Saturday, March 30, 2019

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी व पादुका स्थापन

🕉🚩*श्रीक्षेत्र नृसिंहवाडी व पादुका स्थापन.*🚩                                    श्रीदत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती अवतार धारण करून हरावया भूमीचा भार व कराव्यातपाहात श्रीगुरुमूर्ती सदैव वास करीत आहे. जगदोद्धार श्रीक्षेत्र वाडी बसवली अशी पावन जागा जगात कोणतीच  नाही. तेथे औदुंबर वृक्षाखाली भक्तांची वाट  पाहात श्रीगुरुमूर्ती सदैव वास करीत आहे. ६००वर्षांपूर्वी तेथे घनदाट व घोर अरण्य होते.त्यावेळेस तेथे अनेक  हिंस श्वापदे राहत होती. तेथून दक्षिणेस आठ किलोमीटर अंतरावर "आलास " नावाचे गाव होते .तेथे बहिरभटजी जेरे नामक देशस्थ ब्राह्मण राहात असत .ते रोज स्नान संध्या इत्यादी कामे करीत अस. ते सात्त्विक संपन्न आचारवंत, विचारवंत, विद्वान, ब्राह्मण होते त्यांची वृत्ती जोशी पणाची होती आसपास पाच सहा गावात ते  जोशी वृत्ती करित व काय मिळेल तेवढ्यात संतोष मानत असत .त्यांची पत्नी साध्वी पतिव्रता होत. पती यादी पहाटे उठून ति केर  संमार्जन करून स्नान करून पतीस पूजा साहित्य देत असत. त्यांच्या पोटी संतान नव्हते कृष्णाकाठी शिरोळ गावात हे बहिरमभटजी   भिक्षुकी करण्याकरता यजमानांच्या घरी जात असत. रात्री वस्तीत अस। असा त्यांचा दिनक्रम अखंड चालू होत. एके दिवशी त्यांना कृष्णेच्या पूर्व तीरावरून जात असताना सांप्रत जेथे "दत्त पादुका "आहेत त्या ठिकाणी दैदिप्यमान, दिव्य, संन्याशी ,तपस्वी औदुंबराच्या झाडाखाली दिसले .बहिरंभटजी नदीत जाऊन हात पाय धून श्रीगुरूंनी साष्टांग नमस्कार घातला त्यांनी " नारायण नारायण"  असा आशीर्वाद उच्चारला भटजींचा जाता येता श्री गुरूंना साष्टांग नमस्कार  घालून आशीर्वाद घ्यावा असा नित्यक्रम होता. पुष्कळ दिवस झाला. त्यांची श्रीगुरुचरणी धरण भक्ती बसली त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीस  सांगितली .एक दिवस त्यांनी शिरोळ गावाहून परत येताना श्री गुरूंना नित्य नियमाप्रमाणे साष्टांग नमस्कार घातला श्रीगुरू स्वामी मौन धरून जप करीत होते सूर्य अस्तमानी निघाला होता. भटजी हात जोडून उभे होते श्री श्रीगुरुनी खुणेनेच त्यांना बसावयास आज्ञा दिली. बहिरमभटजी काही वेळ तसेच   उभे  राहिले. घरी जाण्यास उशीर होईल, यासाठी श्रीगुरुनाथा नमस्कार घालून ते आपल्या घराकडे जाण्यास निघाले. श्री गुरू म्हणाले"- ' ही संध्याकाळची वेळ आहे मार्गक्रमण करू नये' भटजी म्हणाले "- घरात कोणी नाही पत्नी एकटीच आहे ,व पाहात असेल .'संध्याकाळची वेळ असल्यामुळे सोडून तुम्ही जाऊ नका आता तुम्ही वयोवृद्ध झाला आहात तुम्हाला ऐंशी वर्षे झाली आहेत तेव्हा घरचा व्याप सोडावा व परमार्थ साधावा 'आता तुम्ही जाऊ नका व येथेच मुक्काम करा' अशी श्री गुरूंची आज्ञा झाल्यावर बहिरमभटजीचे  काही चालेना भटजी नाईलाजास्तव हात पाय  धूवुन  संध्या केली  नम्रतापूर्वक भटजी येथे बसले .सर्व ठिकाणी गडद अंधार पडला होता श्रीगुरु ध्यानधारणा संपल्यावर हसतमुखाने बहिरम भट्टजीस म्हणाले  "तुमचे नाव काय ? गाव कोणते? घरी कोण कोण आहेत ? यांची वृत्ती कोणती? श्री गुरूंनी त्याला कधीही विचारले नव्हते आज विचारले म्हणून बहिरम भट्ट  फार आनंद झाला. ते म्हणाले" मला फक्त पत्नी आहे तिचे वय "साठ "वर्षांचे आहेत मला पोटी संतांन नाही व मला दुसरे कोणीही नाही माझा चरितार्था करिता मी ज्योतिषी वृत्ती करतो .    श्रीगुरु म्हणाले स्त्री धन संतती इत्यादी प्रारब्धानुसार प्राप्त होतात. त्याकरिता "ईश्वरावर भार टाकून आपण आनंदात राहावे  सदासर्वदा भगवंताचे स्मरण करावे  दुःख कष्ट आले तरी आनंद मानून राहावे इतके बोलून श्रीगुरु ध्यानस्थ झाले. मध्यरात्र झाली श्रीगुरूंनी बहिरमभटास बोलावून विचारले  तुम्ही या स्थळी एकटे निवांत राहू शकाल काय ? बहिरभटजी नि
 उत्तर दिले आलाच गावात आमचे मध्यवस्तीत घर आहे. हा प्रदेश भयप्रद, निर्जर घाेर अरण्यात  आहे. येथे लोक नाहीत हिंसक पशू, प्राणी राहतात. इथे राहण्यात आम्हाला लाभ  कोणता ? मी येथूनच शिरोळा जात असताे.श्रीगुरु म्हणाले" फक्त तुमच्या करिता ही गोष्ट सांगतो" श्रीगुरु दत्ताने आज्ञा केली या जागेवर स्वयंभू "मनोहर"श्रीगुरु दत्तांच्या पादुका आहेत .त्यांची पूजा तुम्ही करावी असे मला  श्रीगुरुदत्ता ने सांगितले आहे. केवळ तुमच्या कल्याणाकरिता आम्ही सांगत आहोत काय अडचण असेल तर सांगा बहिरम  भटजी म्हणाले" हे दया घना मी तुम्हा शरण आलो आहे मी तुमचा बाळ आहे  मला तुम्ही सन्मार्ग दाखवा मी फार गरीब आहे मला अन्न, वस्त्र ,कोण पुरवील ? श्रीगुरु म्हणाले "आम्हाला इश प्रेरणा झाली असल्याने आम्ही गाणगापुरात जात आहोत त्याकरिता येथील श्रीदत्ताच्या पादुकांची पूजाअर्चा करण्याकरता पवित्र ब्राह्मण पाहिजे  यास्तव तुम्ही येथे राहून पूजा अर्चा करावी आज इतके  दिवस मी तुम्हास पाहातो व मला तुमच्याबद्दल विश्वास वाटतो तुम्ही चिंता करू नका तुम्हास येथे श्री गुरूच्या कृपेमुळे  अन्न वस्त्राची कमतरता पडणार नाही. श्रीगुरु तुमची इच्छा पूर्ण करील तुमचे सर्व मनोरथ त्यांच्या कृपाप्रसादाने पूर्ण होतील खात्री बाळगा तुम्हास अनुभव येईल बहिरभटजी म्हणाले लोभा विष्ठ मन होत असल्याने पुजारी वृत्ती निंद वाटते. म्हणून मनास भीती वाटते नंतर श्रीगुरु म्हणाले" तुम्ही पादुकांचे पूजन करा. तुमची वंशपरंपरा कल्याण होईल मनामध्ये संपूर्ण विश्वास धरा मनोभावे "श्री दत्त पादुकांचे "पूजन करावे पूजा केल्याने चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त होईल असे श्री गुरूंचे अमृतमय भाषण ऐकून बहिरम भटजींनी   श्रींची  आज्ञा प्रमाण  मानून त्यांना वंदन केले. ते म्हणाले मी माझ्या पत्नीस सांगून  संमती घेऊन येतो.श्रीगुरु बहिरम भटजींचे भाषण ऐकून तथास्तू म्हणाले "!  व रात्र पुष्कळ झाली आहे आता विश्रांती घ्या भटजी तेथेच झोपले.. .( पुढे चालू )"श्री गुरुदेव दत्त " "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"