*‼श्रीराम‼*
*कोणताही मोठा व्यापारी व्यवसाय करतो .सात पिढया बसुन खातील येवढा व्यवसाय असुन "आम्हाला आता गरज नाही"असे म्हणत नाहीत.*
*रोज उत्पन्नात भर घातली पाहिजे ह्याची त्याला जाणीव असते, नाहीतर बॅलन्स कमी होत जाईल आणि कधीतरी खर्च फार पण उत्पन्न कमी अशी अवस्था ओढवून अनर्थ होईल म्हणून ते सतत कष्ट करीत असतात.*
*तसेच उपासनेचे आहे.महा पुण्यपावन साधूसंत सत्पुरूषही अखेरच्या* *श्वासापर्य॔त साधना करीत असतात.*
*काहीजणांना वाटते आमचे सगळे चांगले होत आहे,* *आमच्यावर देवाची कृपा आहे.उपासनेची गरज नाही.पण सर्व चांगले होत आहे म्हणजेच पुण्य वेगाने खर्च होत आहे.*
*दिवाळी चांगली गेली म्हणजेच बॅन्केतून हजारो रुपये काढले मग ते पुन्हा ओव्हरटाईम करून भरून काढायला नकोत का?*
*देवाचे कोणी लाडके नसतात.देव कॅशियर आहे.बॅलन्स बघतो,तेवढाच पास करतो.म्हणून एवढे दुःख भोगल्यावरही कुंतीने श्रीकृष्णांकडे दुःखःच मागून घेतले कारण दुःखात देवाची आठवण राहून नामस्मरण होते.*
*आध्यात्मिक बॅन्क भरलेली असली तर संकटे लांब रहातात.*
*उत्तरगती* *सुखरूप राहाते,असे सर्व संत सांगतात.*
*उपासनेला दृढ चालवावे असे समर्थ सांगतात,*
*आपल्या सर्वांना आध्यात्मातील मोठी वाटचाल करता यावी आणि रामनाम रूपी बँकेत नामाचे deposit वाढत रहावे हिच सद्गुरू चरणी प्रार्थना..*
*"हरीनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा हि हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा"*
*या हरीनामाच्या ठेवीला चोर चोरत नाही.पाहरेदार कँशीयर कारकूणाची गरज नाही तीचा रखवाला भंगवंतच आहे.म्हणून कोणत्याही वेळी उठत बसता झोपता काम करतांना नाम घेतच रहा तीच आयुष्याची ठेव आहे।*
*🙏🌷जय श्रीराम समर्थ🌷🙏*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"