Sunday, March 24, 2019

प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ !

प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ !

****************************************
जन्म वासनेच्या पोटी । देह कामक्रोधा ओटी ।
मन अहंकारा पाठी । वाया गेला उठाउठी ।।१।।
प्रपंच लागता पाठी । नसे वेळ देवासाठी ।
अरे नाम घेता ओठी । येई राम तुझ्या भेटी ।।२।।
******* ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज *******
     
     वासना आणि अहंकार या पोटी काम-क्रोध जन्माला येतात. भगवंताजवळ वास ठेवला तरच त्या वासना नष्ट होतील.
      प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिध्दीची जरुर वाटते तर परमार्थात गुप्ततेची जरुरी असते.
     आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी. बाहेरुन प्रपंची दिसावे पण आतून परमार्थी असावे ही खरी कला आहे.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"