Sunday, April 21, 2019

परशुराम महिमा

⚛ रेणुकेचा कथा प्रसंग ⚛              प्रत्येक जीवाचा भोग त्याचा  प्रारब्ध  भाग  कर्म भाग दग्ध होणे,  हे निश्चित असे असते .असे सिद्ध सांगता.   योगी श्रेष्ठतम लोकांचे वागणे पण अगाध  असते.  त्यांना कुठली चिंता नसते.   तसेच जनास आशीर्वादही मार्ग दिसत असतो.  राजकन्या रेणुकाच्या  जीवनात असाच  क्षण आला.  तिथे नदीवर हयहय देशाचा राजा दळ भारासह आला होता.  जलक्रीडेत तो रमला ऐश्वर्यासह नौका विहार झाला . राजकन्येस  त्यामुळे मागील ऐश्वर्य जीवंत आठवले.  काही काऴ ति  तंद्रीत होती.  आपल्याला   आश्रमात शिघ्र जाणे आहे . हे आठवले लगबगीने तीने वल्कले परिधान केली.  नित्याप्रमाणे वाळूचे कण  एकत्र करून घर तयार करू लागली.  पण त्या रेणू घटकाने घट बनेना  एक घटका यज्ञ केला;  पण ती आज विफल बनली आता आश्रमात जाळविना व्यवहार कसा होईल हे कळेना . रोज त्या एका कळशीत  पूर्ण आश्रम व्यवहार पुरा होत असे . ति रिक्त हाताने खिन्नपणे आश्रमात आली. ऋषीने तो सर्व प्रकार जाणला  यज्ञ शाळेत तीन पुत्र , ऋषी  पुढे होते . त्यांना आज्ञा दिली त्यांनी मातेचे मस्तक उतरवणे मान्य केले नाही.  त्याक्षणी स्मरण करताच परशुराम पुढयात  आले.  आणि आज्ञेनुसार तीन पुत्र , माता आणि त्या कार्यास मज्जाव करणारे दोन विद्यार्थी या सर्वांचेच शिर धडावेगळे करून  ऋषिपुढे  आणले .ऋषीने प्रसन्नतेने त्यास वर मागण्यास सांगितले.  मातृवंदन करणे मागितले,  त्या करिता मातेसह सर्वांनाच जिवंत  करण्याची विनंती केली.  ऋषी   आज्ञेनुसार  परम बिंदूंच्या श्री पिढी मातेचे मस्तक स्थापण्यात सांगितले . ते गुरुस्थान सह्याद्री शिखरावर पूर्व भागी आहे.  तेथे दत्ता प्रकट झाले.  कार्यभाग साधला तेथे त्रिपूराबा परम विद्या स्मरून मातृतीर्थ दत्ताने निर्माण केले . तेथे गुरुदेव प्रसादाने रेणुका सजीव झाली . तिला अन्य व्यवहार स्मरत नव्हता . तेथे आश्रम तयार झाला त्यानंतर परशुरामाने आई वडील यांचे चरणी वंदन केले .परिपूर्ण विद्येचे आचार्य पद त्यास लाभले. दीक्षाविधी सह आचार्य पदी प्रतिष्ठापना झाल।  गुरुकृपेने मातृ हत्येतून मुक्तता झाली.  तेथे मातृतीर्थ दत्ताने निर्माण केले. आहे त्या शास्त्रातील त्रिपुरा ग्रंथ निर्माण झाले.  कर्म उपासना ज्ञान यांचे दोन असे ते निगम शास्त्र परशुरामाने निर्माण केले . मंत्रशास्त्र संहितेचे कल्पसूत्र गुरुकृपेने शक्य झाले .असे सिद्ध नामधारका कथन करतात असेच पीठ योगेश्वरचे तसेच भीमाकाठी चंद्र लांबीचे निर्माण केले चंद्र लांबाचे हे "आकार " पीठ महाराष्ट्रातील योगेश्वरचे  उकार पिठ  आणि मातापूर हे मकार पीठ आहे याचे मूळ वर्णन ग्रंथात आहे.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"