Sunday, March 24, 2019

*श्रीक्षेत्र गाणगापूर व तेथील अष्ट तीर्थ

 *श्रीक्षेत्र गाणगापूर व तेथील अष्ट तीर्थ
: श्रीक्षेत्र   गाणगापूर "श्रीनृसिंह सरस्वतींनी" आपल्या "२८" वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्य करिता निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे" भिमा अमरजा" नद्यांच्या संगमाच्या आसपास दोन मैलांचा परिसर विविध कारणाने पवित्र झाला आहे. पौराणिक काळातील विभूतींनी तपस्या करून यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून हा प्रदेश परमपवित्र आणि मंगलकारक केला आहे .या क्षेत्राचे महात्मा समजून घेण्यास येथील काही स्थळांचा परिचय करून घेणेही आवश्यक आहे. क्षेत्र महात्मा दाखवणाऱ्या अष्ट तिर्थांची माहिती पुढील प्रमाणे :-            *अष्ट तिर्थांची माहिती* -श्रीक्षेत्र गाणगापूर येथील आठ तीर्था मुळे अधिकच पवित्र झाले आहे हे तीर्थ म्हणजे पवित्र स्थाने आहेत येथे स्नान केल्याने भक्तांचे  पाप धूवुन जाते आणि त्यांना विशिष्ट फल मिळते.  असा या   तीर्थाचा महिमा आहे .                    १) *षटकूल तीर्थ :* -हे तीर्थ प्रयाग तीर्थ समान आहे.  जालंधर नावाचा एक राक्षस जेंव्हा  फार  माजला  तेव्हा त्यांच्या नाशासाठी   प्रयत्नात देवांना मरण आले  त्यांना  जिवंत करण्यास अमृत पाठवले त्यातील काही भाग खाली पडला त्यातून अमरच्या नदीचा प्रवाह निर्माण झाला .          २) *नरसिंह तीर्थ :-* या तीर्थात प्रथम स्नान करावे नंतर संगमेश्वराची पूजा करावी असे केल्यास श्रीशैल्य मलिका अर्जुनाची सेवा केल्याचे पुण्य मिळते.                 ३) *भागीरथ*तीर्थ -* हे तीर्थ मणिकर्णीका सामान आहे  भारद्वाज गोत्रातील एका ब्राह्मणाच्या प्रार्थने नुसार श्री शंकराने येथे गुप्त वास्तव्य झाले तेथे एक लिंग उद्भवले शिवोपासक भक्त येथे काशी यात्रेचे विधी करतात.                      ४) *पापनाशी तीर्थ -:*  हे तीर्थ पापविमोचक आहे येथे स्नान केल्यास कुष्ठरोग जातो असे म्हणतात. नरसिहसरस्वतींच्या  पूर्वाश्रमीच्या   भगिनीचा कुष्ठरोग येथे स्नान केल्याने गेला .                               ५) *कोटीतीर्थ -* :या तीर्थाच्या ठिकाणी स्नान करून दान केल्यास कोटी दान केल्याचे पुण्य मिळते.                                           ६) *रुद्र पात तीर्थ:-* हे तीर्थ गया तीर्था समान आहे येथे श्राद्ध विधी करतात येथे विष्णूपाद आहे .              ७) *चक्रतीर्थ:* -  हे द्वारावती तीर्था समान आहे. येथे अस्थी विसर्जन करतात येथे विसर्जित केलेल्या अस्थी चक्राकार होतात.                     ८) *मन्मथ तीर्थ* :--  या तीर्थाजवळ कल्लेश्वर चे देऊळ आहे हे तीर्थ गोकर्ण क्षेत्रातील महात्मा दाखवणारे आहे या तीर्थात  स्नान करून  कल्लेश्वर पूजा केल्यास महाबळेश्वराची सेवा केल्याचे फळ मिळते.                   ॥श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"