Friday, March 29, 2019

रामरक्षा स्तोत्र सिद्ध

रामरक्षा 
येणाऱ्या चैत्र नवरात्रात म्हणजे गुढीपाडवा ते श्रीरामनवमी चा नऊ दिवसात करा रामरक्षा स्तोत्र सिद्ध

श्रीरामरक्षा अत्यन्त लाभप्रद आहे हे स्तोत्र जगतास बुध कौशिक ऋषी कडून प्राप्त झाले आहे . बुधकौशिकाना हे स्वप्नात भगवान शंकरा कडून प्राप्त झाले आहे ,अनुष्टुप छंदात रचलेले हे स्तोत्र वजरपंजर स्तोत्राच्या ऋषी बुधकौशिकांचे आहे , भगवान श्रीरामा च्या प्रसन्नता प्राप्तीसाठी ह्या स्तोत्राचे पठण करायला हवे.भगवान श्रीरामाचंद्राची शक्ती अनिर्वचनीय आहे .त्यांच्या कृपेने सांसारिक दुःख ,कष्ट, शारीरिक रोग आणि मानसिक चिंता दूर  होऊ शकतात 

 *रामरक्षा सिद्ध करण्याचे विधी* 

रामरक्षा स्तोत्र हे वाचले तर खूप फायदा होतो पण जर ते सिद्ध करून वाचले तर अजून जास्त प्रभावी असते.हे स्तोत्र सिद्ध करण्याचा विधी अशा प्रकारे आहे - हे स्तोत्र सिद्ध करण्यासाठी नवरात्र हा उत्तम काळ आहे.परंतु चैत्र नवरात्र हा जास्त उत्तम काळ आहे चैत्र नवरात्रातील प्रतिपदे पासून तर नवमीपर्यंत( नवरात्र शक्य नसेल कोणत्याही शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरवात करणे)
प्रतिपदे पासून सकाळी ब्राह्म मुहूर्त वर उठून स्नान वगैरे आटोपून दर्भ चे आसन टाकुन स्वच्छ कपडे घालून बसने समोर रामपरिवार व हनुमान चा फोटो ठेवून तेलाचा दिवा व अगरबत्ती लावावी व 12 वेळा रामरक्षा म्हणणे असे नवमी पर्यंत नऊ दिवस नित्य करणे शक्य असल्यास 9 दिवस दिवा अखनडीत प्रजवलीत ठेवा ,असे नऊ दिवस पूर्ण झाल्यावर रामरक्षा सिद्ध होईल हे स्तोत्र हनुमंत द्वारे किलीत आहे ह्याचे उतकीलन हनुमानाच्या कृपे मुळे होते म्हणून पाठ सुरू करण्या पूर्वी हनुमान चे  स्मरण करणे आवश्यक आहे 
 
रामरक्षे चे प्रयोग विधी 

रोग्यावरील प्रयोगविधी 
 
रोगाच्या निवारणासाठी रामरक्षा चे अभिमंत्रित जलाने रोग्यावर अभिमंत्रित  जलाने रोग्यावर मार्ज न करणे हा उत्तम विधी आहे 

कमळ , गुलाब, किंवा उपलब्ध लाल रंगाची पाच फुल घ्यावीत, ही पुष्प शुद्ध असली पाहिजेत त्याफुलांचा वास न घेता त्यातली 4 फुल  एक तांब्यात पाणी घेऊन त्यात ती 4 फुल टाका व उरलेले एक फुल हातात ठेवा किंवा देवा जवळ ठेवा , पाण्याचा तांब्यावर उजवा हात ठेवून 21 , 11 ,शक्य असेल तितक्या वेला  रामरक्षा  म्हणा नन्तर देवा जवळ ठेवलेल्या  फुलानी ते पाणी रोगी च्या अंगावर  डोक्या पासून पायापर्यंत ते पाणी  शिंपडणे .नन्तर हातातील फुल नदीत सोडणे व उरलेली चार फुल जमिनीत पुरणे, व प्रयोग कर्त्याने उपवास करावे 

रोग्यावर प्रयोग करताना स्तोत्रपठण करतेवेळी रोग्याच्या हातात हात घेऊन पठण केल्याने देखील खूप फरक पडतो किंवा पाण्यावर फुंकर मारून जरी पाणी प्यायला दिले तरी फरक पडतो 

वरील उपाय अगदी साधा सोपा व प्रभावी आहे विश्वस ठेवून करणे

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"