👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣
💐 *"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:*💐
*"केशवा जर 'मृत्यू' सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*
*"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*
*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :*
*पार्था,*
*"मांजर जेव्हा उंदराला पकडते*
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना*
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*
*परीणाम वेगवेगळे आहेत.."*
*"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्यामध्ये अडकेल.."*
*: विष काय आहे ..?*
*"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...*
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.*
*पैसा असो.*
*भूक असो.."*
*"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l
*सुखाचे १७ पाऊले*👏👏
..................................................
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
❗सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
❗क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
*🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो*🙏
💐💐रामकृष्णहरि💐💐
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"