Thursday, March 14, 2019

अन्न संस्कार.

अन्न संस्कार.

अन्न हे पुर्णब्रम्ह हे सर्वश्रुतच आहे. हेच अन्न मिळवण्यासाठी आपण दिवसरात्र एक करतो.
अब्जाधीशसुध्दा तेच खातो जे झोपडीतील गरीब खातो. फक्त थाटमाट वेगळा. पैसे दिल्यानंतर हाॅटेल मधुनही वेगवेगळ्या चवीचे अन्न मिळते पण घरचे ते घरचेच.
ह्याला कारण आहे अन्नसंस्कार. 
अन्न बनवणारयाची मनापासुन बनवायची इच्छा पाहिजे तर त्यात चव उतरते. अन्यथा अन्न म्हणजे काही पदार्थांचे मिश्रण. मग त्या अन्नाला चव कशी येणार ?
ज्या घरात अन्नपुर्णेची पुजा अर्चा होते तिथे अन्नाला चव असतेच.
जिथे अग्नीला पहिला घास दिला जातो तिथे अन्नाला सुगंध येतो.
जिथे देवाला पुजेनंतर बनलेल्या पहिल्या अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो तिथे धनधान्याची बरकत राहते.

श्री अन्नपुर्णा स्तोत्राची एखादी झेराॅक्स प्रत किंवा श्री अन्नपुर्णा प्रसन्न असा बोर्ड जरी किचन मध्ये लावला तरी भरपुर फरक पडतो.
मी दिलेल्या हाॅटेल व्यवसायात ह्याचा पदोपदी अनुभव घेतला आहे. मी सांगितलेला उपाये यशस्वी ठरत गेला.
अन्न बनवताना मन शांत पाहिजे नाही तर मनाची जशी भावना असते तसे संस्कार त्या अन्नात उतरतात.
ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एक पदार्थ एकच ठिकाणी सलग दहा दिवस खाऊन बघा. जिथे चव बदलतच नाही तिथला आचारी आनंदाने अन्न बनवत असतो. ज्यावेळेला चव बदललेली असेल त्यावेळेस त्याच्या वैयक्तीक आयुष्यात काहीतरी वेगळ घडलेल असेल.
जो अन्नाला नाव न ठेवता प्रत्येक अन्नात चव शोधतो तो आनंदी असतो.
एखादी व्यक्ती प्रेमाने अन्न बनवत असते त्यावेळेस तीच अनाहत चक्र ऊर्जा पुरवत. अन्न खाणारयाच मणीपुर चक्र त्याला अन्न पचायला मदत करत. अन्न चवीन खाणारयाच स्वाधिष्ठान चक्र त्याला त्याचा आनंद घ्यायला मदत करत असत.
श्री अन्नपुर्णेचा गायत्री मंत्र.
ॐ भगवते विद्महे, माहेश्वरेय धीमही
तन्नो अन्नपुर्णा प्रचोदयात् |
हा मंत्र दररोज  दहावेळा म्हणुन अन्न बनवायला सुरुवात करा. पण त्यापुर्वी सर्व प्रातविधी आटपलेले असावेत तसेच मांसाहाराच्या ठिकाणी म्हणु नका. मग होणारया बदलांच निरीक्षण करा.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"