Thursday, March 21, 2019

श्रीपाद श्रीवल्लभ जन्म

बाळाचे नाव श्रीपाद असे ठेवले गेले.बाळाचे तेजाळ मुख सर्व कौतुकाने पाहात होते पद्माला प्रमाणे सुंदर दीर्घ नेत्र, प्रसन्न मुद्रा, मंद हास्य, शुभ्र गोरा ,वर्ण सरळ नासिका, उज्ज्वल मान, कपाळावर चंद्रकोर दीर्घ दंड असे चरण कुरळे, केस आरक्त ओठ, शांत स्वभाव किंकाळ्या केवळ ओंकाराचा ध्वनी  सर्व निरखुन पाहणारे तेजोमय डोळे अशी ती बाल दत्तमूर्ती मनोहर अशी होती. कलेकलेने ते वाढत होते वयाच्या सातव्या वर्षी उपनयन संस्कार झाले त्या संस्कार चार वेदांचे उच्चारण ऐकून सर्व  विप्र आश्चर्य करित हाेते.सारे त्या चरणास वंदन करू लागले.  पुढे द्विजा ना पण ते उपदेश करू लागले पुढे वयाच्या सोळाव्या वर्षी माता पित्यांनी विवाहाचा विषय काढला तर श्रीपाद म्हणतात माझा विवाह वैराग्य स्त्रीशी झालेला आहे. त्या स्त्री व्यतिरिक्त इतर अबला मला  मातेसमान आहेत माझे नाव श्रीपाद श्रीवल्लभ आहे .श्रीपाद श्रीवल्लभ असे नाव उच्चारताच तेथे दत्तात्रय सगुण रूपाने प्रकट झाले.  त्यांनी सांगितले की अवधूत मुनी योगी जणांना तारणारा मी उत्तरे जात आहे. आणि त्या प्रसंगी वंदन करताना त्या दाम्पत्यास पूर्वी भिक्षेच्या वेळी दिलेल्या वराची आठवण करून दिल. ते भाकितात आज सत्य होत आहे असे कथन केले. आपळ राजा पत्नीस  म्हणतात याला  अवरोध करू नये, नाही तर अन्य कुठले तरी विघ्न निर्माण होईल .हा साधा पुत्र नाही अवतारी पुरुष आहे त्यांच्या मनाप्रमाणे त्याला वागू दे मग ते दाम्पत्य म्हणतात ,आमचा सांभाळ कोण करील?  असे म्हणून माता धरणीवर पडली. अश्रुपात होत हाेता . त्या वेळेस श्रीपाद त्यांना उठवून सांगतात की चिंता करू नये माता असे म्हणून प्रेमाने पाहतातच लुळे पांगळे अंध सर्व भावंडे सुदृढ झाली .ते मोठे विद्वान बनले त्यांना आशीर्वाद दिला जनक जननीची सेवा करण्याकरिता आज्ञा दिली अखंड लक्ष्मीच्या घरात नांदेल असा वर दिला .ते शतायुषी बनले .तेलुगू ग्रंथांद्वारे श्रीपाद यांना दोन वडील भाऊराव रामराजा, व श्रीधर नावाचे होते .तर विद्याधरी राधा आणि सुरेखा नावाच्या तीन बहिणी होत्या त्यांचे गोत्र भारद्वाज असे नमूद केलेले आहे .उत्तरे साधू ,साधक व योगी जणांना मार्गदर्शन करण्याकरता जाणे आहे .मला आज्ञा द्यावी असे मातापित्यांची विनवणी केली अशाप्रकारे समाधान करून दत्त अंतर्धान पावले ते त्यानंतर काशी येथे आले .मणिकर्णिका स्थानात वास केला शांभवी योग मार्ग स्पष्ट केला. साधक भक्त तपी जपी योगी यांना मार्गदर्शन केले .तेथून देशभर संचार केला खांदेश्वर संचार केला सर्वावर अनुग्रह केला असे हे अवतार कार्य अखंड चालले.सर्वत्र संचार करून ते गोकर्ण स्थानासह आले .तेथे दीर्घ वास झाला .सांप्रत पिठापूर येथे देवस्थान समितीने भव्य व सुंदर मंदिर उभे केलेले आहे मुख्य देव्हारा भागी" दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ" आणि "नरसिंह सरस्वती" यांच्या विलोभनीय विग्रहाचया दर्शनाने भाविकाला प्रसन्नता लाभते. व समाधानी मिळते .                                            ॥श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये॥           ॥श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"