Sunday, April 7, 2019

विवेक म्हणजे सद्गुरूंचे रूप.

*विवेक म्हणजे सद्गुरूंचे रूप.*

          *जीवनांत "शहाणपण" काही जास्त लागत नाही, थोडे "शहाणपण" पुरे. थोडा जरी कमीपणा घेतला तरी ठीक असते.* एकाने तरी कमीपणा घेतला तरी
ठीक पण दोघांनीही कमीपणा घ्यायचे नाही म्हटले तर भांडण. युधिष्ठिर पाच गावे दिली तरी चालतील असे म्हणत होता पण दुर्योधन हा काहीच द्यायला तयार नव्हता म्हणून महाभारत घडले.

           सांगायचा मुद्दा, अहंकार जोपर्यंत आहे तर सर्वनाश व विवेक असेल तर सर्व सुख. *संतांनी विवेकाला फार महत्व दिलेले आहे.*

*मज हृदयी सद्गुरु,*
*तेणे तारिला हा संसारपुरू,*
*म्हणोनी विशेषू अत्यादरू,*
*विवेकावरी* 

           विवेकाचे महत्व काय ते पहा. *"विवेक म्हणजे सद्गुरुंचे मूर्तीमंत रूप. सद्गुरु म्हणजे काय? विवेक."* हा विवेक जर असेल तर जीवनांत चांगले काय, वाईट काय, काय करायचे व काय नाही करायचे, केव्हा करायचे व केव्हा नाही करायचे हा विचार केला जातो. *शास्त्रीय शब्द म्हणजे विवेक व साधासोपा शब्द म्हणजे शहाणपण."*

           अहंकार म्हणजे शहाणपणाचा अभाव. हा अहंकार माणसाला संपूर्ण जीवनांत नाचवतो आहे. तो माणसाच्या डोक्यावर मि-या वाटतो असे म्हटले तरी चालेल. जसे एखाद्याला शेंडीला धरून हलवतो तसे हा अहंकार माणसाच्या केसांना धरून हलवतो आहे. हा आत लपून बसलेला आहे. या अहंकाराचा नाश झाला पाहिजे. 

           *अहंकाराचा नाश झाल्यावर काय झाले ते तुकाराम महाराज म्हणतात आज मी माझा मृत्यू पाहिला.*

*आपुले मरण*
*पाहिले म्या डोळा*
*जाहला तो सोहळा*
*अनुपम्य* 

           मरण पाहिले म्हणजे काय? अहंकार मरून गेला, अहंकार जिरून गेला, अहंकार विरून गेला, अहंकार नष्ट झाला म्हणजे मी मेलो कारण अहंकार म्हणजेच मी. अहंकार मेला आणि ख-या अर्थाने मी जिवंत झालो. तुकाराम महाराज काय म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा जाहला तो सोहळा अनुपम्य तो अनुपम्य सोहळा झाला. *अहंकार गेल्यावर तुम्ही जे असता त्यावेळेला आनंदीआनंद असतो.*

          *अहंकार गेला म्हणजे काय गेले?* पुष्कळ लोकांना काय वाटते विद्वतेचा अहंकार वगैरे. तो ही अहंकारच आहे पण तो वेगळा
आहे. *खरा अहंकार काय? मी अमूक, मी असा हा खरा अहंकार आहे.* याच्यापोटी बाकीचे सर्व येते. विद्वतेचा, पैशाचा, सत्तेचा अहंकार हे सर्व हया ख-या अहंकारातून येते. मी कोण? मी अर्जुन. मी कसा? मी योध्दा आहे, मी धर्नुविद्येत तरबेज आहे, मी अजिंक्य आहे वगैर वगेैरे नंतर येते. 

           *ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "अर्जुनपण न घेता जर तू उरलास तर तू आणि मी एकच"*

*"पै" आपुलेनी भेदेविण*
*जाणिजे जे माझे एकपण*
*तयाचे नांव शरण*
*मज येणे गा*

          शरण गेला याचा अर्थ काय लोटांगण घातले असे नव्हे. 

           --- *सद्गुरु श्री. वामनराव पै.*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"