Thursday, April 25, 2019

मंत्र महिमा : दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा

*।।दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ।।*

या मंत्रा मध्ये पहिला दिगंबर शब्द म्हणजे खरा मी- त्याचे अनुसंधान. मी  देह नाही. मी आहे आत्मा.तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम्.तो साक्षी आहे. निर्विकार आहे.अनंदरूप आहे.पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहम् ला हाक मारली आहे.

दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रम्हाचे अनुसंधान केले आहे.आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे.वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे,परब्रम्हच आहे.परब्रम्हानेच ही अनेक भासणारी रुपे धारण केली आहेत.त्या परब्रम्हाला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे.

श्रीपादवल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्रीपादवल्लभांना हाक मारली आहे.श्रीपादवल्लभ भगवंताचे सगुण  साकार रूप आहेत.ते भगवंताचेच अवतार आहेत.त्यांना संबोधन केले आहे.

चौथ्या दिगंबरा या शब्दाने प्रार्थना केली आहे.माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा. मला लवकर आपल्या जवळ न्या. आपले स्वरुप मला प्राप्त होऊ दया. मी देह असे जे मला वाटते आहे तो माझा भ्रम आहे.तो भ्रम नाहीसा करा. अहं ब्रम्हास्मि हा अनुभव मला येऊ दया. आपल्या सारखी दिगंबर स्थिति मलाही दया. अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात आहे.

*।। दिगंबरा दिगंबरा श्रीपदवल्लभ दिगंबरा ।।*

*प.पू. श्री दत्तमहाराज कवीश्वर*

🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"