गुरुत्वाची गादी काटेरी आसन आहे.
आपणहून त्या गादीवर बसून आपल्या मनाने कोणालाही कसलीही उपासना करायला सांगणे म्हणजे त्याचे प्रारब्ध ओढवून घेणे आहे.आपली उपासना आधी प्रखर होऊन सद्गुरू प्राप्त होतात आणि त्यानी अनुग्रह देऊन आज्ञा केली तर दुस-याला उपासना देण्याचा अधिकार प्राप्त होतो.
उठसूठ कोणालाही काहीही साधना करायला सांगणे हे स्वतःवर संकटे ओढवून घेणे आहे. आम्हा सर्वांना सद्गुरू आवर्जून सांगायचे, "गुरू,महाराज बनून आपल्या पायावर कोणाचे डोके ठेवून घेऊ नका.महाराज बनण्याच्या भानगडीत पडू नका लोकांची खडतर प्रारब्धे घ्यावी लागतील." पण गुरूवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी.
आमचे एक गुरुबंधू विवेक किरपेकर यांच्या सोबत झालेला प्रसंग
किरपेकर अनेकांकडून पैसे घेऊन त्यांच्या पितरांची श्राध्दकर्मे काशीला जाऊन करू लागले. एके दिवशी त्यांना महाऊग्र काळपुरुषाचे दर्शन झाले. घाबरून त्यांनी सद्गुरूंना फोन केला. सद्गुरू म्हणाले आता संपले. अंत अटळ आहे. तुम्ही पितरांच्या अर्यमा देवतेच्या प्रांतात ढवळाढवळ केली आहे. किरपेकरांची मुत्रपिंडे खराब होऊन आठ दिवसात मृत्यू ओढवला
"माझे कोणीही गुरू नाहीत. मी स्वयंभू आहे" असे म्हणणारे शिष्य गुरूद्रोही ठरतात आणि भयाण अंत होतो. म्हणून अधिकारी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची उपासना करत रहाणे उत्तम. लोकांनी महाराज बनवून उपयोग नाही. त्या महाशक्तीने गुरुत्वाच्या गादीवर बसवले पाहिजे. लोकेषणा, वित्तेषणा सर्वांचा त्याग केला पाहिजे.
सतत सद्गुरूंशी संपर्कात राहिले पाहिजे. मध्यंतरी मधुर भांडारकर यांच्या मार्फत एका परलोकांतील गतिसंबंधी फिल्ममध्ये मला भूमिका करण्यासाठी खूप आग्रह केला होता पण मी सद्गुरूंची परवानगी मागितली तर त्यांनी त्वरित नकार दिला.
पण अनुग्रह मिळाला म्हणून आपल्या मनाने लोकांकडून पैसे घेऊन यज्ञयाग करायचे याची फार अशुभ फळे भोगावी लागतात कारण त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते. अनुग्रहित शिष्याची जबाबदारी गुरूंवर असते पण त्यांच्याशी संपर्क न ठेवता आपणच महाराज म्हणून मिरवणे फार महागात पडते.
म्हणून म्हंटले आहे "पानी पीना छानके! गुरू करना जानके!" पण एकदा गुरू केले की सतत लक्षात ठेवावे "न गुरोर् अधिकं न गुरोर् अधिकं"
मित्रमैत्रिणींनो सामान्य जीवन जगण्यातच फार समाधान असते. फार उंचावर गेल्यावर आपण प्रेमळ जनतेपासून दुरावतो. पडलो तर जखमाही गंभीर खोल होतात. अध्यात्म स्वतःपुरते ठेवा. अधिकार नसताना ज्योतिषाचे सल्ले देत बसू नका. हत्ती होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी.
लेखक : श्री.शरद उपाध्ये
असो दोन्ही लेखक उच्च कोटिचे अधिकारी पुरुष आहेत वरील लेखा बाबत आपले मत व्यक्त करावे ही विनंती
🙏
शरद उपाध्ये यांचे गुरू कोण आहेत?
ReplyDelete