Sunday, April 7, 2019

कुंकुमार्चन : कुलदेवीची आराधना करण्याचा हा एक उत्तम मार्ग

कुंकुमार्चन

कुलदेवीची आराधना करण्याचा हा  एक उत्तम मार्ग आहे.कुंकुमार्चन करताना अनेक कामना बाळगल्या जातात उदा शीघ्र विवाह,उत्तम वर किंवा वधूप्राप्ती ,मनःशांती,रूनमोचन, शापमोचन ,सौभाग्यवर्धन,धनप्राप्ति,विद्यप्राप्ती ई . विशेष करून अष्टमी ,चतुर्दशी, पौर्णिमा ,नवरात्र ,लक्ष्मीपूजन ,मंगळवार ,शुक्रवार या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे,अमावस्येला कुंकुमार्चन करु नये.आश्विन नवरात्रात सप्तशती चे पाठ वाचण्या पूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे .कुंकुमार्चन केलेल्या कुंकूम मध्ये एक मोरपिसाची राख मिसळावि व त्याचा वापर रोज करावा त्यामुळे दृष्ट,बाहेर बाधा या पासून संरक्षण होते ,देवतेच्या नामावलीने देवतेवर वा देवताप्रतिकावर विशिष्ट उपचार द्रव्य  अर्पण करणे ह्यास अर्चनक्रिया म्हणतात . ही शीघ्र फलदायी उपासना आहे ह्या अर्चनक्रियेत त्या त्या देवतेला प्रिय असणारे द्रव्य घेतात.सर्व देवतांना फुलांनी कुसुमार्चन, अक्षतांनी अक्षतार्चन करता येते.तसेच विष्णू भगवंतांना तुलसी अर्चन, महादेवास् बिल्वअर्चन ,गणेशास दुर्वार्चन, देवीस कुंकुमार्चन विशेष प्रिय आहे .देवीची मूर्ती ,प्रतिमा , टाक, श्रीयंत्र, सप्तशती महायंत्र,देवीच्या पादुका ह्यापैकी एकावर श्री सूक्त ,देवि स्तुती, नवार्ण मन्त्र,देवी  सहस्त्र नामावली,देवी अष्टओतर शत नामावलीने कुंकू वाहने यास कुंकुमार्चन म्हणतात ,कुंकुमार्चन हे मंदिरात अथवा घरी देखील करू शकतात जर देवी चे कोणतेही प्रतीक उपलब्ध नसेल तर  दर्पण म्हणजे आरसा घेऊन त्याबर देखील कुंकुमार्चन करू शकतात मात्र त्यावेळी नवीन आरासा घ्यावा त्यामध्ये स्वतः चे प्रतिबिंब बघू नये, नित्य कुंकुमार्चन करावयाचे असल्यास तो आरसा देवघरात ठेवावा विशिष्ट कामने साठी आरशा वर कुंकुमार्चन केले असेल तर कामनापूर्ती झाल्यानन्तर तो आरसा सुहासिनी ला दान द्यावा  किंवा घरात वापरण्यास घ्यावा.निष्काम हेतूने  अर्चना  केली असल्यास अर्पण केलेले कुंकू घरातील व बाहेरील व्यक्ती ना प्रसाद म्हणून देण्यास हरकत नाही प्रसाद वाटून देखील कुंकू उरले असेल तर ते वाहत्या पाण्यात सोडावे  विसर्जन करावे ,नामावलीने अर्चन करत असताना मृगी मुद्रेने ( उजव्या हाताच अंगठा ,मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी) व उतान्या हाताने कुंकू अर्पण करावे .कुंकुमार्चन करताना कुंकूवाला जाळी लागलेली असू नये कुंकुमार्चन नन्तर ते कुंकू रोज स्वतः चा कपाळी लावावे.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"