Saturday, April 27, 2019

हनुमंताचे नामजप आणि त्यामुळे होणारे लाभ

हनुमंताचे नामजप आणि त्यामुळे होणारे लाभ
============================

हनुमानाच्या बारा नावांचे स्मरण केल्याने आयुष्य वाढतं आणि सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते. या बारा नावांचा निरंतर जप केल्याने हनुमान दाही दिशा आणि आकाश-पाताळात देखील आपली रक्षा करतात.

1 ॐ हनुमान नम :

2 ॐ अंजनी सुत नम :

3 ॐ वायू पुत्र नम :

4 ॐ महाबल नम :

5 ॐ रामेष्ठ नम :

6 ॐ फाल्गुन सखा नम :

7 ॐ पिंगाक्ष नम :

8 ॐ अमित विक्रम नम :

9 ॐ उदधिक्रमण नम :

10 ॐ सीता शोक विनाशन नम :

11 ॐ लक्ष्मण प्राण दाता नम :

12 ॐ दशग्रीव दर्पहा नम :

* पहाटे उठल्याबरोबर या बारा नावांचा जप 11 वेळा केल्याने व्यक्ती दीर्घायू होतो.

* नित्य याचे स्मरण केल्याने इष्टाची प्राप्ती होते.

* दुपारी नाव घेणारा व्यक्ती धनवान होतो.

* संध्याकाळी नाव घेणारा व्यक्ती कौटुंबिक सुखांनी तृप्त राहतो.

* रात्री झोपताना नाव घेतल्याने व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त होते.

(संदर्भ सनातन ग्रंथ : मारुती)

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"