Wednesday, March 20, 2019

संकट विमोचन विधी

काही लोकांवर अचानक काहीतरी संकट येते,या संकटाना अनेक वर्षे तोंड दयावे लागते.असे मानले जाते की या संकटाचे कारण पितृदोष, कालसर्प दोष, शनिची साढ़े साती आणि ग्रह-नक्षत्राचा वाईट प्रभाव. तर काही लोक मानतात कीसर्व काही चांगले आहे पण घराचा दरवाजा दक्षिण मुखी आहे त्यामुळे आपण त्रासात आहात.असे ही मानले जाते की वरील कारणामुळे घरात गृह कलह, आर्थिक संकट, वैवाहिक संकट आणि दुख बनत राहते.याच कारणामुळे व्यक्तिला कोर्ट कचेरी किंवा दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात.यातून वाचण्यासाठी आपणास काही सावध उपाय सांगतो.
#सावधानता:-१) कोणत्याही प्रकारचे 
व्यसन आणि नशा करु नये,करत असाल तर त्याचा त्याग करा. २)व्याजाचे काम करत असाल तर ते बंद करा.३)त्रयोदशी,  चतुर्दशी, अमावस्या व पूर्णिमेला शुध्द पवित्र रहा ४)आजी,सासू,आई,मुलगी,
पत्नी,मावशी, मेव्हणी,आत्या यांच्याशी चांगले संबंध ठेवा.५)आजोबा,वडील सासरा,भाऊ,काका,भाचा,मेव्हणा, पुतण्या, मामा,यांच्याशी चांगले संबध ठेवा.६)मांस आणि तामसिक भोजनाचा त्याग करा.अाणि नकारात्मक विचारा पासून लांब रहा.७)घर वास्तुशास्त्रानुसार बनवा व तेथे नित्य पूजा-अर्चा व स्वच्छ ठेवा.९)सर्व प्रकारच्या तांत्रिक अनुष्ठान आणि रात्रीच्या वाईट घोर कर्मापासून दूर रहा.
#रोज_हनुमान_चालीसा_म्हणा : रोज पूजा-अर्चा नंतर बरोबर हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. मंदिर,घरात पूजा-अर्चा रोज सकाळसंध्याकाळ केली जाते.पवित्र भावनेने आणि शांतिपूर्वक हनुमान चालीसा म्हटल्याने हनुमंताची कृपा प्राप्त होते, आपला अनेक संकटापासुन बचाव होतो.हनुमान चालीसा मुळे  पितृदोष, मंगलदोष, राहु-केतू दोष नष्ट होतात.  भूत-प्रेताचा वाईट प्रभाव नष्ट होतो.
#हनुमानास-वस्त्र अर्पण करा:-तसेच दर मंगळवार आणि शनिवारी बजरंगबाणाचा पाठ करावा अाणि कोणत्याही शनिवारी हनुमानास वस्त्र अर्पण करावे. बनारसी पानाचा विडा अर्पण करावा. किमसन ५ शनिवार तरी हनुमानास चोला,वस्त्र अर्पण करावे.त्यामुळे अनेक संकटे नष्ट होतात.
तसेच दर मंगळवारी किंवा शनिवारी वडाच्या पानावर कणकेचा दिवा पेटवून हनुमान मंदिरात ठेवावा.असे ११. मंगळवार किंवा शनिवारी करावे.
#गाय, कुत्रा,मुंग्या आणि पक्षी,कावळा यांना भोजन खावू घालावे.वृक्ष,मुंग्या, पक्षी,गाय,कुत्रा,कावळा,अशक्त माणूस, प्राणी यांच्या अन्न-जलाची व्यवस्था केल्याने फसर चांगले पुण्य प्राप्त होते.
याला वेदामध्ये पंचयज्ञातील एक 'वैश्वदेव यज्ञ कर्म' म्हटले आहे.हे सर्वात मोठे पुण्य मानले आहे.कासव आणि मासे यांना कणकेच्या गोळ्या खावू घालावेत आणि 
मुंग्यांना गव्हाच्या पीठात साखर मिसळून
खाण्यास टाकावे.त्यामुळे कर्ज व संकटातून मुक्ती मिळते.
रोज कावळ्याना तोज जेवणातला घास दहावा त्यामुळे पितराची तृप्ती होते.
रोज कुत्र्याला रोटी घाऊ घालावी त्यामुळे  आकस्मिक संकट दूर होतात.
रोज गायीला रोटी खावू घातल्यास अर्थिक संकट दूर होते.
छाया दान : शनिवारी एक कांसेची वाटी घेऊन त्यात तेल टाकून एक रुपया-पैसा
टाकून त्यात आपली छाया बघणे आणि ते तेल शनि मंदिरात ठेवून येणे. हा उपाय किमान ५ शनिवार करावा.त्यामुळे आपली शनिची पीड़ा शांत होऊन शनिदेवाची कृपा सुरु होईल. 
#नारळाचा_उतारा : पाणीवाल एक नारळ घेऊन आपल्यावरुन २१ वेळा उतरून देवस्थानातील जळणारया होमात टाकावा.ज्याच्यावर फार संकटे आली असतील त्याने हे करावे.
#जल_अर्पण : एक तांब्याच्या कोशात जल घेऊन त्यात थोडेसे लाल चंदन टाकावे.ते पात्र झोपताना आपल्या डोक्याशी ठेवावे सकाळी उठल्यावर ते जल तुळशी मध्ये टाकावे.असे ४३दिवस करावे.त्यामुळे आपला त्रास कमी होत जाईल. 
#दोन_कान छेदने :- हिन्दू धर्मात कर्ण भेदन संस्कार महत्त्वाचा आहे.आजकाल हा संस्कार विधिवत कोणी पाळत नाही.  काही लोक एकच कान छेदन करतात. परंतु कधीही दोन कान छेदन करावेत. ह
कान छेदनाने राहु अाणि केतुचे वाईट  प्रभाव नष्ट होतो. जीवनात येणारे  आकस्मिक संकटाचे कारण राहु अाणि केतु हे आहेत.म्हणुन कान छेदन करणे गरजेचे आहे. वैज्ञानिक नुसार हा संस्कार केल्याने मस्तिष्कामध्ये रक्ताचा संचार योग्य प्रकारे होतो.व रुप सुंदर दिसू लागते. यामुळे डॊळ्याचे आजार बरे होतात व चांगले दिसू लागते.कान छेदनाने मेधा शक्ति फार चांगली होते.पुरातन काळात गुरुकुल जाण्या अगोदर पहिल्यांदा कान छेदनाची परंपरा होती.
#नाक_छेदन: कानाची पाळी आणि नाकाचा डाव भाग छेदन करला जायचा.नाक नेहमी फक्त महिलाचे छेदन केले जाते.पण जर आपले लाल किताबा नुसार बघितले तर आपला चंद्र, गुरु आणि बुध खराब स्थिति असेल तर आपल्या जीवनात रोजगार, बहिणीवर संकट, मातेवर संकट आशा काही समस्या निर्माण होतात तेव्हा नाक छेदनाचा सल्ला दिला जातो....#दादा
             #श्रीस्वामीसमर्थ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"