*🚩🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏🚩*
*श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनमोल असे उपदेश*
तु फक्त माझे नाम घे तुझा योगक्षेम मी स्वतः चालवेन.
अरे आपण दोघे या जन्मातच नाही;तर मागचे कित्येक जन्म एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मांचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे.
बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे लक्ष आहे तुझ्यावर.
आपल्या पेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर.
तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार करू नकोस.
तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दु:ख भोगल्यानंतरच मी तुला जवळ करेन.
लक्षात ठेव मी तुझा हात पकडलाय तो सोडण्यासाठी नव्हे.
फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा.
पुण्याचेच काम कर तु लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करशील तर मी तुझ्या कमरेत लाथ घालील.
कर्माची भीती मनात ठेव तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्यच बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव.
*॥श्री स्वामी समर्थ॥*
*🌺🌺 शुभसकाळ 🌺🌺*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"