Friday, March 29, 2019

निर्गुण पादुका महात्मा -* निर्गुण पादुका "श्रीक्षेत्र गाणगापूरचा" आत्मा

*संगम* -"-गाणगापूर "क्षेत्रात भीमा -अमरजा या दोन नद्यांचा संगम झाला आहे. गाणगापूर गावापासून पश्चिमेस दोन मैलावर हा संगम झाला आहे .तेथे "श्री नृसिंह सरस्वती " नित्य स्नान करीत अशा या ठिकाणी स्नान केल्यास यांत्रिकांची पापे धुतली जातात "निर्गुण पादुकांचे" दर्शन घेण्यापूर्वी संगमावर जाऊन प्रथम स्नान करावे. संगमावर नदीकाठी अंघोळीसाठी घाट बांधण्यात आलेले आहे.संगमावर जवळच महाराजांचे मंदिरही आहे.                  *भस्ममहिमा* -संगमाच्या जवळ एक लहानशी टेकडी आहे ती भस्माने बनली आहे भगवान "परशुरामांनी "या ठिकाणी मोठे यज्ञ  केले. या यज्ञातील विभुती झालेली ही टेकडी अशी पौराणिक पार्श्वभूमी चाललाी आहे. श्री गाणगापूर क्षेत्राचा मुख्य प्रसाद म्हणून या टेकडीवरील विविध  भक्तगणांना  नेतात या विभूतीने आपले मनोरथ पूर्ण होते अशी  श्रद्धा आहे.              *संगमेश्वर मंदिर* -हे मंदिर भीमा अमरजा नद्यांच्या संगमाजवळ आहे हे एक जागृत स्थान अाहे.   नृसिंह सरस्वती  शुष्क कष्टातून जी  औदुंबर  पल्लवीत केली तो वृक्ष या देवळा समोरच होता .संगमावर स्नान केल्यानंतर प्रथम संगमेश्वरचे दर्शन घेऊन मग निर्गुण पादुकांच्या दर्शनाला जातात .                                       *औदुंबर वृक्ष* -संगमेश्वरच्या देवळाच्या पूर्वेचे हे झाड श्री नृसिंह सरस्वतींनी केलेल्या असंख् लीलां पैकी एक  लिलेशी संबंधित आहे. श्रीनरहरी नावाच्या एका ब्राह्मणाला कुष्ठरोग होता नरहरी जेव्हा स्वामींना शरण गेला तेव्हा स्वामींनी एक  शुष्क काष्ठ जमिनीत रोवण्यात सांगितले .ज्या दिवशी या शुष्क काष्टाला पालवी फुटेल त्या दिवशी त्या ब्राह्मणाचा  राेग जाईल असे महात्मा सांगितले पुढे त्या ब्राह्मणाची खरी भक्ती बघून   नरसिंह सरस्वती   त्या कष्टावर तीर्थ शिंपडले लगेच  काष्टाला पालवी फुटली आणि  माेठे  मा झाले . स्वामींच्या शब्दावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितल्या प्रमाणे वागल्यास कल्याण होते. याचे हे उदाहरण  आहे महापुरात हा वृक्ष वाहून गेला आहे त्याच  ठिकाणी दुसरे औदुंबर उगवला आहे .त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेली आहे. तेथे झाडाखाली भक्त गुरुचरित्र पारायण करतात .              *विश्रांती कट्टा* -श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या पवित्र स्पर्शाने मंगलमय केलेला हा कट्टा संगमा कडे जाताना एका शेतात लागू आहे. स्वामी संगमाला जातांना परत येते वेळी या कट्ट्यावर विश्रांती घेत म्हणून त्याला विश्रांती कट्टा असे नाव झाले आहे. कट्ट्याचे महात्मा असे आहे कि ज्या शेतात हा कट्टा आहे  गुप्तरुपाने नरसिंह  सरस्वती संगमाला जातात आणि कट्ट्यावर विश्रांती घेतात आणि अशावेळी स्वामींची कृपादृष्टी जाग्यावर पडते त्या व्यक्तीची भरभराट होते .                               *निर्गुण पादुका महात्मा -*  निर्गुण पादुका "श्रीक्षेत्र गाणगापूरचा" आत्मा आहे  .असे म्हटले तरी चालेल भक्तांच्या   आग्रहावरून आपल्या  अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वतींनी 


ठेवलेल्या या पादुका श्रीगुरु  अस्तित्वाचे    साक्ष आहे.ज्यावेळी भीमा नदीत  केळीच्या पानावर आरुढ झालेले नरसिंह सरस्वती एकाएकी अंतर्धान पावले,  जेव्हा सारे भक्त परत देवळाकडे परतले तेव्हा निर्गुण पादुकांच्या स्थानी प्रत्यक्ष नरसिंह  सरस्वती विराजमान असलेले दृश्य भक्तांनी पाहिले .

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"