यातील तो भाव असतो, प्रेम असतं ते उतरतं खाण्याच्या पदार्थात. एरवी मीठ मोहरी जिरं तिखट सर्वांचं सारखंच!'

     असं म्हणतात की *एखादी व्यक्ती अत्यंत प्रेमानं ज्यावेळी एखादा पदार्थ बनवते तेव्हा तिच्या हातावरील रेषांमधून अमृताचे झरे वाहून त्या पदार्थाची गोडी किंवा चव अनेक पटीनं वाढते*.

    लहानपणी मराठीच्या पुस्तकात एक छोटा धडा होता.     पेरूवाल्याकडून पेरू विकत घेऊन त्याच्या फोडी केल्या, प्रत्येकाला एकेक दिली. छोट्या बाबूला ती खूपच आवडली म्हणून ताईनं आपल्यातली अर्धी त्याला दिली. तीही त्यानं मिटक्या मारत खाल्लेली पाहून आईनं आपली पूर्णच फोड त्याला दिली. यावर तो म्हणतो-पेरुची फोड असते गोड. 
ताईची फोड फारच गोड पण आईची फोड तर गोडच गोड.... पेरू तोच होता पण प्रेम अधिकाधिक होत गेलं होतं.

     *उपासनेत आहाराचं फार महत्व आहे. त्यातही आहार बनवताना तो बनवणा-याच्या मनातले भाव जास्त महत्वाचे असतात. 'वासनाशुद्धी' नावाचा आहाराचा एक पैलू आहे*.

 *आईची वासना सर्वात शुध्द असते म्हणून स्वयंपाक करताना तिच्या मनात अत्यंत प्रेमभावना असते*.
 मुलांसाठीचं वात्सल्य असतं. ज्यांच्या घरात नामस्मरण, पूजाअर्चा, सर्वांवर प्रेम, सर्वांच स्वागत, सर्वांची सेवा असं वातावरण असतं त्या घरातलं अन्न पवित्र असतं शुध्द असतं.

 *पू. गोंदवलेकर महाराज म्हणत, 'अशा घरातलं अन्न मागून खावं, त्यामुळे आपली वासनाही शुद्ध होते*.

 आजच्या बाहेरचं खाण्याच्या जमान्यात हा वासनाशुद्धीचा विचारही ध्यानात ठेवलेला बरा.
   
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"