पृथ्वीवर जेंव्हा धर्माची हानी होते अन पाप वाढीस लागते त्यावेळेस मनुष्याला सतधर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी देव संतरुपात चैतन्य शक्ती जन्माला घालत असतो. हे सर्व त्यावेळची परिस्थितीवर अवलंबून असते.असे एक ना अनेक संत जन्माला येऊन लोक कल्याणार्थ कार्य केले यापुढे करत राहतील.हे कलियुग आहे हिथें सत्याला थारा नाही.खोटं बोल पण रेटून बोल ह्या उक्तीप्रमाणे जगात रीत चालत आहे.संतांनी कितीही ओरडून सांगितले तरी लोकांना कळत नाही. जिथे थाटमाट आहे तिथे लोकांचा घोळका निर्माण होतो. हा सर्व देखावा आहे हे जेंव्हा कळत तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. लोकांना आध्यात्माशी काही घेणं देणं नाही काही चमत्कार व्हावा अन माझं सर्व सुरळीत चालू राहावं अस वाटतं काही लोक अपवाद आहेत की त्यांना सांसारिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख हवं असत.एकावर श्रध्दा ठेऊन केलेली भक्ती सर्व श्रेष्ठ ठरते.हल्ली धीर धरणे लोकांना होतच नाही.ही संसार रुपी नदी पार करण्यासाठी दोन्ही नावात पाय ठेवून चालतात होते असे यातील एक नाव डळमळीत झाली की दुसरी नाव ही पलटी होते.
यासाठी संतस्वरूप त्या चैतन्य शक्तीला अनन्य भावे शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरूमध्ये अशी क्षमता असते की कोळशाच्या खाणीतून हिरा काढावा अन त्याला विविध पैलू पडून त्याची या जगात किंमत वाढवावी तस सद्गुरू आपल्या सतशिष्याच्या बाबतीत करीत असतात. फक्त एकच करावं अनन्य भावे शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा. संतांचा खरा परिचय होण्यासाठी त्यांना आदी हा देह त्यागावा लागतो त्यांच्या हयातीत त्यांना ओळखणारे भाग्यवानच म्हणावे लागतील.हे कटू सत्य आहे .स्वामी समर्थ,गजानन बाबा, साईबाबा ,शंकरबाबा असे एक ना अनेक विभूती लोककल्याणासाठी पृथ्वीवर प्रकट झाल्या पण ते हयातीत असताना त्यांना हाल अपेष्ठा सोसाव्या लागल्या पण ते समाधिस्थ झाल्यावर लोकांना त्यांचा अधिकार काय होता हे कळलं हे मानव जातीच दुर्दैव म्हणा किंवा कलीचा महिमा म्हणा आज याच तीर्थक्षेत्री लोकांची अफाट गर्दी होते. तिथंही बाजार मांडला जातो. भाविकांच्या सुखसोयी च्या नावाखाली लुटलं जात.अशा तीर्थ क्षेत्रामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला ही चांगली गोष्ट आहे. तीर्थक्षेत्री पैसे घ्यावेत पण ते माफक असावेत .जेणेकरून मंदिराचा विकास व भाविकांची सोय व्यवस्थित लागावी लूट थांबावी एवढीच माफक अपेक्षा..
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"