Tuesday, April 23, 2019

ज्योतिषशास्त्रा मध्ये कासवाची अंगठी

🌹 *कासवाची अंगठी* 🌹


आपले दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रा मध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. त्यामधील एक उपाय आहे हाताच्या बोटांमध्ये वेगवेगळ्या धातूच्या आणि रत्नांच्या अंगठ्या घालणे.ज्योतिषशास्त्राचा एक अभिन्न भाग आहे वास्तुशास्त्र आणि वास्तूशास्त्रा मध्ये अंगठी संबंधीचा एक खास उपाय सांगितला गेला आहे. तो असा आहे की दुर्भाग्य दूर करण्यासाठी एक अशी अंगठी वापरा ज्यावर कासवाचा आकार असेल.
कासवाचा आकार असलेली अंगठी वापरण्याचे फायदे अनेक आहेत , अंगठी उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये किंवा तर्जनी मध्ये घातली पाहिजे. कासव हे लक्ष्मी माते सोबत जोडलेले आहे यासाठी शक्यतो शुक्रवारी ही अंगठी घालण्यास सुरुवात करावी.
कासवाचा आकार असा बनवा की कासवाचे तोंड अंगठी घालणाऱ्याकडे असावे. कासवाचे तोंड बाहेरील बाजूला असल्यास नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
शुक्रवारी अंगठी खरेदी करावी आणि घरी आणून थोड्यावेळ लक्ष्मीमाते समोर ठेवावी. दुध आणि पाण्याने धुवावे. यानंतर धारण करावी.
समुद्र मंथनच्या कथेनुसार भगवान विष्णू ने समुद्र मंथनासाठी कासवाचा अवतार घेतला होता. आणि लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. जी भगवान विष्णूची पत्नी झाली. यासाठी लक्ष्मी सोबत कासवाला सुध्दा धन वाढवणारे मानले जाते.
कासवाला शांती, धैर्य, सातत्य आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कासवाची अंगठी चांदीची असेल तर जास्त शुभ असते.
शास्त्रानुसार कासव सकारात्मक आणि प्रगतीचे प्रतीक आहे.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"