---------------------------------------------------
*
लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते,*
------------------------------------------------
*जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*
अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून वापरत असतो पण वास्तवात त्या आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांचे शुभ-अशुभ जीवनात मोठा बदल घडवू शकतात.
अशीच एक सामान्य वस्तू आहे ती म्हणजे झाडू. घरात वापरला जाणारा झाडू आर्थिक दृष्ट्या फार महत्वाचा असतो.
*शकुन आणि अपशकुन*
शास्त्रांमध्ये झाडूचा वापर आणि त्याला वापरण्याची वेळ तथा त्याला वापरण्याला अत्याधिक महत्व दिले आहे. वास्तुशास्त्र नुसार झाडू संबंधित दिलेले काही प्रयोग करून आपण अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकतात.
*आज आम्ही झाडू संबंधित अशाच काही वास्तू टिप्स सांगणार आहोत.*
ज्योतिष आणि शास्त्रांचे मानले तर एकीकडे झाडूचा चुकीचा वापर दारिद्रता आणतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्याने लक्ष्मीसाठी घराचे दार उघडून देतो. झाडूचा चुकीच्या वेळी वापर घरात गरिबीचे कारण बनतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्यास सामान्य माणसाला करोडपती बनवू शकतो. त्यामुळे आपण यासंबंधीचे नियम आणि मान्यता नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जसे की..
*१. चुकूनही पायाने स्पर्श करू नये*
हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे सूचक मानले जाते. त्यामुळे झाडूला कधीच पायाने स्पर्श नाही केला पाहिजे. कारण असे देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचं मानलं जातं. ज्यामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. सोबतच झाडू अशा ठिकाणी ठेवला नाही पाहिजे जिथे चप्पल जोडे ठेवले असतात.
*२. इथे ठेवा झाडू*
घरात झाडू ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की, झाडू कधीच अशा जागी ठेवला नाही पाहिजे जिथे त्यावर बाहेरच्या लोकांची सरळ नजर पडेल. त्याला कायम लपवून ठेवल पाहिजे. सोबत हे ही लक्षात ठेवावे की झाडू कधीच ईशान्य कोपऱ्यात ठेवला नाही पाहिजे, त्यामुळे देवाच्या आगमनात अडथळा येतो. आणि दुर्भाग्य घरात चालून येत. झाडू ठेवण्यासाठी योग्य कोपरा दक्षिण आणि पश्चिम सांगितला आहे.
*३. सूर्यास्तानंतर झाडू मारू नये*
सूर्यास्तानंतर घरात झाडू मारला नाही पाहिजे. असे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते. घरात झाडू लावण्याची वेळ सकाळी चार पहरी सांगितल्या आहेत. रात्रीच्या प्रहरी झाडू लावल्यास दारिद्रता आपले पाय पसरते.
*४. झाडू कधीच उभा ठेवू नये*
अनेक वेळा लोक झाडू उभा ठेवतात पण ते वास्तूच्या दृष्टीने फार हानिकारक आहे. ज्यामुळे घरात विनाकारण क्लेश राहतो. सोबतच याने भाग्याचा मार्गात बाधा निर्माण होते शिवाय देवी रुष्ट होते. त्यामुळे झाडू कायम आडवा ठेवावा.
------------------------------------------------
*झाडूच्या ह्या उपायांनी मिळते सौभाग्य*
-------------------------------------------------
१. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही मंदिरात ब्रह्म मुहूर्तावर तीन झाडूंचे गुप्तदान करावे. सोबतच झाडू दान करण्याआधी शुभ मुहूर्त अवश्य बघून घ्यावा. जर त्यादिवशी शुभ योग्य किंवा कुठला सण असेल तर त्याचे महत्व वाढते आणि घरात स्थायी लक्ष्मी वास करते.
२. जर आपण नवीन घरात प्रवेश करत असाल तर नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावा. हा शुभ शकुन मानला जातो. ज्यामुळे नवीन घरात सुख, समृद्धी आणि शांती बनून राहते.
३. शनिवारच्या दिवशी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते.
--------------------------------------------------
*झाडूशी संबंधित या गोष्टी दूर करू शकतात तुमच्या विविध अडचणी*
-------------------------------------------------
*येथे जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*
१. घर किंवा ऑफिस, दुकानामध्ये झाडूचे काम नसेल तर तो डोळ्यासमोर ठेवू नका. पूर्णवेळ झाडू दिसणे शुभ मानले जात नाही. उघड्यावर ठेवलेल्या झाडूमुळे घर, ऑफिसमधील सकारात्मक उर्जा बाहेर पडते.
२. अनेकवेळा झाडू तुटल्यानंतरही आपण त्याचा उपयोग करतो, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. घर किंवा ऑफिसमधील झाडू तुटला असेल तर लगेच बदलून घ्यावा. तुटलेल्या झाडूने घराची स्वच्छता केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते
३ . झाडू कधीही उभा ठेवू नये, उभा झाडू अपशाकुनाचे कारण ठरतो. यामुळे झाडू नेहमी आडवाच ठेवावा.
४. लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते. सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी, कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते.
५. शक्य असल्यास झाडू पश्चिम दिशेच्या खोलीत ठेवावा. या दिशेला झाडू ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा येत नाही.
६)हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी समान मानले गेले आहे. घरातील कोणत्याही सदस्याचा झाडूला पाय लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. विद्वानांच्या मतानुसार झाडूवर पाय पडल्याने महालक्ष्मीचा अवमान होतो. झाडूला कधीही जाळू नये.
७. जुना झाडू बदलून नवीन वापरण्यासाठी शनिवारचा दिवस निवडावा. शनिवारी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते.
८. झाडू धुवायचा असल्यास तो स्वच्छ पाण्याने धुवावा. घाण पाण्याने झाडू धुणे हा जादूचा अपमान मानला जातो आणि यामुळे घरातील सदस्यांना विविध प्रकारच्या अडचणीं सामोरे जावे लागू शकते.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
--------------------------------------------------
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"