देवाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे पळत सुटणे नव्हे. किती प्रदक्षिणा घातल्या यावर पुण्यसंचय ठरत नाही. अंतःकरणापासून नामस्मरण करीत त्या महाशक्तीच्या तेजोवलयांतून चालत आपल्यामध्ये ती शक्ती सामावून घेणे महत्वाचे असते. काहीजण यालाच देवाला बांधून ठेवणे म्हणतात.
श्री गुरूचरित्रांतही सांगितले आहे, "गर्भवती स्त्रिया किंवा डोक्यावर पाण्याने भरलेला घट घेऊन बायका जशा मंद मंद गतीने चालतात तैशा मंद मंद गतीने प्रदक्षिणा कराव्यात."
देवाची पूजा किती प्रेमाने आणि लक्षपूर्वक करावी हे सांगताना प.प. श्री थोरले महाराज टेंब्ये स्वामीमहाराज *दत्तमाहात्म्य* मध्ये सांगतात,
"मूर्तीपूजा डोळा देखावी!
तैसेची चित्ती रेखावी !
तेथेची वृत्ती राखावी!
तेणे ब्रह्मपदवी मिळविजे!"
*।। श्री गुरुदेव दत्त ।।*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"