॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय -३०
''श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान''
निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीचसांगितले
नाथ संप्रदायाप्रमाणे, जीव, चौसष्ट शाबर तंत्राचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उध्दार करून घेतो. नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रेय भगवानच आहेत. आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रेयच आहेत. बुध्दीबळाच्या पटावर चौंसष्ट घरे असतात. श्रीमहाविष्णु श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठलोकांत बुध्दिबळाचा डाव खेळतात याचा गुढार्थ असा की चौसष्ट योनीमध्ये असलेल्या निरनिराळया जीवांच्या जीवनकलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत, त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात.
दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता
मानवाच्या अध्यात्मिक अधिकारावर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारीत असतो. प्रत्येक जीवाची दिव्यात्मा होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योगपध्दति, मंत्रजप, यज्ञयागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पध्दतीचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडीशुध्दि अवलंबून असते. नाडीशुध्दीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळया शारिरीक, मानसीक, अध्यात्मिक शक्तीची प्राप्ति होते. त्या त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभु पुढे म्हणाले ''शंकरभट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्रीपीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्ये घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पूजारी नेमला जाईल. त्याच्या बरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील.'' असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पहाण्यास सहस्त्रावधि जन्म सुध्दा अपुरेच पडतील.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"