Tuesday, April 9, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -12

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -१२
कुलशेखर वृतांत
श्री सुब्बय्या श्रेष्ठी किती तरी नविन विषय सहजपणे समजाऊन सांगत. त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्म विकास होत असे. ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात वेंकटेश्वर स्वामीच आहेत. कलीयुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत. साधारण पणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत. परंतु सांध्र सिंधु वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षांचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल. या संबधात ब्राह्मणानी सांगितलेली माहिती श्रेष्ठीनी सांगितलेल्या माहिती पेक्षा निराळीच होती .
श्वासाचा आयुष्याशी संबंध
कलीयुगामध्ये कलीची अंत:र्दशा पाच हजार वर्षात संपते. त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो. त्यानंतर कलीयुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते. कलीयुगात एकूण चारलाख बत्तीस हजार वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा, सुक्ष्मदशा, विदशा इत्यादी असतात हा योग शास्त्र समजाणाऱ्याना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशेवीस वर्षे आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ति एकशेवीस वर्षे जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात किती श्वास-प्रवास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत. मन चंचल असणारे रागिट स्वभावाचे, घाईघाईने धावणारे सदैव दु:खात अथवा उदास असणारे. दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात. सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्षे जगतो. अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळच जिवंत राहते. श्वास-प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिये चांगल्या अवस्थेत असावयास हवी. योगीजन वायुंचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असे करतात. यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घ कालापर्यंत जीवित राहतात. मनुष्याच्या शरीरात जिवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात.
श्रीपाद चरित्रामृतताच्या पारायणाचे फल
दहा वर्षापुर्वी असलेले शरीर आता सारखे नसते. जुन्या जीवाणुच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात. नवीन शरीर भाग जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्ति सुध्दा अनेक बदलातून जात असते. जीवनदायक नवीन प्राणशक्ति निर्माण होते. रोगट, जुनी प्राणशक्ति नाश पावते. त्याच प्रमाणे मानसिक शक्ति सुध्दा अनेक बदलातून जात असते. जुनेभाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात. नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवीशक्ति , दैवीकृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्या द्वारे मन, प्राण आणि शरीर सुध्दा होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिध्दशक्ति , योगशक्ति , अंतर्निहित असते. असे ग्रंथ मानसिक रीतीने, वाचिक रीतीने अथवा मानस-वाचिक दोन्ही मध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारिरीक, मानसीक प्राण, रूग्ण, बाधा, कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलिन होतात. तेथे ते शुध्द होऊन दिव्य अनुग्रहपुरित स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात. अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह-पर सुखाची प्राप्ति होते.
सत्पुरुषाना अन्नदान केल्याची फळे
ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जेऊ घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्त क्षेत्रामध्ये दान करावी. सत्पुरुषाना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते. त्याला अजून थोडया काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते. एवढेच नाहीतर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती, पुष्टी, तुष्टी, ऐश्वर्य इत्यादीच्या संबंधातील भोग, योगाच्या स्पंदनाचा अव्यक्त पणे उद्भव होतो. कालांतराने अव्यक्त अवस्थेतील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षामध्ये विराजित होतात. वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वास महर्षि आणि त्यांच्या दहा हजार शिष्याना पोटभर जेवण दिले. श्रीगुरुना श्रध्दाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे, कालांतराने व्यक्त स्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोगभाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होतात
सांदिपनी ऋषीच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असतांना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेऊन ते थोडावेळ निद्रिस्त झाले. सुदामाला भुक लागली होती. गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते. ते तो श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले झोपेतून उठल्या प्रमाणे आव आणून म्हणाले ''सुदामा भूक लागली आहे. घरून येताना गुरु माऊलीने मुलाना भूक लागेल म्हणून कांही तरी खायला दिले का ?'' सुदामाने नाही म्हटले. श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, ''तू कांही तरी खात असल्या सारखे वाटले मला.'' सुदामा म्हणाला ''मी विष्णुसहस्त्र नाम म्हणतो आहे.'' श्रीकृष्ण म्हणाले ''ओ हो ! असे काय ! मला एक स्वप्न पडले की आपणा दोघांसाठी गुरु माउलीने पोहे दिले, ते तू मला न देता एकटाच खात आहेस. एवढयात सुदामा म्हणाला, ''श्रीकृष्ण ! थकला आहेस ना ? त्यातून दुपारची वेळ या वेळी पडलेल्या स्वप्नाचे कांही फळ नसते असे शास्त्र सांगते.'' श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले.
कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला. त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णुसहस्त्र नामाचे पठण केले परंतु कांही विशेष फायदा झाला नाही. शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला. त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्य वैभवाचा प्रसाद दिला. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेऊन थोडावेळ विश्रांती घेतली होती. त्याची परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपऊन त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले. कर्मसूत्र किती गुढतेने कार्य करते हे प्रभुनी ह्या द्वारे सूचित केले.
मल्ल युध्दात प्रविण असणाऱ्याचा गर्व हरण
श्रीपाद प्रभू चार वर्षांचे असताना पीठीकापुरममध्ये मल्याल देशातील एक मल्ल आला. त्याचे नांव कुलशेखर असे होते. तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता. प्रत्येक राज्यातील मल्लयोध्दयांना जिंकून जयपताका घेऊन पीठीकापुरमला आला. पीठीकापुरमच्या मल्ल योध्दयांना आपण कुलशेखर कडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते. त्या मल्लापैकी कांही जणांचा श्रीपाद प्रभूंवर दृढ विश्वास होता. तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रध्दाभावाने ते श्रीपाद प्रभूकडे गेले आणि शरणागती मागितली. श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय वचन दिले. पीठीकापुरम मध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठीकिाणी वाकडा होता व अशकत सुध्दा होता तो कांही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेऊन घेतले होते. तो श्रीपादाचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे. त्यावर श्रीपाद त्या युवकास, भीमास, म्हणाले होते योग्य वेळ येताच मी तुझे काम करीन. श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले ''आपला भीम आहे ना ? कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे. भीमासारखे आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय ? भीमाची श्रीपाद प्रभूंवर अढळ श्रध्दा होती.''
ठरल्या प्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुध्द सुरु झाले. अनेक लोक हा अद्भूत सामना पहाण्यास जमा झाले. कुक्कटेश्वराच्या मंदीरातील प्रांगणात मल्लयुध्द सुरु झाले. कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते. तो ज्या ठिकाणी भीमास मारीत होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला मार लागत होता. कुलशेखर थकला. भीमाचे कुबड जाऊन तो बलवान झाला. कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा, मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वांचे ज्ञान तुला आहे. भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे. मीच त्याचा रक्षक आहे. हे ज्ञान त्याला आहे. तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे. तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राण शक्ति घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे. तिरुपतीला असणारा मीच आहे. कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्रीवेंकटेश्वराच्या रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले. श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करूणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"