न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे, गुरूंपेक्षा वरचढ दुसरे काही नाही. गुरुसेवा आणि गुरुभक्ती यांहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. तत्त्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ सद्गुरूंना नमस्कार असो.
श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ओवाळितों प्रेमें आरती ॥धृ.॥
उद्धार जगाचा । जाहला बाल अत्रिऋषिचा । धरिला वेष असे यतिचा । मस्तकीं मुकुट शोभे जटिचा । कंठिं रुद्राक्षमाळ स्मरणीं । हातांमध्यें आयुधें बहुत वणीं । तेणें भक्तांचे क्लेश हरणी । त्यासी करूनि नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती । ओवाळितों प्रेमें आरती ॥१॥
गाणगापुरीं वस्ति ज्याची । प्रीति औदुंबरछायेची । भीमाऽमरजासंगमाची । भक्ति असे बहुत सुशिष्यांची । वाट दाउनियां योगाची । ठेव देतसें निजमुक्तीची । काशीक्षेत्रीं स्नान करितो । करवीरीं भिक्षेला जातों । माहुरिं निद्रेला वरतों, जरतारतरित, छाटि झरझरित, नेत्र गरगरित, शोभी । त्रिशुल जपा हातीं । ओवाळितों प्रेमें आरती ॥२॥
अवधूतालागीं सुखानंदा । ओवाळितों सौख्यकंदा । तारि हा दास रदनकंदा । सोडवी विषयमोहछंदा । आलों शरण अत्रिनंदा । दाविंसद्गुरु ब्रह्मानंदा चुकवी चौर्याशीचा फेरा । घालिती षड्रिपु मज घेरा । गांजिति पुत्रपौत्रदारा । वदनीं भजन, मुखीं पुजन, करितसें, तयांचे बलवंता । ओवाळितों प्रेमे आरती । श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ओवाळितों प्रेमें अरती ॥३॥
उठीं उठी श्रीदत्तात्रेया । श्रीपादश्रीवल्लभा सदया ।
श्रीनृसिंहसरस्वती गुरुवर्या । दर्शन देई भक्तांसी ॥ध्रु०॥
पंच पंच उषःकाल जाहला । अरुणोदय सप्तपंच धाटिला ।
अष्टपंच प्रातःकाला । उदया पावे रवि पूर्ण ॥१॥
आले अमरेंद्रादि अमर । संत साधु मुनिवर ।
समग्र आले नारीनर । कांकड आरती पहावया ॥२॥
नमितां पूर्ण मनोरथ होती । त्रिविध ताप समूळ हरती ।
पूर्वज समस्त उद्धरती । कांकड आरती देखिलिया ॥३॥
वेगें उठती सद्गुरुमूर्ती । सकळिक पदांबुज वंदिती ।
स्तवनीं ध्यानी ओवाळिती । विश्वव्यापक परमात्मा ॥४॥
गुरुत्रैमूर्ति आश्रम घेऊन । तरुवरीं ब्रीदरक्षणार्थ राहुन ।
स्मरतां तारिसी जन संपूर्ण । रक्षिसी गुरुभक्त सर्वदा ॥५॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"