Tuesday, April 23, 2019

बुधप्रदोष

 बुधप्रदोष*

सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.

----------------------------
*प्रदोष म्हणजे काय?*
----------------------------

*प्रदोष :* 

*प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतर रात्रीचा *प्रारंभ होण्याचा काल. अमरकोषानुसार प्रदोष म्हणजे रजनीमुख. 'दोषा' म्हणजे रात्र आणि प्रदोष म्हणजे 'दोघे' चा प्रारंभ.*

 भिन्नभिन्न मतांनुसार सूर्यास्तानंतर दोन, तीन वा सहा घटिका (१ घटिका = २४ मिनिटे) हा प्रदोषाचा काल होय. एखादी तिथी दुसऱ्या तिथीने 'विद्धा' असेल, तर तिथिनिर्णय करताना प्रदोषकालाला महत्त्व असते. उदा., शिवरात्रीचा निर्णय करताना ज्या दिवशी प्रदोषकाली चतुर्दशी असेल त्या दिवशी शिवरात्र समजावी, या अर्थाचे वचन हेमाद्रीने उद्‌धृत केले आहे. नक्तव्रत (दिवसा न जेवता रात्री जेवणे) करताना प्रदोषकाली जी तिथी असेल, ती त्या दिवसाची तिथी  मानावयाची असते.
 
शिवपूजेच्या दृष्टीने प्रदोषकालाचे (आणि विशेषत त्रयोदशीच्या प्रदोषकालाचे) महत्त्व अनन्यसाधारण असते. प्रदोषकाली कैलासावर सर्व देव शिवाची पूजा करतात, त्यावेळी नंदीच्या शरीरात पृथ्वीवरील सर्व तीर्थे उपस्थित असतात, त्यावेळच्या शिवपूजेने सर्व पापे नष्ट होतात व पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते इ. प्रकारे पुराणांनी व धर्मनिबंधांनी प्रदोषमाहात्म्य सांगितले आहे. प्रदोषव्रत नावाचे शिवाचे एक काम्यव्रतही आहे. या व्रतात त्रयोदशीला दिवसभर उपवास करुन प्रदोषकाली शिवपूजन करावयाचे असते. विशेषतः शनिवारी, सोमवारी व मंगळवारी येणाऱ्या त्रयोदशींचे अनुक्रमे शनिप्रदोष, सोमप्रदोष व भौमप्रदोष हे विशेष फलदायक मानले जातात. या व्रतामुळे राज्यप्राप्तीसारखी फले मिळाल्याच्या कथा आहेत. शांडिल्य ऋषींच्या सांगण्यावरुन हे व्रत केल्यामुळे एका ब्राह्मणविधवेला व तिच्या मुलांना मोठे फल मिळाले होते. प्रदोषकाली आहार, मैथुन, निद्रा व स्वाध्याय या क्रिया वर्ज्य असतात.

*प्रदोष व्रत*

म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणार्‍याने, त्या दिवशी सकाळपासून उपवास करावयाचा असून सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी आंघोळ करावयाची असते. त्यानंतर, शिवाची षोडशोपचार पूजा करावयाची असते. किमान २१ महिने वा २१ वर्षे हे व्रत करावयाचे असते.

*प्रदोष वेळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ होय.*

*शनिप्रदोष*
हे पुत्रसंततिप्राप्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.शनिवारी प्रदोष म्हणजे त्रयोदशी असतांना शनिप्रदोष होतो
*अर्कप्रदोष'*
हे आयुरारोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.रविवारी त्रयोदशी तिथी आली असता अर्कप्रदोष होतो.
*'सोमप्रदोष'*
हे आनंद, शांतिरक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो.
*भौमप्रदोष*
हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.मंगळवारी त्रयोदशी तिथी आली असता भौमप्रदोष होतो.
*बृहस्पतिप्रदोष*
अथवा गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अशी धार्मिक कल्पना आहे.. पुराणातल्या एका कथेनुसार गुरुप्रदोष व्रताच्या साहाय्याने इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता. गुरुवारी त्रयोदशी ही तिथी आली असता, तो दिवस बृहस्पतिप्रदोष होतो, आणि त्या दिवशी त्याच नावाचे व्रत करतात.
*शुक्रप्रदोष*
 हे व्रत धर्म,
, अर्थ, काम व मोक्ष प्राप्ति साठी केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते.शुक्रवारी त्रयोदशी तिथी आली असता शुक्रप्रदोष होतो.
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"