Thursday, March 21, 2019

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे

🏵️
*वदनी कवळ घेता
 *नाम घ्या श्रीहरीचे*
🏵️
*सहजहवन होते नाम*
 *घेता फुकाचे*
🏵️
*जीवन करी जिवित्वा*
*अन्न हे पूर्णब्रह्म*
🏵️🌻🌻🌻🏵️
*उदरभरण नोहे*
*जाणिजे यज्ञकर्म*
🏵️🌻🌻🌻🏵️
हा श्लोक पूर्वी आपण जेवणाआधी म्हणत असु.
या श्लोकाद्वारे आपण पोटातल्या अग्नीची पूजा/ त्याला वंदन करतो. अन्नग्रहण हे एक पवित्र यज्ञकर्म आहे म्हणून ते विनम्र व समाधानाने करणे आवश्यक आहे. आपल्या जगण्यासाठी पूर्णब्रह्म असलेले अन्न प्राप्त करून दिल्याबद्दल या श्लोकात आपण देवाचे आणि निसर्गाचे आभार मानतो. शेवटी 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' म्हणजे- पोट भरण्यासाठी अन्न गिळणे हे जितके असंस्कारित आहे तेवढेच एक यज्ञकर्म म्हणून योग्य अन्न, योग्य प्रमाणात, योग्य मान ठेवून ग्रहण करणे हे संस्कारमय आहे. हेच खरे अन्नसंस्कार!
🏵️
*अन्नदाता सुखी भव:*
-------------------------------------------------------🏵️
*जेवताना लक्षात ठेवा या गोष्टी*
---------------------------------------------------
🏵️🌾🌾🌾🏵️🌾🌾🌾🏵️🌾🌾🌾🏵️🌾🌾🌾🏵️
सुखी जीवन आणि निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्या विविध अडचणींना सामोरे जावे लागते.अन्नातून ऊर्जा मिळते आणि जेवताना काही खास गोष्टींकडे लक्ष दिल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते
🏵️
येथे जाणून घ्या,गरुड पुराणानुसार जेवताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
🏵️
१)-पूर्व आणि उत्तर दिशेकडे तोंड करून जेवण करावे.
या उपायाने आपल्या शरीराला अन्नाची जास्त उर्जा प्राप्त होते.
२)तुटक्या-फुटक्या भांड्यांमध्ये जेवण करू नये,यामुळे दुर्भाग्य वाढते.
३)-दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करणे अशुभ मानले जाते.
-पश्चिम दिशेला तोंड करून जेवण केल्यास रोगांमध्ये वृद्धी होते.
🏵️
४)जेवण करण्यापूर्वी पाच अवयव (दोन हात, दोन पाय आणि तोंड) चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. असे मानले जाते, की जेवण करताना आपले पाय ओले असल्यास आरोग्य लाभ प्राप्त होतात तसेच आयुष्य वाढते.
🏵️
६)या स्थितीमध्ये जेवण करू नये
🏵️
-■  पलंगावर बसून किंवा हातामध्ये ताट घेऊन कधीच जेवण करू नये.
■- तुटलेल्या किंवा फुटलेल्या भांड्यातसुध्दा जेवण करू नये.
■- उभे राहून जेवण करू नये. नेहमी बसूनच जेवण करावे.
■- जेवणाचे ताट लाकडी पाटावर ठेवून मग जेवण करावे.
🏵️
७)जेवणापूर्वी हा एक उपाय करा
🏵️
■- जेवण करण्यापूर्वी देवी-देवतांचे किंवा अन्नपूर्ण मातेचे स्मरण करावे. सोबतच, अशी प्रार्थना करावी, की सर्व उपाशी लोकांना अन्न मिळो.
■- कधीही ताटात वाढलेल्या अन्नाला नाव ठेऊ नयेत. असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि ते खाल्ल्यास शरीरात कधीच उर्जा प्रप्त होत नाही.
🏵️
८)जेवण तयार करणाऱ्या व्यक्तीने लक्षात ठेवाव्यात या गोष्टी
■- व्यक्तीने स्नान करून आणि पवित्र होऊन स्वयंपाक करावा
■- स्वयंपाक करताना मन शांत ठेवावे तसेच, या दरम्यान कोणाबद्दलही वाईट बोलू नये.
■- शुद्ध मनाने स्वयंपाक केल्यास जेवण चविष्ट बनेल आणि कधीह अन्नाची कमतरता भासणार नाही.
■- जेवण बनवताना देवी-देवतांचे नामस्मरण करावे.
■- जेवण बनवल्यानंतर सर्वात पहिले तीन पोळ्या बाजूला काढून ठेवाव्यात. 
एक गायीला,
एक श्वानाला आणि
एक पोळी कावळ्याला द्यावी.
🏵️
 ९)जेवण करण्यापूर्वी अग्नी देव आणि इतर देवी-देवतांनासुध्दा नैवेद्य दाखवावा.

"सगळेच उपाय अथवा गोष्टी नाही शक्य होणार,परंतु शक्य ते जरुर करावे."

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"